________________
४१२)
महापुराण
(३९-६९
इत्युक्तास्ते च तं सत्यमेवमस्तु समञ्जसम् । त्वयोक्तं श्लाध्यमेवैतत्कोऽन्यस्त्वत्सदृशो द्विजः॥६९ युष्मादशामलाभे तु मिथ्यादृष्टिभिरप्यमा । समानाजीविभिः कर्तुं सम्बन्धोऽभिमतो हि नः ॥ ७० इत्युक्त्वेनं समाश्वास्य वर्णलाभेन युञ्जते । विधिवत्सोऽपि तं लब्ध्वा याति तत्समकक्षताम् ॥७१ वर्णलाभोऽयमुद्दिष्टः कुलचर्याधुनोच्यते । आर्यषट्कर्मवृत्तिःस्यात्कुलचर्यास्य पुष्कला ॥ ७२
इति कुलचर्या ॥ १४ विशुद्धस्तेन वृत्तेन ततोम्येति गृहीशिताम् । वृत्ताध्ययनसम्पत्त्या परानुग्रहणक्षमः ॥ ७३ ।। प्रायश्चित्तविधानज्ञः श्रुतिस्मृतिपुराणवित् । गृहस्थाचार्यताप्राप्तस्तदा धत्ते गृहीशिताम् ॥ ७४
इति गृहोशिताक्रिया ॥ १५ ततः पूर्ववदेवास्य भवेदिष्टा प्रशान्तता । नानाविधोपवासादिभावनाः समुपेयुषः ।। ७५
इति प्रशान्तताक्रिया ॥ १६ गृहत्यागस्ततोऽस्यस्याद्गृहवासाद्विरज्यतः । योग्यं सून यथान्यायमनुशिष्य गृहोज्झनम् ॥ ७६
गृहत्यागक्रिया ॥ १७ हे त्याचे भाषण ऐकून त्यांनीही त्याला असे म्हणावे- हे गृहस्था, तू जे बोललास ते सत्य व समंजसपणाचे व प्रशंसनीय आहे. तुझ्यासारखा दुसरा द्विज कोण आहे ? तुझ्यासारख्याचा लाभ आम्हाला झाला नाही तर ज्यांची समान आजीविका आहे अशा मिथ्यादृष्टि लोकाबरोबर देखिल संबन्ध करणे आम्हाला मान्य होईल. असे बोलून व त्याला आश्वासन देऊन त्याला वर्णलाभाशी युक्त करतात. योग्य विधिपूर्वक तो श्रावक वर्णलाभसंस्काराने युक्त होऊन त्यांच्याबरोबरीचा होतो. याप्रमाणे वर्णलाभक्रिया १३ वी आहे ॥ ६९-७१ ॥
या श्रावकाचा हा वर्णलाभसंस्कार सांगितला आहे. आता कुलचर्या संस्काराचे वर्णन करतो. आर्यांच्या सहा कर्मानी जिनपूजा, सत्पात्रदान आदिक सहा कार्यात पूर्ण प्रवृत्ति करणे ही मोठी कुलचर्या आहे. हा कुलचर्यासंस्कार चौदावी क्रिया आहे ।। ७२ ॥
वरील आर्यांच्या षट्कर्माचरणानी विशुद्ध झालेल्या या श्रावकाला गृहीशितागृहस्थाचार्यपद प्राप्त होते. तेव्हा हा आपला सदाचार व शास्त्राध्ययनाच्या सम्पत्तीने शिष्यादिकावर अनुग्रह करण्यास समर्थ होतो ॥ ७३ ।।
याला प्रायश्चित्त व व्रतविधानाची माहिती असते. हा श्रुति, स्मृति व पुराणांचा जाणता असल्यामुळे गृहस्थाचार्यपदाला प्राप्त होतो तेव्हा हा सर्वगृहस्थांचा ईश-स्वामी होतो. याच्या तन्त्राने सर्व गृहस्थ धर्माचे पालन करतात. हा गृहीशितासंस्कार पंधरावा होय ।। ७४।।
यानंतर नानाप्रकारच्या उपवासादिक भावनाना धारण करणाऱ्या या गृहस्थाचार्याची प्रशान्तता क्रिया होते. ही सोळावी प्रशान्तता क्रिया होय ।। ७५ ॥
यानन्तर या गृहस्थाचार्याला वैराग्य प्राप्त होते व त्यामुळे तो गृहात राहण्यापासून विरक्त होतो व आपल्या योग्य पुत्राला नीतीला अनुसरून सदाचाराचा उपदेश करतो व घराचा त्याग करतो. ही गृहत्यागक्रिया सतरावी ।। ७६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org