SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 147
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महापुराण (२८-१९३ प्रहर्षिणी अप्सव्यस्तिमिरयमाजिघांसुरारादभ्येति । द्रुतमाभिभावकोऽप्सुयोनीन ॥ शैलोच्चानपि निगिलंस्तिमीनितोऽन्यो । व्यत्यास्ते समममुना युयुत्समानः ॥ १९३ पृथ्वी जलादजगरस्तिमि शयुमपि स्थलादण्डजो। विकर्षति युयुत्सया कृतदृडग्रहो दुर्ग्रहः ।। तथापि न जयो मिथोऽस्ति समकक्षयोरेनयोः । ध्रुवं न समकक्षयोरिह जयेतरप्रक्रमः ॥ १९४ वनं वनगजैरिदं जलनिधेः समास्फालितम् । वनं वनगजैरिव स्फुटविमुक्तसाराविणम् ॥ मृदङ्गपरिवादनश्रियमुपादधद्दिक्तटे । तनोति तटमुच्छलत्सपदि दत्तसम्मार्जनम् ॥ १९५ तरत्तिमिकलेवरं स्फुटितशुक्तिशल्काचितम् । स्फुरत्परुषनिःस्वनं विधृतरन्ध्रपातालकम् ॥ भयानकभितं जलं जलनिधेर्लसत्पन्नगप्रमुक्ततनुकृत्तिसंशयितवीचिमालाकुलम् ॥ १९६ इतो धतवनोऽनिलः शिशिरशीकरानाकिरन् । उपैति शनकैस्तटं द्रुमसुगन्धिपुष्पाहरः॥ इतश्च परुषोऽनिलःस्फुरति धौतकल्लोल । सात्कृतस्वनभयानकस्तिमिकलेवरानाधुवन ॥ १९७ इकडे या समुद्राच्या पाण्यात उत्पन्न झालेल्या अनेक मत्स्यांचा तिरस्कार करून त्यांना मारण्यास इच्छिणारा हा फार मोठा मासा याच पाण्यात उत्पन्न झाला आहे व अतिशय दुरून येत आहे व पर्वताप्रमाणे मोठ्या माशांनाही खाणारा हा दुसरा मोठा मासा पहिल्या माशाशी युद्ध करण्याच्या इच्छेने उभा राहिला आहे ॥ १९३ ।। । इकडे हा अजगर पाण्यातून कोण्या मोठ्या माशाला आपल्याकडे जमिनीवर ओढीत आहे व खूप मजबूत रीतीने पकडणारा मासा देखिल जमिनीपासून त्या अजगराला आपणाकडे ओढीत आहे. परंतु समान बल असणा-या दोघापैकी कोणाचा विजय व कोणाचा पराजय होत नाही. बरोबरच आहे की या जगात जे समानबलाचे असतात त्यांच्या परस्परात जयपराजयाचा निर्णय होत नसतो ॥ १९४ ।। रानटी हत्तींच्याद्वारे आपल्या सोंड आदिकानी अतिशय ताडन केले गेलेले हे समुद्राचे पाणी ज्यात रानटी हत्ती स्पष्टरूपाने गर्जना करीत आहेत अशा वनाप्रमाणे दिसत आहे व तसेच मृदंग वाजण्याच्या शोभेस धारण करीत आहे व दिशामध्ये उडणारे हे पाणी या समुद्र किनाऱ्याला अतिशय शीघ्रतेने स्वच्छ करीत आहे ॥ १९५ ।। या समद्राचे पाण्यात अनेक माशांची शरीरे तरंगत आहेत. व कोठे कोठे फुटलेल्या शिंपल्यांच्या तुकड्यानी हे समुद्रजल भरून गेले आहे. ज्यांच्यात कठोर शब्द होत आहेत, ज्याने आपल्या खोल छिद्रानी पाताळालाही धारण केले आहे व जे तरत असलेल्या सापांच्या कांतीनी लोकमनात असा संशय उत्पन्न करीत आहे की, जणु लहरीच्या समूहानींच व्याप्त होत आहे असे समुद्राचे पाणी या ठिकाणी फारच भयंकर होत आहे दिसत आहे ।। १९६ ।।। इकडे ज्याने वनाला हलविले आहे व शीतल जलबिदूंचा जो वर्षाव करीत आहे व वृक्षांच्या सुगंधितपुष्पांच्या सुगंधाला हरण करणारा हा वायु मन्दमन्दपणाने किनाऱ्याकडे Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy