SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 377
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३७-१८४) महापुराण गम्भीरावर्तनामानः शङखा गम्भीरनिःस्वनाः । चतुर्विशतिरस्यासन्शुभाः पुण्याब्धिसम्भवाः ॥ १८४ कटकारत्न निर्माणा विभोर्वीराङगदाह्वयाः। रेजुः प्रकोष्ठमावेष्ट्य तडिद्वलयविभ्रनाः ॥ १८५ पताकाकोटयोऽस्याष्टचत्वारिंशत्प्रमा मताः। मरुत्प्रेखोलितोत्प्रेडखदंशुकोन्मृष्टखाङगणाः॥१८६ महाकल्याणकं नाम दिव्याशनमभूद्विभोः। कल्याणाङगस्य येनास्य तुप्तिपुष्टीबलान्विते ॥ १८७ भक्षाश्चामृतगर्भाख्या रुच्यास्वादाः सुगन्धयः । नान्ये जरयितुं शक्ता यान्गरिष्ठरसोत्कटान् ॥१८८ स्वाद्यं चा मृतकल्पाख्यं हृद्यास्वादं सुसंस्कृतम् । रसायनरसं दिव्यं पानकं चामृताह्वयम् ॥ १८९ पुण्यकल्पतरोरासन्फलान्येतानि चक्रिणः । यान्यनन्योपभोग्यानि भोगाङगान्यतुलानि वै ॥ १९० पुण्याविना कुतस्तादृग्रूपसम्पदनीदृशी । पुण्याद्विना कुतस्तादृगभेद्यं गात्रबन्धनम् ॥ १९१ पुण्याविना कुतस्तादृडनिधिरत्नद्धिरूजिता । पुण्याद्विना कुतस्तादृगिभाश्वादिपरिच्छदः ॥ १९२ ___ ज्यांचा आवाज गंभीर आहे अर्थात् मोठा आहे, जे शुभ आहेत व पुण्यरूपी समुद्रापासून जे उत्पन्न झाले आहेत असे गंभीरावर्त नावाचे चोवीसशे शंख या सम्राटाचे होते ॥ १८४ ।।" __ या प्रभूची रत्नानी बनविलेली वीरांगद नावाची कडी होती. ती त्याच्या मनगटाला घेरून शोभत होती व विजेच्या वलयाप्रमाणे चमकत असत. त्यामुळे फार सुंदर दिसत होती ॥१८५ या नृपेश्वराच्या ४८ पताका होत्या व वाऱ्याच्या वाहण्याने त्यांचे कपडे हलत असत व त्यांनी आकाशांगणाला जण स्वच्छ केले आहे अशा शोभत असत ॥ १८६ ।। या प्रभु भरताचे महाकल्याणक नावाचे दिव्य भोजन होते. त्यामुळे आरोग्ययुक्त शरीर ज्याचे आहे अशा याला सामर्थ्ययुक्त तुष्टि आणि पुष्टि प्राप्त झाली होती ।। १८७ ।। याचे अमृतगर्भ नावाचे मोदक आदिक भक्ष्य पदार्थ होते. ते रुचकर, आस्वाद घेण्यास योग्य आणि सुगन्धित होते. ते अतिशय रसाने भरलेले होते. त्या भक्ष्य पदार्थाना अन्य माणसे 'पचवू शकत नसत ।। १८८॥ ज्यांचा स्वाद मनाला प्रिय वाटतो व मसाला वगैरे घालून जे संस्कारयुक्त केले आहेत, असे अमृतकल्प नांवाचे या राजेश्वराचे फलादिक पदार्थ होते. ज्याचा रस रसायनासारखा सुखदायक आहे असे अमृत नांवाचे दिव्य पेय हा राजा नेहमी सेवित असे ॥ १८९ ॥ जे इतरांना भोगावयास मिळत नाहीत असे अनुपम भोग पदार्थ या चक्रवर्ती राजाच्या 'पुण्यरूपी कल्पवृक्षाची फळे होती ।। १९० ।। जिच्यासारखी रूपसंपत्ति जगात कोठेही मिळणार नाही अशी रूपसंपत्ति भरताला पुण्याने प्राप्त झाली होती ती इतरांना पुण्यावाचून कशी प्राप्त होईल ? याची अभेद्य शरीर रचना होती. ती याला पुण्याने प्राप्त झाली होती. याच्यासारखे पुण्य इतराचे नसल्यामुळे ती इतराना कशी प्राप्त होणार ? पुण्यावाचून याच्यासारखो निधिरत्नांची उत्कृष्ठ ऋद्धि इतराना कशी प्राप्त होणार? व याच्यासारखा हत्ती, घोडे आदि क परिवार इतराना पुण्यावाचून कसा प्राप्त होणार? ॥ १९१-१९२ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy