SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 419
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४०८) महापुराण (३९-३४ गुरुजनयिता तत्त्वज्ञानं गर्भः सुसंस्कृतः । तदा तत्रावतीर्णोसो भव्यात्मा धर्मजन्मना ॥ ३४ अवतारक्रियास्यषा गर्भाधानवदिष्यते । यतो जन्मपरिप्राप्तिरुभयत्र न विद्यते ॥ ३५ इति अवतारकिया ॥ ततोऽस्य वृत्तलाभः स्यात्तदैव गुरुपादयोः। प्रणतस्य व्रतवातं विधानेनोपसेदुषः ॥ ३६ इति वृत्तलाभः॥ ततः कृतोपवासस्य पूजाविधिपुरःसरम् । स्थानलाभो भवेदस्य तत्रायमुचितो विधिः ॥ ३७ जिनालये शुचौ रङ्गे पद्ममष्टदलं लिखेत् । विलिखेद्वा जिनास्थानमण्डलं समवृत्तकम् ॥ ३८ श्लक्ष्णेन पिष्टचूर्णेन सलिलालोडितेन वा । वर्तनं मण्डलस्येष्टं चन्दनादिद्रवेण वा ॥ ३९ तस्मिन्नष्टदले पद्मे जने वास्थानमण्डले । विधिना लिखिते तज्जैविष्वग्विरचितार्चने ॥ ४० जिनार्चाभिमुखं सूरिविधिनैनं निवेशयेत् । तवोपासकदीक्षेयमिति मुध्नि मुहःस्पृशन् ॥ ४१ पञ्चमुष्टिविधानेन स्पृष्ट्वैनमधिमस्तकम् । पूतोऽसि दीक्षयेत्युक्त्वा सिद्धशेषं च लम्भयेत् ॥ ४२ त्यावेळी त्या भव्याला उपदेश करणारा जो गुरु तोच पिता होय आणि त्याने जे तत्त्वज्ञानाचे विवेचन केले तोच सुसंस्कृत असा गर्भ होय. त्या गर्भात तो भव्यात्मा खऱ्या धर्माची जी उत्पत्ति जो जन्म त्या स्वरूपाने तो अवतीर्ण झाला आहे असे समजावे ।। ३४ ।। ही याची अवतारक्रिया गर्भाधानाप्रमाणे मानली जाते. कारण या दोनही क्रियामध्ये जन्माची प्राप्ति झालेली नसते. याप्रकारे ही पहिली अवतार क्रिया आहे ॥ ३५ ॥ त्यानंतर त्याचवेळी गुरूच्या दोन चरणाना ज्याने नमस्कार केला आहे व विधिपूर्वक ज्याने व्रतांचा समूह धारण केला आहे अशा त्या भव्याला वृत्तलाभ नावांची दुसरी क्रिया संस्कार प्राप्त होतो. वृत्तलाभ हा दुसरा संस्कार झाला ।। ३६ ॥ ___स्थानलाभ क्रियेचे वर्णन- यानंतर ज्याने उपवास केला आहे अशा त्याच्यावर पूजाविधिपुरःसर स्थानलाभ क्रियेचा संस्कार होतो. या संस्कारात हा योग्य विधि केला जातोजिनालयात पवित्र अशा मण्डपात तज्ज्ञाने आठ पाकळयांचे कमळ लिहावे. अथवा समानगोल जिनेश्वराच्या समवसरणमंडलाची रचना करावी. पाण्यात कालविलेल्या आ अशा पीठाने मण्डल करावे, अथवा चन्दनादिकाच्या पातळ गन्धाने मण्डल काढावे व त्या अष्टदल कमलाची किंवा समवसरण मंडलाची सर्व बाजूनी पूजा करावी ॥ ३७-४० ॥ विधीने उपासक दीक्षा ज्याला द्यावयाची आहे त्याला जिनप्रतिमेसमोर गृहस्थाचार्याने बसवावे. त्याच्या मस्तकाला वारंवार स्पर्श करून तुझी ही उपासक दीक्षा आहे असे म्हणून पंच मुष्टिविधानाने त्याच्या मस्तकाला स्पर्श करून तू या दीक्षेने आज पवित्र झाला आहेस असे म्हणून जिनपूजा करून राहिलेले पूजाद्रव्य सिद्धशेषा म्हणून त्याला द्यावे ॥ ४१-४२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy