________________
४६-१६५)
महापुराण
(६४३
अन्येयुः खचराधीशो घोषयित्वा स्वयंवरम् । सिद्धकूटाख्यचैत्यालयस्य मालां पुरः स्थिताम् ॥ १५७ जपातयन्महामेरोस्त्रिः परीत्य महीतलम् । अस्पृष्टां खेचराः केचितां ग्रहीतुमनीश्वराः ॥ १५८ त्रपां गताः समादाय प्रभावत्या विनिजिताः । समो ननु न मृत्युश्च मानभङ्गन मानिनाम् ॥ १५९ ततो हिरण्यवर्मायाद्गतियुद्धविशारदः । मालामासञ्जयामास तत्कण्ठे तेन निजिता ॥ १६० तयोर्जन्मान्तरस्नेहसमृद्धसुखसम्पदा । काले गच्छति कस्मिश्चित्कपोतद्वयदर्शनात् ॥ १६१ ज्ञातप्राग्भवसम्बन्धा सुविरक्ता प्रभावती । स्थिता शोकाकुलकैव चिन्तयन्ती किमप्यसौ ॥ १६२ हिरण्यवर्मणा ज्ञातजन्मना लिखितं स्फुटम् । पट्टकं प्रियकारिण्या हस्ते समवलोक्य ताम् ॥ १६३ क्व लब्धमिदमित्याख्यत्प्राह सापि प्रियेण ते । लिखितं चेटकस्तस्य सुकान्तो मे समर्पयत् । १६४ इति तद्वचनं श्रुत्वा स्वयमप्यात्मवृत्तकम् । प्राक्तनं पट्टके तस्य लिखित्वासौ करे ददौ ॥ १६५
मग दुसऱ्या दिवशी वायुरथविद्याधराधीशाने स्वयंवराची घोषणा करताना असे सांगितले- "एक माला सिद्धकूट चैत्यालयाच्या पुढे सोडली जाईल. जो कोणी विद्याधर ती माला सोडल्यानंतर महामेरुपर्वताला तीन प्रदक्षिणा देऊन प्रभावतीच्या आधी ती माला जमिनीवर पडण्याच्या पूर्वी ग्रहण करील तो प्रभावतीचा पति होईल. ही घोषणा ऐकून पुष्कळ विद्याधरानी प्रयत्न केला पण ती माला ग्रहण करण्यास ते असमर्थ झाले. पण प्रभावतीने ती माला घेऊन त्या विद्याधराना जिंकले तेव्हा त्याना फार लाज वाटली. जे अभिमानी असतात ते मृत्यूला देखिल मानभंगाच्या बरोबरीचा मानीत नाहीत. मानभंग होणे मृत्यूपेक्षा देखिल अतिशय दुःखाचे मानतात ॥ १५७-१५९ ॥
यानन्तर गतियुद्धात प्रवीण असलेला हिरण्यवर्मा आला व त्याने तिला- प्रभावतीला जिंकले तेव्हा तिने त्याच्या गळ्यात माला घातली ॥ १६० ॥
त्या दोघाच्या पूर्वजन्माच्या स्नेहसम्बन्धामुळे वृद्धिंगत झालेल्या सौख्याच्या सम्पदेने काल जात असता कोणे एके वेळी दोन कबूतरे तिला दिसली ।। १६१ ।।।
त्याना पाहून पूर्वभवाच्या संबंधाचे ज्ञान प्रभावतीला झाले. ती अतिशय विरक्त झाली व एकटीच मनात काही तरी चिन्तन करीत शोकाने व्याकुळ होऊन बसली ॥ १६२ ॥
ज्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले आहे अशा त्या हिरण्यवर्माने एक पट्टक लिहिला. तो प्रियकारिणीच्या हातामध्ये असलेला प्रभावतीने पाहिला व तुला हा कोठे मिळाला असे विचारले तेव्हा तिनेही असे सांगितले-हे प्रभावती, तुझ्या पतीने हा लिहिला आहे व त्याने तो सुकान्त नामक नोकराला दिला व त्याने तो मला दिला आहे. हे तिचे भाषण ऐकून त्या प्रभावतीनेही त्या पट्टकात स्वतःचे वृत्त नमूद केले-लिहिले व ते तिच्या हातात दिले ॥ १६३-१६५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org