SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 602
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४४-३२३) महापुराण (५९१ रक्तः करैः समाश्लिष्य सन्ध्यां सद्यो व्यरज्यत । वदन्निव रवि गान्पर्यन्तविरसान्स्फुटम् ॥ ३१६ पर्यष्वजोत्पुरता स्वां सन्ध्यामिति सेय॑या। रवि रक्तमपि स्थित्यै प्राच्यक्षमत न क्षणम्॥३१७ शयित्वा वीरशय्यायां निशां नीत्वा नियामिनः । स्नात्वा सन्तपिताशेषदीनानाथवनीपकाः ॥३१८ अञ्चित्वा विधिना स्तुत्वा जिनेन्द्रांस्त्रिजगन्नतान् । अतिष्ठन्नायकाः सर्वे परिच्छिद्य रणोन्मुखाः ॥ अरिजयाख्यमारुह्य रथं श्वेताश्वयोजितम् । गृहीत्वा वज्रकाण्डं च वत्तं यच्चक्रिणा पुरा ॥३२० बन्दिमागधवृन्देन वन्द्यमानाङ्कमालिकः । गजध्वजं समुत्थाप्य जयलक्ष्मीसमुत्सुकः ॥ ३२१ जयो ज्यास्फालनं कुर्वन्कृतान्तविकृताकृतिः। द्विपानां भीषणस्तस्थौ दिशामप्याहरन्मदम् ॥ ३२२ उपोदयायशस्कीतिरकोतिश्च्युतच्छविः । कारागारमिवाध्यास्य स्यन्दनं मन्दवाजिनम् ॥ ३२३ रक्त -प्रेम करणारा-दु. अ. रक्तवर्णयुक्त असा सूर्य आपल्या किरणानी सन्ध्येला आलिंगून जणु हे भोगाचे पदार्थ शेवटी खरोखर विरस असतात असे जणु बोलणारा तो तत्काल विरक्त झाला ॥ ३१६ ॥ ह्या सूर्याने आल्याबरोबर आधी संध्येला आलिंगन दिले म्हणून जणु ईयेने पूर्वदिशेने आसक्त असलेल्या अशाही त्याला आपल्याजवळ क्षणपर्यन्तही राहू दिले नाही ॥ ३१७ ।। ___ व्रतपालनात तत्पर अशा वीरपुरुषांनी ती सर्व रात्र वीरशय्येवर घालविली. नंतर त्यानी स्नान केले दीन, अनाथ अशा याचकाना त्यानी दान देऊन संतुष्ट केले. योग्य विधीने त्रैलोक्य ज्याच्या चरणी नम्र झाले आहे अशा जिनेश्वराची त्यानी विधीपूर्वक पूजा व स्तुति केली. नंतर ते सर्व श्रेष्ठ वीरनायक आपल्या सैन्याची विभागणी करून युद्धासाठी सज्ज झाले ॥ ३१८-३१९ ।। यानंतर ज्याला पांढरे घोडे जोडले आहेत अशा अरिञ्जय नामक रथावर जयकुमार बसला व पूर्वीच चक्रवर्तीने दिलेले वज्रकाण्ड नांवाचे धनुष्य त्याने घेतले. भाट व मागध-स्तुति पाठक यांच्या समूहाकडून ज्याच्या पराक्रमादिगुणांचे वर्णन केले गेले असा तो जयकुमार जयलक्ष्मी मिळविण्याविषयी उत्सुक झालेला होता व त्याची आकृति यमाप्रमाणे भयंकर झालेली होती. तेव्हा त्याने आपल्या हातातील धनष्याच्या दोरीचा टंकार केला तेव्हा त्या भयंकर टंकाराने आठ दिशांच्या मुख्य गजांच्या मदाचा-मस्तीचाही नाश झाला ॥ ३२०-३२२॥ ज्याच्या अपकीर्तीचा उदयकाल जवळ आला आहे व त्यामुळे ज्याची देहकान्ति नाहीशी झाली आहे, असा अर्ककीर्तिकुमार ज्याचे घोडे मंद गमन करीत आहेत व जो तुरुंगाप्रमाणे वाटत आहे अशा रथात बसला. नष्ट झालेल्या चन्द्राप्रमाणे निस्तेज दिसणा-या अष्ट चन्द्रविद्याधर राजे ज्याचे मित्र आहेत असा तो अर्ककीर्ति भावी अनिष्ट सुचविणा-या धूमकेतुप्रमाणे दिसणारे चक्रचिह्नाने युक्त अशा ध्वजाने युक्त होता. उलट वाहणा-या वान्यामुळे ज्यांचा वेग बंद झाला आहे व देवतांचा घात करण्यास कारण अशा बाणानी जो दिवसाच्या मध्यभागी आलेल्या सूर्याप्रमाणे भासत असलेल्या जयकुमारावर प्रहार करीत आहे असा अर्ककोति युद्धाला निघाला. दुष्ट कर्माने ज्याला पुढे ढकलले आहे असा तो अर्ककोति Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy