SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 611
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६००) महापुराण (४५-१० विश्वानाश्वास्य तद्योग्यः सामसाररुदीरितैः । सम्यग्विहितसत्कारः स्नानवस्त्रासनादिभिः ॥ १० कुमार, वंशौ युष्माभिविहितो वधितौ च नः । तरुविषमयोऽप्येति यतोऽभून्न ततः क्षयम् ॥ ११ पुत्रबन्धपदातीनामपराधशतान्यपि । क्षमन्ते हि महात्मानस्तद्धि तेषां विभूषणम् ॥ १२ भवेद्दवादपि स्वामिन्यपराधविधायिनाम् । आकल्पमयशः पापं चानुबन्धनिबन्धनम् ॥ १३ अपराधः कृतोऽस्माभिरेकोऽयमविवेकिभिः । वयं वो बन्धभत्यास्तत्कुमार क्षन्तुमर्हसि ॥ १४ एषाकीतिरघं चैतत्प्रसादात्ते प्रशाम्यति । शापानुग्रहयोः शक्तस्त्वं विशुद्धि विधेहि नः ॥ १५ अर्कणालोकनारोधि हन्यते जगतस्तमः । अस्माकं स भवानर्कस्तस्मादन्तस्तमो हरेत् ॥ १६ प्रातिकूल्यं तवास्मासु स्तन्यस्येव स्तनन्धये । अस्मज्जन्मान्तरादृष्टपरिपाकविशेषतः॥ १७ यानंतर सर्व राजाना शांतीच्या समतारसाने भरलेल्या अशा भाषणानी त्याने प्रसन्न केले व स्नान, वस्त्र, आसन वगैरेनी त्यांचा योग्य आदर केला ॥ १० ॥ हे कुमारा, आमचे वंश-नाथवंश व सोमवंश हे तुम्हीच केले आहेत व वाढविले आहेत. विषबृक्ष देखिल जेथून जन्मतो तेथूनच त्याचा नाश होत नाही ॥ ११ ॥ जे महापुरुष असतात ते आपला पुत्र, बंधु आणि आपल्या पायदळ सैन्याने केलेल्या शेकडो अपराधांची देखिल क्षमा करतात व तशी क्षमा करणे हे त्यांचे विशिष्ट भूषण आहे ॥ १२ ॥ आपल्या स्वामीविषयी अपराध करणाऱ्या लोकांचे त्या अपराधामुळे झालेले अपयश व पाप हे कल्पान्तपर्यन्त राहणारे असतात ।। १३ ।। . हे कुमारा, आम्हा अविवेकी जनाकडून हा एक अपराध घडला आहे. हे कुमारा आम्ही तुमच्या बन्धु व सेवकवर्गापैकी आहोत असे समजून आम्हाला तू क्षमा करावीस ॥ १४ ॥ हे कुमारा ही आमची अकीर्ति आणि हे आमचे पाप तुझ्या प्रसन्नतेने शान्त होईल, नाश पावेल. तू आम्हाला शिक्षा करणे व अनुग्रह करणे या दोन्ही विषयी समर्थ आहेस म्हणून तू या दोषातून आमची शुद्धता कर, मुक्तता कर ।। १५ ।। - सूर्याच्या द्वारे पाहण्यास प्रतिबन्ध करणारा जगातील अंधार नाहीसा केला जातो तसा हे कुमार, तू आम्हाला सूर्यासारखा आहेस म्हणून आमच्या मनातला हा अज्ञानरूप अंधार नाहीसा कर ॥ १६ ॥ आमच्या पूर्व जन्माच्या दुर्दैवाच्या उदयविशेषामुळे तुझा आमच्याविषयी विरोध उत्पन्न झाला आहे तो जणु पुत्राला मातेच्या दुधाच्या विरोधासारखा आहे. जसे मातेच्या दुधावाचून मूल जगू शकत नाही तसे हे कुमार आपणाशी आम्ही विरोध केला तर आमचे जगणे शक्यच नाही ॥ १७ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy