SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 607
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५९६) महापुराण (४४-३५० शमिताखिलविघ्नसंस्तवस्त्वयि तुच्छोऽप्यपयात्यतुच्छताम् ।। शुचिशक्तिपुटेऽम्ब सन्धृतं नन मुक्ताफलतां प्रपद्यते ॥ ३५८ षटयन्ति न विघ्नकोटयो निकट त्वत्क्रमयोनिवासिनाम् ॥ पटवोऽपि फलं दवाग्निभिर्भयमस्त्यम्बुषिमध्यवर्तिनाम् ॥ ३५९ हृदये त्वयि सन्निषापिते रिपवः केपि भयं विषित्सवः॥ अमृताशिषु सत्सु सन्ततं विषभेदार्पितविप्लवः कुतः ॥ ३६० उपयान्ति समस्तसम्पदो विपदो विच्यतिमाप्नुवन्त्यलम् ॥ वृषभं वृषमार्गदेशिनम् अषकेतुद्विषमाप्नुषां सताम् ॥ ३६१ इत्थं भवन्तमतिभक्तिपथं निनीषोः प्रागेव बन्धकलयः प्रलयं व्रजन्ति ॥ पश्चादनश्वरमयाचितमप्यवश्यं सम्पत्स्यतेऽस्य विलसद्गुणभद्रभद्रम् ॥ ३६२ हे जिनेश्वरा, आपण सर्व प्रकारच्या विघ्नांना शान्त करणारे आहात. आपल्या गुणांचे स्तवन आम्ही अतिशय अल्प जरी केले तरी ते फार महत्वाला प्राप्त होते. निर्मल अशा शिंपल्याच्या जोडीमध्ये असलेले पाणी ते मोत्याच्या स्वरूपाला प्राप्त होते अर्थात् त्यातले पाणी मोती बनते. अर्थात् आपल्या गुणाचे स्तवन अल्प असले तरी ते महापुण्याला कारण होते ॥३५८॥ हे जिनदेवा, आपल्या दोन पायाजवळ जे राहतात त्यांच्यावर कोट्यवधि विघ्ने आली तरीही ती फल देण्यास समर्थ होत नाहीत. याला उदाहरण असे- जे समुद्राच्या मध्यभागी राहतात त्याना जंगलाच्या अग्नीचे भय असते काय ? ॥ ३५९ ॥ हे प्रभो, आपल्या हृदयामध्ये जेव्हा भक्त आपणास स्थापन करतो तेव्हा कोणीही शत्रु त्याला भययुक्त करू शकत नाही. जे नेहमी अमृतभक्षणच करतात त्याना विषभेदापासून भय कसे उत्पन्न होईल ? ॥ ३६० ॥ जिनधर्माच्या मार्गाचा उपदेश करणारे व जे मदनाचे शत्रु आहेत अशा आदिभगवंताचा आश्रय करणान्या भक्ताना सर्व संपत्ति प्राप्त होतात व सर्व विपत्ति पूर्ण नष्ट होतात ॥ ३६१॥ शोभत असलेल्या गुणानी भक्ताचे कल्याण करणाऱ्या हे जिनराजा, याप्रमाणे आपणास अतिशय भक्तीच्या मार्गात जो घेऊन जाण्याची इच्छा करीत आहे त्याचे कर्मबन्धाचे सगळे दोष प्रथमच नष्ट होतात व यानन्तर कधीही नाश न पावणारे व याचना न करताही मोक्षरूपी कल्याण त्याला अवश्य प्राप्त होईल ।। ३६२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy