SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 634
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (६२३ ४५-२११) भोगास्तृष्णाग्निसंवृद्ध दीपनीयौषधोपमाः । एभिः प्रवृद्धतृष्णाग्नेः शान्त्यै चिन्त्यमिहापरम् ॥२०३ इत्यतो न सुधीः सद्यो वान्ततृष्णाविषो भृशम् । हेमाङ्गदं समाहूय पूज्यपूजापुरःसरम् ॥ २०४ अभिषिच्य चलां मत्वा बद्ध्वा पट्टेन वाचलम् । लक्ष्मीं समयं गत्वोच्चैरभ्यासं वृषभेशितुः ॥ २०५ प्रव्रज्य बहुभिः सार्धं मूर्धन्यः स ससुप्रभः । क्रमाच्छ्रेणीं समारुह्य कैवल्यमुदपादयत् ॥ २०६ अथ जन्मान्तरायात महास्नेहातिनिर्भरः । सुलोचनाननानन्दनेन्दुबिम्बात्सुतां सुषाम् ॥ २०७ उन्मीलनीलनीरेजराजिभिर्लोचनैः पिबन् । पूरयन् श्रोत्रपात्राभ्यां तद्गीर्गीतरसायनम् ॥ २०८ हरन्करिकराकारकरालिङ्गनसङ्गतः । तद्गात्रकूपिकान्तःस्थं रसं स्पर्शनवेदिनम् ॥ २०९ तद्विम्बाधरसम्भावितामृतास्वादनोत्सुकः । तद्वक्त्रवारिजामोदान्मोदमानोऽनिशं भृशम् ॥ २१० अत्रैव न पुनर्वेति मम वामासमागमः । स सुलोचनया स्वानि चक्षुरादीन्यतर्पयत् ॥ २११ महापुराण एखादे औषध उदरातील अग्नि वाढविण्यास कारण असते. तसे हे भोग लोभरूप अग्नीला वाढविण्यास कारण आहेत. या भोगानी तृष्णारूपी अग्नि वाढतो. तेव्हा त्या अग्नीच्या शमनाकरिता येथे दुसन्या एखाद्या औषधाच्या उपयोगाचा विचार केला पाहिजे. भोगाच्या उपभोगाने भोगाची इच्छा शमत नाही ती उलट वाढतेच म्हणून त्या इच्छेचे शमन करण्यासाठी भोग भोगणे हा उपाय नाही. याहून वेगळाच उपाय हुडकला पाहिजे ॥ २०३ ॥ अशा रीतीचा विचार करून त्या सुबुद्धीच्या अकम्पनराजाने सगळे तृष्णाविष पूर्ण ओकून टाकले आणि त्याने आपल्या हेमाङ्गद पुत्राला बोलाविले. प्रथमतः पूज्य जिनेश्वराची पूजा केली व नंतर हेमाङ्गदाचा राज्याभिषेक केला आणि चंचललक्ष्मीला पट्टाने बांधून निश्चल केले. या रीतीने त्याला राजाने राज्यलक्ष्मी अर्पण केली व नंतर तो वृषभजिनेश्वराजवळ गेला व अनेकराजासह आपल्या सुप्रभाराणीसह त्याने दीक्षा घेतली. क्रमाने क्षपक श्रेणीच्या गुणस्थानावर आरोहण करून मोहादि चार घातिकर्माचा नाश केला व तो केवलज्ञानी झाला ।। २०४-२०६ ॥ पूर्वजन्मापासून चालत आलेली जी मोठी प्रीति तिने हा जयकुमार अतिशय भरलेला होता. सुलोचनेचा मुखरूपी जो आनन्ददायक चन्द्र त्यापासून निघालेली जी सुधा म्हणजे जे अमृत ते विकसित होणाऱ्या नीलकमलपंक्तिसारख्या डोळ्यानी तो प्राशन करीत असे व आपल्या दोन कानरूपी पात्रानी तिचे भाषण व तिचे गायनरूपी जे रसायन ते भरून घेणारा, हत्तीच्या सोंडेप्रमाणे ज्यांचा आकार आहे अशा हातानी सुलोचनेच्या शरीराला आलिंगून त्या शरीररूपी कूपिकेंत असलेल्या रसाला तो स्पर्शनाने जाणत असे ।। २०७ - २०९ ॥ तिच्या तोंडल्याप्रमाणे असलेल्या अधरातील अमृताचे आस्वादन करण्यात तो उत्सुक होता. तिच्या मुखरूपी कमलाच्या सुगन्धाने नेहमी अतिशय आनन्दित होणारा, याच भवात मला स्त्रीचा समागम होईल पुढे होणार नाही म्हणून जणु त्या सुलोचनेच्या द्वारे आपल्या डोळे, क वगैरे पाचही इन्द्रियाना त्याने तृप्त केले ।। २१०-२११ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy