________________
४७-२२६)
महापुराण
(६०५
स वैश्रवणदत्तोऽपि स ससागरदत्तकः । साधं समुद्रदत्तेन मात्सर्याच्छेष्ठिनःस्थिताः ॥ २१६ दुस्सहे तपसि श्रेयो मत्सरोऽपि क्वचिन्नृणाम् । अन्येजितशत्रु तं दृष्ट्वा श्रेष्ठी कुतो भवान् ॥२१७ समुद्रवत्तसारूप्यं वत्संसदमागतः । इति पप्रच्छ सोऽप्यात्मागमनक्रममब्रवीत् ॥ २१८ मान्यो मदागिनेयोऽयमिति तस्तसंस्थिताम् । मुद्रिका वीक्ष्य निश्चित्य निःपरीक्षकतां निजाम् ॥ मैथुनस्य च संस्मृत्य तस्मै सर्वश्रियं सुताम् । धनं श्रेष्ठिपदं चासो दत्वा निविण्णमानसः ॥ २२० जयधामा जयभामा जयसेना तथा परा। जयदत्ताभिधाना च परा सागरदत्तिका ॥ २२१ सा वैश्रवणवत्ता च परे चोत्पन्नबोधकाः । सञ्जातास्तैः सह श्रेष्ठी संयम प्रत्यपद्यत ॥ २२२ मुनि रतिवरं प्राप्य चिरं विहितसंयमाः। एते सर्वेऽपि कालान्ते स्वर्गलोकं समागमन् ॥ २२३ प्रान्ते स्वर्गादिहागत्य जयधामा तदातनः । वसुपालोऽत्र सजातो जयभामाप्यजायत ॥ २२४ जयवत्यात्तसौन्दयों जयसेनाजनिष्ट सा । पिप्पली जयदत्ता तु वत्यन्तमदनाभवत् ॥ २२५ विद्युद्वेगाभवद्वेश्रवणवत्ता कलाखिला । जाता सागरदत्तापि स्वर्गादेत्य सुखावती ॥ २२६
तो वैश्रवणदत्त व सागरदत्त आणि समुद्रदत्त हे सगळे सर्वदयित श्रेष्ठीवर मत्सरभाव धारण करून दुःसह अशा तपांत तत्पर झाले. बरोबरच आहे की कोठे कोठे मत्सर देखिल मनुष्याला श्रेयस्कर होतो. एके वेळी जितशत्रूला श्रेष्ठीने आपल्या सभेत आलेला पाहिले तो समुद्रदत्ताशी अगदी समान दिसत होता व आपण कोठून आला असे त्याने त्याला विचारिले. तेव्हा त्याने आपल्या येण्याचा क्रम सांगितला ।। २१६-२१०॥
हा मनुष्य इतर कोणी नाही तर हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे असे सर्वदयित श्रेष्ठीच्या ध्यानात आले व त्याच्या हातातील आंगठी पाहून तर त्याचा निश्चय झाला व आपणाला परीक्षा करता आली नाही असे त्याने ठरविले. त्याला आपल्या. मेहुण्याचेही स्मरण झाले व त्याने त्याला आपली सर्वश्री नांवाची कन्या दिली व आपले धन व श्रेष्ठीपदही दिले व तो स्वतः संसारविरक्त झाला ।। २१९-२२० ॥
जयधामा, जयभामा, जयसेना व जयदत्ता आणि सागरदत्ता, तथा वैश्रवणदत्ता व इतर- ज्याना आत्मबोध झाला आहे असे जे इतर सज्जन लोक त्यांच्यासह श्रेष्ठीने संयमाचा स्वीकार केला ॥ २२१-२२२ ॥
___ या सर्वांनी रतिवर नामक मुनिराजाजवळ जाऊन संयम धारण केला व त्याचे त्यांनी दीर्घकालपर्यन्त पालन केले व ते सगळे आयुष्यान्ती स्वर्गलोकात जन्मले ।। २२३ ।।
स्वर्गातील आयुष्य समाप्त झाल्यावर जयधामा विद्याधर येथे वसुपाल राजा झाला व जी जयधामा त्याची स्त्री होती ती या जन्मी अतिशय सुन्दर अशी जयवती झाली. जी मागील जन्मी जयसेना होती ती या जन्मी पिप्पली झाली व जी जयदत्ता होती ती या जन्मी मदनवती झाली. जी मागील जन्मी वैश्रवणदत्ता होती ती या जन्मी विद्युद्वेगा झाली व जी पूर्वजन्मी सागरदत्ता होती ती स्वर्गातून येऊन येथे या जन्मी सुखावती झाली आहे ॥ २२४-२२६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org