________________
६८६)
(४७-२२७
तदा सागरदत्ताख्यः स्वर्गलोकात्समागतः । पुत्रो हरिवरो जातः स पुरूरवसः प्रियः ॥ २२७ समुद्रदत्तो ज्वलनवेगस्याजनि विश्रुतः । तनुजो धूमवेगाख्यो विद्याविहितपौरुषः ॥ २२८ स वैश्रवणदत्तोऽपि भूतोऽत्राशनिवेगकः । श्रेष्ठी स सर्वदयितः श्रीपालस्त्वमिहाभवः ।। २२९ त्वं जामातुनिराकृत्या सनाभिभ्यो वियोजितः । तदात्वद्वेषिणोऽस्मश्च तव द्वेषिण एव ते ।। २३० तदा प्रियास्तवात्रापि सञ्जाता नितरां प्रियाः । अहिंसयाभंकस्यासीद् बन्धुभिस्तव सङ्गमः ॥२३१ तत्तपःफलतो जातं चक्रित्वं सकलक्षितेः । सर्वसङ्ग परित्यागान्मङ्क्षु मोक्षं गमिष्यसि ॥ २३२ अथोदीरिततीर्थेशवचनाकर्णनेन ते । सर्वे परस्पर द्वेषाद्विरमन्ति स्म विस्मयात् ॥ २३३ जन्म रोगजरामृत्यू न्निहन्तुं सन्ततानुगान् । संनिधाय धियं धन्योऽवात्सीद्धर्मामृतं ततः ॥ २३४
महापुराण
पूर्वी जो सागरदत्त होता तो स्वर्गाहून येऊन आता पुरूरवस राजाचा प्रिय पुत्र हरिवर झाला आहे ।। २२७ ॥
जो पूर्वभवात समुद्रदत्त होता आता ज्वलनवेग नामक राजाचा पराक्रम करणारा धूमवेग नामक पुत्र झाला आहे व त्याने आपल्या विद्यांच्या द्वारे आपला पराक्रम दाखविला आहे ।। २२८ ।।
तो वैश्रवणदत्त देखिल आता अशानिवेग झाला आहे आणि जो पूर्वजन्मी सर्वदयित श्रेष्ठी होता तो आता श्रीपाल झाला आहे ॥ २२९ ॥
श्रीपाला तू पूर्वजन्मी आपल्या भाचाला जितशत्रूला आपल्या मातेपासून वेगळे केले होतेस म्हणून जे तुझे भाऊबंद आहेत त्यांच्यापासून तूं वियोजित केला गेला होतास. जे मागच्या जन्मात तुझे द्वेषी होते ते याजन्मीही तुझे द्वेषीच झाले आहेत व जे मागच्या जन्मी तुझे प्रिय होते ते या जन्मीही तुला अतिशय आवडते झाले आहेत व तूं त्या बालकाची हिंसा केली नव्हतीस म्हणून आता तुझा तुझ्या आप्त नातलगाशी संगम झाला आहे ।। २३०-२३१ ।।
मागच्या जन्मी जे तप केले होते त्याच्या फलामुळे तुला सर्व पृथ्वीचे स्वामित्व मिळाले आहे व सर्व परिग्रहांच्या त्यागामुळे शीघ्र तुला मोक्षाची प्राप्ति होईल ।। २३२ ।।
याप्रमाणे तीर्थंकरापासून प्रकट झालेल्या वचनाच्या श्रवणात त्या सर्वानी आश्चर्यचकित होऊन परस्पराविषयीच्या द्वेषाचा त्याग केला ॥ २३३ ॥
नेहमी प्राण्याना अनुसरणारे असे जे जन्म, रोग व मृत्यु त्यांना नष्ट करण्यासाठी बुद्धीला स्थिर करून त्या धन्य श्रीपालाने त्या तीर्थंकरापासून मिळालेले धर्मामृताचे प्राशन केले ।। २३४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org