________________
३७-४८)
सत्यं महेषुधी जङ्घे तासां मदनधन्विनः । कामस्यारोहनिःश्रेणीस्थानीयावूरुदण्डको ॥ ४१ कटी कुटी मनोजस्य काञ्ची सालकृतावृतिः । नाभिरासां गभीरैका कूपिका चित्तजन्मनः ॥ ४२ मनोभुवोऽतिवृद्धस्य मन्येऽवष्टम्भयष्टिका । रोमराजिः स्तनौ यासां कामरत्नकरण्डकौ ॥ ४३ कामपाशायितौ बाहू शिरीषोद्गमकोमलौ । कामस्योच्छ्वसितं कण्ठः सुकण्ठीनां मनोहरः ॥ ४४ मुखं रतिसुखागारप्रमुखं मुखबन्धनम् । वैराग्यरससङ्गस्य तासां च रदनच्छदः ॥ ४५ दृग्विलासाः शरास्तासां कर्णान्तौ लक्ष्यतां गतौ । भ्रूवल्लरी धनुर्यष्टिजिगीषोः पुष्पधन्विनः ॥ ४६ ललाटाभोगमेतासां मन्ये बाह्यालिकास्थलम् । अनङ्गनृपतेरिष्टभोगकन्दुकचारिणः ॥ ४७ अलकाः काम कृष्णाहेः शिशवः परिपुञ्जिताः । कुञ्चिताः केशवल्लय मदनस्येव वागुराः ॥ ४८
महापुराण
त्या स्त्रियांच्या पायांच्या पिंड या मदनाचे बाण ठेवण्याचे जणु भाते आहेत व त्यांच्या मांडया कामदेवाला वर चढण्यास जिन्याच्या स्थानी होत्या ॥ ४१ ॥
( ३४९
स्त्रियांची कंबर हे मदनाचे घर आहे व कमरपट्टा हा त्या घराचा तट आहे व स्त्रियांची बेंबी ही मदनाची गंभीर अशी कूपिका- छोटी विहीर आहे ॥ ४२ ॥
स्त्रियांच्या पोटावर असलेली बारीक रोमपंक्ति ही अतिशय वृद्ध झालेल्या मदनाची त्याला आधार देणारी जणु काठी आहे असे दिसते. स्त्रियांचे दोन स्तन रत्ने ठेवण्यासाठी कामदेवाचे जणु दोन करडे आहेत ।। ४३ ।।
त्या चक्रवर्तीच्या स्त्रियांचे बाहू शिरीषपुष्पाप्रमाणे कोमल होते व मदनाच्या पाशाप्रमाणे दीर्घ होते. त्या सुन्दरींचा मनोहर असा गळा मदनाच्या उच्छ्वासाप्रमाणे होता ॥ ४४ ॥
त्यांचे तोंड संभोगसुखाच्या मंदिराचा जणु दरवाजा होते आणि त्यांचे ओठ वैराग्य रसाचा स्पर्श बंद करण्यास जणु आगळीसारखे होते ।। ४५ ।।
त्यांचे नेत्रविलास कटाक्ष हे जणु बाण होते आणि कानांच्या पाळ्या त्या बाणानी वेधण्याचे स्थाननिशान होते. त्यांच्या वेलीसारख्या भुवया जगाला जिंकण्याची इच्छा करणाऱ्या मदनाच्या धनुष्याप्रमाणे होत्या ।। ४६ ।।
ह्या स्त्रियांचा विस्तृत जो कपाळाचा प्रदेश होता, तो आवडते भोगरूपी चेंडू खेळणान्या मदनरूपी राजाचे बाह्य खुले क्रीडा करण्याचे जणु मैदान होते असे मला वाटते ।। ४७ ।।
Jain Education International
त्या स्त्रियांच्या कपाळाजवळचे बारीक आखुड केश हे मदनरूपी काळया सर्पांची लहान पोरे जणु एके ठिकाणी पुंज रूपाने जमली आहेत असे दिसत होते आणि बाकीच्या थोडे थोडे वाकड्या झालेल्या केशलता जणु मदनाच्या जाळया आहेत अशा भासत होत्या ॥ ४८ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org