SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 361
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३५०) ( ३७-४९ इत्यनङ्गमयीं सृष्टि तन्वानाः स्वाङ्गसङ्गिनीम् । मनोऽस्य जगृहुः कान्ताः कान्तैः स्वैः कामचेष्टितैः ॥ तासां मृदुकरस्पर्शैः प्रेमस्निग्धैश्च वीक्षितैः । महती धृतिरस्यासीज्जल्पितैरपि मन्मनैः ॥ ५० स्मितेष्वासां दरोद्भिन्नो हसितेषु विकस्वरः । फलिनः परिरम्भेषु रसिकोऽभूद्रतिद्रुमः ॥ ५१ क्षेपयन्त्र पाषाणैर्दृक्क्षेपक्षेपणीकृतैः । बहु दुर्गवणस्तासां स्मरोऽभूत्स कचग्रहः ॥ ५२ खरः प्रणयगर्भेषु कोपेष्वनुनये मृदुः । स्तब्धो व्यलीकमानेषु मुग्धः प्रणयकैतवे ॥ ५३ निर्दयः परिरम्भेषु सानुज्ञानो मुखार्पणे । प्रतिपत्तिषु संमूढः पटुः करणचेष्टिते ॥ ५४ सङ्कल्पेष्वाहितोत्कर्षो मन्दः प्रत्यग्रसङ्गमे । प्रारम्भे रसिको दीप्तः प्रान्ते करुणकातरः ।। ५५ इत्युच्चावचतां भेजे तासां दीप्तः स मन्मथः । प्रायो भिन्नरसः कामः कामिनां हृदयङ्गमः ॥ ५६ प्रकाममधुरानित्थं कामान्कामातिरेकिणः । स ताभिनिविशन्रेजे वपुष्मानिव मन्मथः ॥ ५७ महापुराण याप्रमाणे आपल्या शरीराच्या सर्व अवयवात पूर्ण भरलेली व मदनपरिपूर्ण अशा नवीन सृष्टीला जणु उत्पन्न करणाऱ्या त्या सुन्दर स्त्रियानी मनोहर काम चेष्टितानी या भरतेश्वराच्या मनाला आकर्षित केले होते ।। ४९ ।। त्या स्त्रियांच्या मृदु हातांच्या स्पर्शाने, प्रेमळ व स्निग्ध अशा पाहण्यानी व मधुर अशा भाषणानी या भरतेश्वराला फार आनंद वाटत असे ।। ५० ।। या सुन्दर स्त्रिया गालात अस्पष्ट हसू लागल्या म्हणजे अंकुरयुक्त होणारा, स्पष्ट हसू लागल्या म्हणजे पुष्पानी लकडणारा आणि या स्त्रियानी आलिङ्गनें दिली असतां फलयुक्त होणारा असा संभोगरूपी वृक्ष मोठारसयुक्त झाला ।। ५१ ।। भुवया उडविणे हेच जणु दगड आणि तेच दृष्टिकटाक्षरूपी गोफणीने फेकणे, यामुळे त्या स्त्रियांचें जे भरतराजाशी बिकट रतियुद्ध होत असे. त्यात मदन हा त्यांचे केश धरणारा झाला ।। ५२ ॥ ज्याच्या पोटी प्रेम आहे अशा कोपाच्या वेळी मदन कठोर होत असे. प्रियेचे आराधन करते वेळी तो मृदु होत असे. कृत्रिम रुसव्याच्या प्रसंगी ताठर होत असे. प्रेमपूर्ण कपटाचे वेळी तो मदन भोळा होत असे ।। ५३ ।। आलिंगनाचे वेळी तो निर्दय होई. चुंबनाचे वेळी आपली संमति दर्शविणारा, स्वीकार करते वेळी विचाररहित होणारा, मोहक हावभाव करण्याचे वेळी, हा मदन अतिशय चतुर होत असे. अमुक एक गोष्ट करावयाची अशा संकल्पाच्या वेळी आनंदित होणारा, नवीन संगमाचे वेळी थोडासा मंद होणारा, संभोगाच्या वेळी रसिक व दीप्त आणि सुरतक्रीडेच्या शेवटी करुणायुक्त, असा तो कामदेव होत असे. याप्रमाणे त्या सुन्दरींच्या ठिकाणी वृद्धि पावलेला तो मदन त्या त्या प्रसंगास अनुसरून न्यूनाधिक भाव धारण करीत होता. बहुत करून निरनिराळा होऊन मदन विलासी जनाना आवडता होत असतो ।। ५४-५६ ॥ याप्रकारे अतिशय मधुर व इच्छेपेक्षा अधिक अशा भोगांना त्यांच्यासह भोगणारा हा भरतचक्री मूर्तिमन्त जणु मदन आहे असे वाटत असे || ५७ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy