________________
६२२)
महापुराण
(४५-१९८
सापि वष्टयपरं कष्टमनिष्टेष्टपरम्परा । यदिष्टं तदनिष्टं स्याद्यदनिष्टं तविष्यते ॥ १९८ इहेष्टानिष्टयोरिष्टा नियमेन नहि स्थितिः । स सा सा तत्तदेवैषा सा स स्यात्सोऽपि तत्पुनः ॥
तत्स स्यात्तत्तदेवात्र चक्रके वक्रसङक्रमः। अन्तमस्य विधास्यामि चिन्तयित्वा जिनोदितम् ॥
सन्ततं जन्मकान्तारभ्रान्तौ भीतोऽहमन्तकात् ॥ २०० भोगोऽयं भोगिनो भोगो भोगिनो भोगिनामकृत् । तावन्मात्रोऽपि नास्माकं भोगो भोगेष्विति ध्रुवम्॥ भुज्यते यः स भोगः स्याद्भुक्तिर्वाभोग इष्यते । तद्वयं नरकेऽप्यस्ति तस्माद्भोगेषु का रतिः॥२०२
जी वस्तु आपणास प्रिय वाटते ती अप्रियही होते व जे अप्रिय असते ते प्रियही होते. यास्तव या जगात प्रिय अप्रिय यांची नियमाने एकच अवस्था असते असे नाही ।। १९८ ॥
जो स-पुरुष आहे तो सा-स्त्री होईल. अन्यभवी त्याला स्त्रीपणा प्राप्त होईल व जी स्त्री आहे ती अन्यजन्मी नपुंसक होईल व तो नपुंसकही स्त्री होईल. ती स्त्री पुरुष होईल. तो पुरुष पुनः ते- नपुंसक होईल व जो नपुंसक आहे तो अन्य जन्मीही पुनः नपुंसक होईल. याप्रमाणे या संसारचक्रात वक्रगति आहे असे याचे स्वरूप आहे ।। १९९ ।।
यास्तव श्रीजिनेश्वराच्या उपदेशाचा विचार करून मी ( अकंपन राजा ) या संसारचक्राचा नाश करीन कारण की मी नेहमी जन्म घेणेरूप जंगलात म्रमण करण्याच्या कार्यात अन्तकापासून-मृत्युपासून फार भ्यालो आहे ।। २०० ।।।
ज्याचा एक वेळ अनुभव घेता येतो त्या अन्नादि पदार्थाला भोग म्हणतात पण हे भोगअन्नादि पदार्थ भोगिनः सर्पाच्या भोग:- शरीराप्रमाणे आहेत. अर्थात हे अन्नादिपदार्थ सर्प शरीराप्रमाणे प्राणहारक आहेत. हे भोग ज्याच्याजवळ आहेत त्याला भोगी म्हणतात. अर्थात् हे भोग ज्याच्याजवळ आहेत त्याला भोगि या नांवाने युक्त करतात. परंतु खरे पाहिले असता हे भोग आमचे म्हणजे जीवांचे नाहीत. जीव व हे भोग पदार्थ एकमेकापासून सर्वथा वेगळे आहेत. जीवाचे भोग हे स्वरूप नाही. यास्तव भोग भोगामध्येच निश्चितपणे राहणार आहेत. आत्म्याशी त्यांचा काही संबंध नाही ॥ २०१॥
ज्याचा भोग घेतला जातो त्याला भोग म्हणतात. अर्थात् विषयाला भोग म्हणतात. किंवा उपभोग घेणे त्यालाही भोग म्हणतात. हे दोन्हीही (विषय व उपभोग घेणे ) नरकातही असतात म्हणून भोगामध्ये रति-प्रेम करणे आसक्त होणे हे कशाला ? भोगामध्ये आसक्ति ठेवणे हे नरकदुःखाची प्राप्ति करून घेण्यास कारण आहेत. यास्तव भोगामध्ये केव्हाही रति करू नये ॥ २०२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org