________________
४६)
महापुराण
(२५-१७५
सत्यात्मा सत्यविज्ञानं सत्यवाक् सत्यशासनः । सत्याशीः सत्यसन्धानः सत्यः सत्यपरायणः ॥ १७५ स्थेयान्स्थवीयान्नदीयान्दवीयान्दूरदर्शनः । अणोरणीयाननणुर्गुरुराधो गरीयसाम् ॥ १७६ सदायोगः सदाभोगः सदातृप्तः सदाशिवः । सदागतिः सदासौख्यः सदाविद्यः सदोदयः ॥ १७७
......
झाल्यामुळे भगवंताचे शरीर अतिशय निर्मल होते. भगवंताच्या शरीराला परमौदारिक म्हणतात व निर्मलतेमुळे प्रत्येक दिशेला भगवंताचे मुख दिसते म्हणून त्यांना चतुर्वक्त्र, चतुरास्य आणि चतुर्मुख म्हणतात ॥ ६५ ।।
सत्यात्मा- भव्यजीवांचे कल्याण करणारा आहे आत्मा ज्यांचा असे प्रभु सत्यात्मा आहेत ॥६६॥ सत्यविज्ञानं- सत्य-सफल आहे विज्ञान ज्यांचे असे भगवन्त सत्यविज्ञान होत ।। ६७।। सत्यवाक- प्रभची वाणी सफल असल्यामळे ते सत्यवाक सत्यवचनी आहेत॥६८॥ सत्यशासन- प्रभूचे मत मोक्षफलाला देते म्हणन ते सत्यशासन आहेत ॥ ६९ ।। सत्याशीभगवंताचा आशीर्वाद दात्याला सत्य सफल होतो म्हणून ते सत्याशी: आहेत. इतर मुनिही दात्याला आशीर्वाद देतात व तो दात्याच्या लाभान्तराय कर्मामळे सफल होत नाही पण जन्मान्तरी तो सफल होतो. पण भगवन्ताचा आशीर्वाद इहलोकी व परलोकीही सफल होतोच म्हणून भगवान् सत्याशी आहेत ॥ ७० ॥ सत्यसन्धान- भगवान् सत्यप्रतिज्ञ आहेत ।। ७१ ॥ सत्य- प्रभु नेहमी सत्यस्वरूपी आहेत ॥७२।। सत्यपरायण- प्रभु नेहमी सत्यातच तत्पर राहतात ॥ ७३ ।। स्थेयान्- अतिशयेन स्थिरः स्थेयान्-अत्यन्त स्थिर ।। ७४ । स्थवीयान्- प्रभु गुणांनी अतिशय मोठे-गुणांनी फार विशाल ।। ७५ ॥ नेदीयान्- अतिशय जवळ असलेल्या भक्ताला नेहमी जवळ वाटणारा ।। ७६ ॥ दवीयान्- अभक्तापासून अतिशय दूर ॥ ७७ ॥ दूरदर्शनभक्ताला दूरूनही दिसणारा ।। ७८ ।। अणोः अपि अणीयान्- अणुपेक्षाही लहान अर्थात् ज्यांचे स्वरूप अणुपेक्षाही जाणण्यास कठिण आहे असे. अल्पज्ञान्यांना ज्यांचे स्वरूप जाणणे शक्य नाही असे. पुद्गलाणु हा अवधि, मनःपर्ययज्ञान्यांनी जाणला जातो. पण भगवंताचे सूक्ष्म स्वरूप त्या ज्ञानांनीही जाणणे कठिण आहे ।। ७९ ॥ अनणु- भगवंत स्वरूपाने अनंत गुणांनी अनणु-अणुरूप नाहीत ते महान् आहेत ।। ८०॥ गुरु- प्रभु मोठे आहेत ।। ८१ ॥ गरीयसां आद्य- सर्व गणधरादिक महापुरुषामध्ये आद्यः पहिले आहेत ।। ८२।।
सदायोग- ज्याचा अलब्ध लाभ झाला आहे असे परमशुक्लध्यान ज्यांना सदैव आहे असे प्रभु ॥ ८३ ॥ सदाभोग- नेहमी शुद्ध परमात्मस्वरूपात एकरूपाने लीन झाल्यामुळे परमानन्दरूप अमृताचा सदा प्रभु भोग घेतात, अनुभवतात. अथवा ज्यांचा मनोयोग नेहमी समीचीन-अतिशय शुद्ध असतो ।। ८४ ॥ सदातृप्त- नेहमी प्रभु तृप्तच असतात. सदाअक्षुधितजेवलेल्या मनुष्याप्रमाणे नेहमी तप्त असतात ॥८५ ।। सदाशिव- नेहमी प्रभ कल्याणस्वरूपाचेच असतात ।। ८६ ।। सदागति- नेहमी प्रभु गति-ज्ञानस्वरूपीच असतात ।। ८७ ॥ सदासौख्यनेहमी परमानन्दातच लीन असतात ।। ८८ ।। सदाविद्य- नेहमी केवलज्ञानरूपच असतात ॥ ८९ ॥ सदोदय- प्रभु सदा उदययुक्तच असतात. त्यांचा अस्त कधीही होत नाही. अथवा यांचे सदा नेहमी उत्उत्कृष्ट-अयः शुभकारक दैव असते ॥ ९० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org