________________
२५-५१)
महापुराण
सर्वविद्येश्वरो योगी चतुरास्यस्त्वमक्षरः । सर्वतोऽक्षिमयं ज्योतिस्तवातो भास्यधीशितः ॥ ४५ अच्छायत्वमनुन्मेषनिमेषत्वं च ते वपुः । धत्ते तेजोमयं दिव्यं परमौदारिफाह्वयम् ॥ ४६ बिभ्राणोऽप्यध्यधिछत्रमच्छायाङ्गस्त्वमीक्षसे। महतां चेष्टितं चित्रमथवौजस्तवेदशम् ॥ ४७ निमेषापायधीराक्षं तव वक्त्राब्जमीक्षितुम् । त्वय्येव नयनस्पन्दो नूनं देवश्च संहृतः ॥ ४८ नख केशमितावस्था तवाविःकुरुते विभोः । रसादिविलयं देहे विशुद्धस्फटिकामले ॥ ४९ इत्युदारैर्गुणैरेभिस्त्वमनन्यत्रभाविभिः । स्वयमेत्य वृतो नूनमदृष्टशरणान्तरः॥ ५० अप्यमी रूपसौन्दर्यकान्तिदीप्त्यादयो गुणाः । स्पृहणीयाः सुरेन्द्राणां तव हेयाः किलाद्भुतम् ॥
.............
हे प्रभो, आपण सर्व विद्यांचे स्वामी आहात. योगी व चतुर्मुख आहात व अक्षरअविनाशी आहात व आपली आत्ममय केवलज्ञानरूपी ज्योति चोहोकडे पसरली आहे. म्हणून आपण फार शोभत आहात ॥ ४५ ॥
__ हे प्रभो, आपल्या शरीराला परमौदारिक हे नांव आहे व तें दिव्य तेजोमय आहे, तें छायारहित आहे आणि डोळ्यांच्या पापण्याची उघड-झाप त्यात होत नाही. असे शरीर आपण धारण केले आहे ।। ४६ ।।
हे प्रभो, आपल्या मस्तकावर छत्र असूनही त्याची सावली आपल्या शरीरावर पडत नाही. म्हणून अच्छायाङ्ग-सावलीरहित शरीराचे आपण आहात. बरोबरच आहे महात्मा पुरुषांचे चरित्र आश्चर्यकारक असते अथवा आपले तेजच त्या प्रकारचे विलक्षण आहे ॥ ४७ ॥
हे जिनराज, पापण्यांची उघड-झाप होत नसल्यामुळे आपले मुख निश्चल डोळ्यांनी फार शोभत आहे. ते पाहण्यासाठीच खरोखर देवांनी आपल्या ठिकाणीच डोळ्यांची उघड-झाप बंद केली असावी असे वाटते ।। ४८॥
हे प्रभो, आपल्या नखांची व केशांची जी परिमित अवस्था आहे तिने निर्मल स्फटिकाप्रमाणे स्वच्छ अशा आपल्या देहात रसरक्तमांसादिक सात धातूंचा अभाव झाला आहे हे व्यक्त केले आहे ॥ ४९ ॥
येथपर्यंत वणिलेले महागुण अन्य ठिकाणी आढळून येत नाहीत. यांना अन्यत्र स्थान न मिळाल्यामुळे ते गुण आपण होऊन आपल्याकडे आले व त्यांनी आपणास वरले आहे, आपला आश्रय घेतला आहे ।। ५० ।।
हे जिननाथा, हे रूप, सौंदर्य, कान्ति, तेजस्वीपणा हे गुण सुरेन्द्राना देखील प्रिय असून त्यांना आपण त्याज्य मानीत आहात याचे आम्हाला मोठे आश्चर्य वाटत आहे ॥ ५१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org