SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 115
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १०४) महापुराण (२७-१२० हरिद्रारञ्जितश्मश्रुः कज्जलाङ्कितलोचनः । कुट्टिनीमनुयन्नेष प्रवयास्तरुणायते ॥ १२० इति प्रयाणसञ्जल्पैरजाताध्वपरिश्रमाः । सैनिकाः शिबिरं प्रापन्सेनान्या प्राङनिवेशितम् ॥ १२१ तत्रावरोधनवधूमुखच्छायाविलजिनि । मध्यन्दिनाधिपे सम्राट् सम्प्राप शिबिरान्तिकम् ॥ १२२ छत्ररत्नतच्छायो दिव्यं रथमधिष्ठितः । न तदातपसम्बाधां विदामास विशाम्पतिः ॥ १२३ वर्षीयोभिरथासन्नरारब्धमुखसंकथः । प्रयातमपि नावानं विवेद भरताधिपः ॥ १२४ नोद्धातः कोप्यभूदङ्गे रथाङ्गपरिवर्तनः । रथवेगेऽपि नास्याभूत्क्लेशो दिव्यानुभावतः ।। १२५ रयवेगानिलोदस्तं व्यायतं तद्ध्वजांशुकम् । पश्चादागामिसैन्यानामिव मार्गमसूत्रयत् ॥ १२६ रथोद्धतगतिक्षोभादुद्भूताङ्गपरिश्रमाः । कथं कथमपि प्रापत्रथिनोऽन्ये रथं प्रभोः ॥ १२७ तमध्वशेषमध्वन्यस्तुरङ्गरत्यवाहयन् । सादिनः प्रभुणा साध शिबिरं प्रविविक्षवः ॥ १२८ ज्याने आपल्या मिशा कलप लावून काळ्या केल्या आहेत व ज्याने डोळ्यात काजळ घातले आहे, असा हा म्हातारा कुंटिणीच्या मागून हिंडत आहे व आपण तरुण आहोत असे भासवीत आहे ॥ १२० ।। याप्रमाणे अनेक त-हेच्या प्रयाणाच्या भाषणानी ज्याना मार्गातील श्रम झाले नाहीत असे सैनिक पूर्वी तयार करून ठेवलेल्या छावणीत मुक्कामासाठी आले ॥ १२१॥ यानंतर अन्तःपुरातील राजस्त्रियांच्या मुखांची कान्ति म्लान करणारा सूर्य दिवसाच्या मध्यभागी आला असता सम्राट् भरत आपल्या शिबिराजवळ आला ॥ १२२ ॥ भरताच्या मस्तकावर दिव्यछत्ररत्नाची सावली होती व तो रथावर आरूढ झाला होता. त्यामुळे सूर्याच्या उन्हाचा त्रास त्याला मुळीच जाणवला नाही ॥ १२३ ॥ भरतचक्रवर्तीच्या जवळ जे वृद्ध बसले होते त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी बोलणाऱ्या भरताला आपण किती मार्ग उल्लंघून पुढे आलो आहोत हे समजले नाही ।। १२४ ।। रथाची चक्रे वेगाने चालत असता भरताच्या अंगाला कोणताही धक्का लागला नाही. भरताच्या अंगात दिव्य सामर्थ्य असल्यामुळे रथ वेगाने जात असताही कोणताही क्लेश त्याला झाला नाही ॥ १२५ ॥ रथाच्या वेगयुक्त वान्याने फडफडणारा दीर्घ असा जो ध्वजाचा कपडा तो पाठीमागून येणाऱ्या सैन्याला जणु मार्गदर्शक झाला ।। १२६ ॥ रथांच्या वेगयुक्त गतीमुळे पुष्कळ राजांची शरीरे श्रमयुक्त झाली. यामुळे मोठ्या कष्टाने कसे तरी भरतराजाच्या रथाजवळ ते आले ॥ १२७ ॥ भरतराजाबरोबर शिबिरात प्रवेश करावा अशी इच्छा करणान्या कित्येक घौ स्वारानी वेगाने जाऊन मार्ग संपविणा-या घोड्यावर बसून मार्ग ओलांडला ॥ १२० ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy