SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 277
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २६६) महापुराण (३४-१०५ किमम्भोजरजःपुञ्जपिञ्जरे वारि मानसे । निषेव्य राजहंसोऽयं रमतेऽन्यसरोजले ॥ १०५ किमप्सरःशिरोजान्तसुमनोगन्धलालितः । तुम्बीवनान्तमभ्येति प्राणान्तेऽपि मधुव्रतः ॥ १०६ मुक्ताफलाच्छमापीय गगनाम्बु नवाम्बुदात् । शुष्यत्सरोम्बु किं वाञ्छेदुदन्यन्नपि चातकः ॥१०७ इति युष्मत्पदाज्जन्मरजोरञ्जितमस्तकाः । प्रणब्तुमसदाप्तानामिहामुत्र च नेश्महे ॥ १०८ परप्रणामविमुखी भवसङ्गविजिताम् । वीरदीक्षां वयं धर्तुं भवत्पावमुपागताः॥ १०९ तद्देव कथयास्माकं हितं पथ्यं च कर्म यत् । येनेहामुत्र च स्याम स्वद्भक्तिदुढवासनाः ।। ११० परप्रणामसञ्जातमानभङ्गभयातिगाम् । पदवी तावकी देव भवेमहि भवेभवे ॥ १११ मानखण्डनसम्भूतपरिभूतिभयातिगाः । योगिनः सुखमेधन्ते वनेषु हरिभिः समम् ॥ ११२ ब्रुवाणानिति साक्षेपं स्थापयन्पथि शाश्वते । भगवानिति तानुच्चरन्वशादनुशासिता ॥ ११३ कमलाच्या परागसमूहाने पिवळे झालेल्या मानससरोवरातील पाणी पिऊन हा राजहंस अन्य सरोवराच्या पाण्यात रमतो काय ? ।। १०५ ।। अप्सरांच्या मस्तकावरील केसाना शोभविणाऱ्या फुलांच्या गंधाचे सेवन करणारा भुंगा प्राणान्तीही भोपळ्याच्या वनात प्रवेश करील काय ? नवीन मेघापासून निघालेले मोत्याप्रमाणे निर्मल असे आकाशजल पिऊन आनंदित झालेला चातक तहान लागली तरीही वाळणाऱ्या सरोवराचे पाणी तो इच्छील काय ? केव्हाही इच्छिणार नाही ।। १०६-१०७ ।। हे भगवन्ता, आपल्या पादकमलाच्या परागानी ज्यांची मस्तके रंगली आहेत असे आम्ही असदाप्त-रागादि दोषाने रहित नसलेले जे लोक आहेत त्याना नमस्कार करण्यास इच्छित नाहीत अर्थात् भरतही रागादि-दोषानी रहित नसल्यामुळे आम्ही त्यास नमस्कार करणार नाही ।। १०८ ॥ जी दुसऱ्याना नमस्कार करण्यापासून विमुख आहे, जी संसाराच्या संबन्धाने रहित आहे अशी वीरदीक्षा घेण्यासाठी आम्ही आपल्याजवळ आलो आहोत ।। १०९ ॥ म्हणून हे भगवंता, आपण आम्हाला हितकर व धर्ममार्गात सुखकर असे कार्य सांगा ज्यामुळे इहलोकी व परलोकीही आपल्या ठिकणीच आमच्या भक्तीची दृढवासना राहील ॥ ११० ॥ हे देवा, दुसऱ्याना नमस्कार करण्याने जो मानभंग होतो त्याच्या भयापासून आपली ही पदवी नेहमी दूर आहे म्हणून ती पदवी आम्हाला प्रत्येक जन्मात प्राप्त होवो ।। १११ ॥ मानाचे खंडन झाल्याने उत्पन्न होणारा जो पराभव व भय यापासून हे योगी दूर असतात. त्यामुळे ते वनात सिंहाबरोबर राहून सुखवृद्धीला प्राप्त होतात ।। ११२ ।। याप्रमाणे परतन्त्रजीवन हे दोषानी भरले आहे असे बोलणा-या त्या राजकुमाराना विनाशरहित मोक्षमार्गात स्थापन करणारे हितोपदेशी भगवान् वृषभजिन याप्रमाणे त्याना उपदेश करू लागले ॥ ११३ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy