SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 286
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३४-१८६) महापुराण सिंहर्क्षवृकशार्दूलतरक्ष्वादिनिषेविते । वनान्ते ते वसन्ति स्म तदारसितभीषणे ॥ १७८ स्फुरत्परुषशार्दूलगजितप्रतिनिःस्वनैः । आगुञ्जत्पर्वतप्रान्ते ते स्म तिष्ठन्त्य साध्वसाः ॥ १७९ कण्ठीरव किशोराणां कठिनैः कण्ठनिःस्वनैः । प्रोन्नादिनि वने ते स्म निवसन्त्यस्तभीतयः ॥ १८० नृत्यत्कबन्धपर्यन्तसञ्चरद्डाकिणीगणाः । प्रचण्डकौशिकध्वाननिरुद्धोपान्तकाननाः ॥ १८१ शिवानामशिवैर्ध्वाने राद्वाखिलदिङ्मुखाः । महा पितृवनोद्देशा निशास्वेभिः सिषेविरे ॥ १८२ सिंहा इव नृसिहास्ते तस्थुगिरिगुहाशयाः । जिनोक्त्यनुगतैः स्वान्तैरनुद्विग्नैः समाहिताः ॥ १८३ पाकसत्त्वशताकीर्णां वनभूमि भयानकाम् । तेऽध्यवात्सुस्त मित्रासु निशासु ध्यानमास्थिताः ॥ १८४ न्यषेवन्त वनोद्देशान्निषेव्यान्यनदन्तिभिः । ते तद्दन्ताग्रनिभिन्नतरुस्थपुटितान्तरान् ॥ १८५ वनेषु वनमातङ्गवृंहितप्रतिनादिनी: । दरीस्तेऽध्यूषुरा रुष्ट राक्रान्ताः करिशत्रुभिः ॥ १८६ सिंह, अस्वल, लांडगा, वाघ, तरस आदिक हिंस्र प्राणी जेथे राहतात व त्यांच्या गर्जनानी जे अतिशय भय उत्पन्न करिते अशा वनात ते मुनि निवास करित असत ।। १७८ ।। (२१५ उत्तरोत्तर स्फुरत असलेल्या कर्कश अशा ज्या व्याघ्रांच्या डरकाळ्या त्यांच्या प्रतिध्वनीनी जेथे पर्वताचे प्रदेश शब्दमय झाले आहेत अशा ठिकाणी भयरहित होऊन ते निवास करीत असत ॥ १७९ ॥ सिंहाच्या बच्चांच्या कठोर अशा गलगर्जनानीं जे प्रतिध्वनियुक्त झाले आहे अशा वनात ते मुनि निर्भय होऊन राहत असत ॥ १८० ॥ शिररहित घडे जेथे नाचत आहेत व त्याच्याजवळ जेथे डाकिनींचे समूह फिरत आहेत, अधिक भयदायक घुबडांच्या धूत्कारानी जे वनप्रदेश घुमत आहेत, कोल्ह्यांचे अभद्र ज्या कोल्हे कुई - ( शब्द ) त्यानी जेथिल सर्व दिशांची मुखे व्याप्त झाली आहेत अशी जी महापितृवनेमोठ्या ज्या स्मशानभूमि तेथे हे मुनिराज राहत असत ।। १८१-१८२ ॥ ते नरश्रेष्ठ मुनि सिंहाप्रमाणे निर्भय होऊन पर्वताच्या गुहामध्ये राहत असत आणि त्यांची मने जिनोपदेशाला अनुसरणारी होती, निर्भय होती व आत्मस्वरूपात तत्पर राहत होती ।। १८३ ।। दाट अंधकाराच्या अनेक रात्री शेकडो हिंस्र प्राण्यानी व्याप्त अशा भयंकर वनभूमीमध्ये ध्यानात एकाग्र चित्त होऊन ते मुनि राहत असत ।। १८४ । जेथे रानटी हत्ती निवास करितात व जेथे वृक्षानी जेथील वनप्रदेश उंच सखल झाला आहे, होते ॥ १८५ ॥ Jain Education International त्यांच्या दातांच्या अग्रानी तुटलेले अशा अशा वनाचे प्रदेश त्या मुनिवर्यानी सेविले रानटी हत्तींच्या चीत्कारानी जे प्रतिध्वनियुक्त होत असत व रागावलेल्या सिंहानी व्याप्त अशा वनातील अनेक प्रदेशात ते मुनि निवास करीत होते ।। १८६ ॥ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy