________________
३७-१४९)
महापुराण
इति सोत्कर्षमेवास्यां प्रथयन्प्रेमनिघ्नताम् । स रेमे रतिसाद्भूतो भोगाङ्गदशधोदितः ॥ १४२ सरत्ना, निधयो देव्यः पुरं शय्यासने चमूः । नाटयं सभाजनं भोज्यं वाहनं चेति तानि वै ॥१४३ वशाङ्गमिति भोगाङ्ग निर्विशन्स्वाशितम्भवम् । सुचिरं पालयामास भवमेकोष्णवारणाम् ॥ १४४ षोडशास्य सहस्राणि गणबद्धामराः प्रभोः । ये युक्तापुतनिस्त्रिशा निधिरत्नात्मरक्षणे ॥ १४५ क्षितिसार इतिख्यातः प्राकारोऽस्य गृहावृतिः । गोपुरं सर्वतोभद्रं प्रोल्लसद्रत्नतोरणम् ॥ १४६ नन्यावर्तो निवेशोऽस्य शिबिरस्यालघीयसः । प्रासादो वैजयन्ताख्यो यःसर्वत्र सुखावहः ॥ १४७ विक्स्वस्तिकासभाभूमिः परायमणिकुट्टिमा। तस्य चङक्रमणी यष्टिः सुविधिर्मणिनिमिता ॥१४८ गिरिकूटकमित्यासीत्सौधं दिगवलोकने । वर्षमानकमित्यन्यत्प्रेक्षागृहमभूद्विभोः ॥ १४९
याप्रमाणे या सुभद्रादेवी वरील प्रेमात अतिशय अडकून पडलेले आहोत असे अधिक व्यक्त करणारा तो चक्रवर्ती तिच्या रति सुखात लुब्ध होऊन दहा प्रकारच्या भोगसाधनानी तो तिच्याबरोबर रमत असे ।। १४२ ॥
चौदा रत्ने, नऊ निधि, पट्टराण्या, नगर, शय्या, आसने, सैन्य, नाटक-शाळेतील नृत्यादिक, नाना प्रकारची भांडी, भोजन वस्तु आणि वाहने ही दहा प्रकारची भोगसाधने होती ॥ १४३ ।।
याप्रमाणे तृप्ति उत्पन्न करणाऱ्या दहा प्रकारच्या भोगसाधनांचा अनुभव भरतेश्वर घेत असे व एक छत्राधीन अशा या पृथ्वीचे त्याने दीर्घकालपर्यन्त रक्षण केले ॥ १४४ ॥
___ या भरतेश्वराचे सोळा हजार गणबद्धामर देव होते ते हातात तरवार धारण करून निधींचे, रत्नांचे व चक्रवर्तीचे रक्षण करीत होते ॥ १४५ ।।
या भरत राजाच्या घराला वेढलेला क्षितिसार नावाचा तट होता आणि ज्याला रत्नमय तोरणाने शोभा प्राप्त झाली आहे असे सर्वतोभद्र नावाचे गोपुर (वेस) होते ॥ १४६ ।।
या भरत राजाच्या मोठ्या छावणीचे राहण्याचे ठिकाण नंद्यावर्त नांवाचे होते आणि या चक्रीच्या महालाचे नांव 'वैजयन्त' होते. हा महाल सर्व ऋतूमध्ये अतिशय सुखदायक होता ।। १४७ ॥
या चक्रवर्तीच्या सभागृहाचे नांव 'दिक्स्वस्तिका' असे होते व यातील जमीन अत्यंत मौल्यवान रत्नांनी बनविली होती. जेव्हा हा चक्री फिरावयास जात असे तेव्हा हा हातात 'सुविधि' नावाची काठी घेत असे ती अनेक मणि जिला जडविले आहेत अशी होती ॥ १४८॥
सर्व दिशा जेथून पाहता येतात असा याचा सौध होता उंच महाल होता त्याचे 'गिरिकूटक' नांव होते व या चक्रवर्तीचे नाटक पाहण्याचे जे स्थान होते त्याचे नांव 'वर्धमानक' असे होते ॥ १४९॥
म.४६
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org