SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 376
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३७-१८३) महापुराण ( ३६५ बुद्धिसागरनामास्य पुरोधाः पुरुधीरभूत् । धर्म्या क्रिया यदायत्ता प्रतीकारोऽपि दैविके ।। १७५ सुधीगृहपतिर्नाम्ना कामवृष्टिरभीष्टदः । व्ययोपव्ययचिन्तायां नियुक्तो यो निधीशिना ।। १७६ रत्नं स्थपतिरप्यस्य वास्तुविद्यापदात्तधीः । नाम्नाभद्रमुखोऽनेकप्रासादघटने पटुः ॥ १७७ शैलादग्रो महानस्य यागहस्ती क्षरम्मदः । भद्रो गिरिचरः शुभ्रो नाम्ना विजयपर्वतः ।। १७८ पवनस्य जयन्वेगं हयोऽस्य पवनञ्जयः । विजयार्द्धगृहोत्सङ्गे हेलया यो व्यलङ्घयत् ॥ १७९ प्रागुक्तवर्णनं चास्य स्त्रीरत्नं रूढनामकम् । स्वभावमधुरं हृद्यं रसायनमिवापरम् ॥ १८० रत्नान्येतानि दिव्यानि बभूवुश्चक्रवर्तिनः । देवताकृतरक्षाणि यान्यलङध्यानि विद्विषाम् ॥ १८१ आनन्दिन्योऽन्धिनिर्घोषा भेर्योऽस्य द्वावशाभवन् । द्विषड्योजनमापूर्य स्वध्वनेर्याः प्रदध्वनु ॥ १८२ आस विजयघोषाख्या पटहा द्वादशापरे । गृहकेकिभिरुग्रीवैः सानन्दं श्रुतनिःस्वनः ॥ १८३ या राजाचा बुद्धिसागर नावाचा पुरोहित उपाध्याय होता. तो फार बुद्धिमान होता. सर्व धार्मिक क्रिया करण्याचे कार्य त्याच्या हातात होते आणि दैविक उपद्रवांचा नाश करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते ।। १७५ ।। शुभ बुद्धीचा कामवृष्टि नावाचा या राजाचा इच्छित वस्तु देणारा शहाणा गृहपति श्रेष्ठी होता. भरतेश्वराने त्याला खर्च व जमा याचा विचार करण्याच्या कामी नेमले होते ॥ १७६ ॥ या राजाचा घरे, प्रासाद वगैरेच्या विद्येत ज्याची बुद्धि तरबेज आहे व अनेक प्रासाद निर्माण करण्यात चतुर असा भद्रमुख नावाचा कुशल सुतार स्थापित रत्न होते ।। १७७ ।। या भरतेश्वराचा पर्वताप्रमाणे उंच, ज्याच्या गंडस्थलादिकातून मद गळत आहे असा मोठा शुभ्र भद्र जातीचा पर्वतावर चढून जाणारा विजयपर्वत नावाचा पट्टहस्ती होता ।। १७८ ॥ या प्रभूचा वाऱ्याच्या वेगाला जिंकणारा पवनंजय नावाचा घोडा होता. तो विजया पर्वताच्या गुहेच्या जवळ असलेल्या टेकड्या सहज उल्लंघित असे ॥। १७९ ।। या चक्रवर्तीचे जे स्त्री रत्न आहे त्याचे वर्णन पूर्वी केले आहे. त्याचे नाव प्रसिद्ध आहे. ते स्त्रीरत्न स्वभावाने मधुर व रमणीय आहे आणि रसायनाप्रमाणे आनंद देणारे आहे ॥ १८० ॥ ही चक्रवर्तीची दिव्य रत्ने होती. देवता यांचे रक्षण करतात आणि शत्रूकडून कोणत्याही प्रकारे यांचा पराभव, अपमान, हरण केले जाणे होत नसे ।। १८१ ॥ या राजेश्वराच्या आनंदिनी नावाचा बारा भेरी नौबदी होत्या. त्यांचा आवाज समुद्राच्या गर्जनेप्रमाणे होता व त्या आपल्या आवाजानी बारा योजनपर्यंत प्रदेश व्याप्त करीत असत ।। १८२ ॥ या सम्राटाचे विजयघोष नावाचे बारा नगारे होते. त्यांचा आवाज ऐकून घरात पाळलेले मोर आनंदाने आपल्या माना उंच करीत असत ॥ १८३ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy