SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 546
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४३-२३९) महापुराण (५३५ मूलस्कन्धानमध्येषु चूताबैरिव मत्सरात् । सुरभीणि प्रसूनानि सुरभिश्च तदा बधे ॥ २२१ आकृष्टदिग्गजालीनि बकुलानि वने वने । हानौ गुणाधिकान्यासंस्तुलितानि कुलोद्गतैः ॥ २२२ क्रीडनासक्तकान्ताभिर्वाध्यमानाः सगीतिभिः। आन्दोलाः स्तम्भसम्भूतैः समाक्रोशनिव स्वनः॥२२३ सुन्दरेष्वपि कुन्देषु मधुपा मन्दतृप्तयः । माधवीमघुपानेन मुदा मधुरमारुवन् ॥ २२४ भवेदन्यत्र कामस्य रूपवत्तादिसाधनम् । कालैकसाधनः सोऽस्मिन्नावनस्पति जम्भते ॥ २२५ नरविद्याधराधीशान्गत्वा तत्कालसाधनात् । दूताः स्वयंवरालापं सांस्तान्समबोधयन ॥ २२६ ततो नानानकध्वानप्रोत्कर्णीकृतदिगद्विपाः । निजाङ्गनाननाम्भोजपरिम्लानिविधायिनः ॥ २२७ वियद्विभतिमाक्रम्य विमानैर्गतमानकैः । सद्यो विद्याधराधीशा द्योतमानदिगाननाः ॥२२८ सुलोचनाभिधाकृष्टिविद्याकृष्टाः समापतन् । कामिनां न पराकृष्टि विद्या मुक्त्वेप्सितस्त्रियः ॥ त्यावेळी सल्लको नांवाचे वृक्षानी आम्रवृक्षादिकाबरोबर जणु ईर्ष्या धारण करून मूलभागी, शाखांच्या अग्रभागी व मध्यभागी सुगंधित पुष्पानी सुगन्धीपणा धारण केला ॥२२१॥ त्यावेळी ज्यानी दिग्गजावरील भुंग्याना आपणाकडे ओढून घेतले आहे असे बकुलवृक्ष उत्तम कुलातील व्यक्तीप्रमाणे हानीचा प्रसंग प्राप्त झाला तरीही गुणानी अधिक श्रेष्ठ बनले. अर्थात् कुलीन माणसे हानीच्या प्रसंगीही आपल्या गुणानी अधिकपणाच धारण करतात तसे या बकुलवृक्षाच्या फुलानी आपला वास चोहोकडे पसरल्यामुळे कमी होत असताही आपला सुवासिकपणा सोडला नाही ॥ २२२ ॥ गाणी गाणाऱ्या व क्रीडा करण्यात दंग झालेल्या तरुण स्त्रियांनी जे पीडित झाले आहेत असे चौपाळे त्यांच्या खांबापासून होणाऱ्या आवाजानी जणु ते आक्रोश करीत आहेत असे वाटत होते ।। २२३ ॥ सुन्दर अशा कुंदांच्या फुलातही ज्याना थोडासा आनंद प्राप्त झाला आहे असे भुंगे मोगऱ्याच्या फुलातील मध पिऊन आनंदाने गुंजारव करू लागले ॥ २२४ ।। अन्य ऋतूमध्ये स्त्रीपुरुषांची सौन्दर्यादिक साधने कामाच्या उत्पत्तीला कारण असतील पण या वसन्तऋतुमध्ये फक्त हा काल एकच साधन कामोत्पत्तीला कारण आहे व वनस्पति पर्यन्त त्यामुळे तो मदन वृद्धिगत होतो-प्रभावक होतो।। २२५ ।। अकम्पनराजाने पाठविलेले ते दूत या भूमीवरचे राजे व विद्याधर राजे यांच्याकडे या वसन्तऋतूच्या साहाय्याने गेले व त्यानी स्वयंवरासंबंधी वृत्तान्त कळविला ॥ २२६ ॥ यानंतर अनेक नगाऱ्यांच्या ध्वनीनी ज्यानी दिग्गजानाही कान वर करावयास लावले आहे आणि आपल्या स्त्रियांच्या मुखकमलाना ज्यानी म्लान केले आहे व प्रमाणरहित अर्थात् असंख्य विमानानी आकाशाची शोभा व्यापून दिशांची मुखे ज्यानी उज्ज्वल केली आहेत असे विद्याधरराजे सुलोचना नामक आकर्षणविद्येने आकर्षिलेले होऊन तत्काल तेथे प्राप्त झाले. कामी पुरुषाना आवडत्या स्त्रियाशिवाय दुसरी आकर्षण विद्या नाही ॥ २२७-२२९ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy