________________
२८४)
महापुराण
(३५-१७
शातिव्याजनिगूढान्तविक्रियो निष्प्रतिक्रियः । सोऽन्तर्ग्रहोत्थितो वह्निरिवाशेषं बहेत्कुलम् ॥ १७ अन्तःप्रकृतिजः कोपो विधाताय प्रभोर्मतः। तरुशाखाप्रसंघट्ट-जन्मा वह्निर्यथा गिरेः ॥ १८ तदाशु प्रतिकर्तव्यं स बली वक्रतां श्रितः । क्रूर ग्रह इवामुष्मिन् प्रशान्ते शान्तिरेव नः ॥ १९ इति निश्चित्य कार्यज्ञं दूतं मन्त्रविशारदम् । तत्प्रान्तं प्राहिणोच्चकी निसृष्टार्थतयान्वितम् ॥ २० उचितं युग्यमारूढो वयसा नातिकर्कशः । अनुद्धतेन वेषेण प्रतस्थे स तवन्तिकम् ॥ २१ आत्मनेव द्वितीयेन स्निग्धेनानुगतो द्रुतम् । निजानुजीविलोकेन हस्तशम्बलवाहिना ॥ २२ सोऽन्वीपं वक्ति चेदेवमहं ब्रूयामकत्थनः । विगृह्य यदि स ब्रूयाद्विरहं विग्रहे घटे ॥ २३
भाऊबंदाच्या मिषाने या बाहुबलीने आपले आतील विचार गुप्त ठेवले आहेत. त्यामुळे त्याच्यावर काही इलाज करता येत नाही. हा बाहुबली घरात प्रकट झालेल्या आगीप्रमाणे सगळया कुलाला भस्म करून टाकील असे वाटते ॥ १७ ॥
झाडांच्या फांद्यांचे एकमेकाशी खूप जोराने घर्षण झाले असता अग्नि उत्पन्न होऊन तो जसा पर्वताच्या नाशाला कारण होतो तसा भाऊ, चुलता आदिक जे राजाचे अंतरंग संबंधी लोकात उत्पन्न झालेला कोप तो राजाच्या नाशाला कारण होतो ॥ १८ ॥
यावेळी बलवान् असा बाहुबली माझ्याशी वाकडा होऊन वागत आहे यास्तव त्याचा प्रतीकार शीघ्र केला पाहिजे. क्रूर ग्रह जसा वक्र झाला असता त्याची शान्ति करावी लागते तसे याला शान्त केले तरच आम्हाला शान्ति सुख मिळेल ।। १९ ॥
याप्रमाणे भरतेश्वराने निश्चय केला. सांगितलेले कार्य पूर्ण पार पाडण्यास जो समर्थ आहे, कार्याचे स्वरूप ज्याला चांगले समजले आहे व जो मागचा पुढचा विचार करण्यास समर्थ आहे असा दूत बाहुबलीकडे त्याने पाठविला ।। २० ॥
जो वयाने फार मोठा किंवा फार लहान नाही असा मध्यम वयाचा, ज्याचा वेश उद्धतपणाचा नाही अर्थात् नम्रतासूचक वेश ज्याचा आहे असा दूत योग्य वाहनावर बसून बाहुबली राजाकडे जाण्यास निघाला ।। २१ ।।
ज्याच्या हातात मार्गात खाण्यासाठी शिदोरी आहे व जो आपल्यावर प्रेम करीत आहे असा आपल्याला अनुकूल असलेला एक सेवक या दूताने बरोबर घेतला होता व तो दूत बाहुबलीकडे जाण्यासाठी निघाला ॥ २२॥
___ मार्गात याप्रमाणे विचार करीत तो दूत चालला. “जर तो बाहुबली माझ्याबरोबर अनुकूल भाषण करील तर मीही त्याच्याशी बढाई न करता योग्य असे भाषण करीन, अनुकूल बोलेन आणि जर तो विरुद्ध होऊन युद्धाची गोष्ट बोलेल तर युद्धविराम पावण्यास कारण असे बोलेन अर्थात् युद्धापासून काय हानि होते हे सांगून युद्धाची भाषा बोलण्यापासून त्याला परावृत्त करीन ।। २३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org