________________
३३२)
महापुराण
(३६-१२६
स सत्कारपुरस्कारे नासीज्जातु समुत्सुकः । पुरस्कृतो मुदं नागात्सत्कृतो न स्म तुष्यति ॥ १२६ ' परीषहमलाभं च सन्तुष्टो जयति स्म सः । अज्ञानदर्शनोद्भता बापासीन्नास्य योगिनः ॥ १२७ परीषहजयावस्य विपुला निर्जराभवत् । कर्मणां निर्जरोपायः परीषहजयः परः ॥ १२८ पञ्चेन्द्रियाण्यनायासात्सोऽजयज्जितमन्मथः । विषयेन्धनदीप्तस्य कामाग्नेः शमनं तपः ॥ १२९ क्रोधं तितिक्षया मानमत्सेकपरिवर्जनः । मायामजुतया लोभं सन्तोषेण जिगाय सः॥१३० आहास्भयसंज्ञे च समैथुनपरिग्रहे । अनङ्गविजयादेताः संज्ञाः क्षपयति स्म सः॥ १३१ इत्यन्तरङ्गशत्रूणां स भजन्प्रसरं महुः । जयति स्मात्मनात्मानमात्मविद्विदिताखिलः ॥ १३२ . व्रतं च समितीः सर्वाः सम्यगिन्द्रियरोधनम् । अचेलतां च केशानां प्रतिलञ्चनसङ्गरम् ॥ १३३ आवश्यकेष्वसम्बाधामस्नानं क्षितिशायिताम । अदन्तपावनं स्थित्वा भक्ति भक्तं च नासकृत् ॥ प्राहुर्मूलगुणानेतांस्तथोत्तरगुणाः परे । तेषामाराधने यत्नं सोऽतनिष्टातनर्मुनिः ॥ १३५
ते मुनिराज आपला लोकानी सत्कार करावा व आपणास सर्वकार्यात पुढे करून पुढारी मानावे याविषयी केव्हाही उत्सुक नसत. कोणी आपणास पुढारीपणा दिल्यास ते आनंदी होत नसत व कोणी सत्कार केला असता त्यांना हर्ष वाटत नसे. याप्रमाणे सत्कारपुरस्कार परीषहाला ते जिंकीत असत ॥ १२६ ॥
नेहमी सन्तोषवृत्ति धारक अशा या मुनीशानी अलाभ परीषहाला जिंकले होते आणि अज्ञान व अदर्शन यापासून होणारी बाधा त्यांना कधीही झाली नाही ॥ १२७ ॥
परीषहावर विजय मिळविल्याने या मुनींना फार मोठी कर्मनिर्जरा प्राप्त झाली. म्हणून परिषहाना जिंकणे हा कर्माच्या निर्जरेचा फार मोठा उपाय आहे ॥ १२८ ॥
मदनाला जिंकल्यामुळे या मुनीशाने आयासावाचून पाचही इन्द्रियाना जिंकले. हा कामाग्नि पंचेन्द्रियांच्या विषयरूप लाकडानी प्रज्वलित होतो पण त्या अग्नीला तप हे नष्ट करते, शान्त करते ॥ १२९ ।।
या मुनिवर्यानी क्षमेने क्रोधाला जिंकले, गर्वाला गर्वाचा त्याग करून जिंकले. सरळपणाने मायेला-कपटाला व सन्तोषाने लोभाला जिंकले ।। १३० ।।
कामविकारावर विजय मिळविल्यामुळे या मुनीश्वरानी आहार, भय, मैथुन आणि परिग्रह या चार संज्ञा-अभिलाषांना जिंकले ॥ १३१ ॥
याप्रमाणे अन्तरंग शत्रूचा फैलाव वारंवार या मुनिराजानी मोडून टाकला. त्यामुळे आत्म्याला व इतर सर्व पदार्थांना जाणणा-या या मुनीश्वराने स्वतःच्याद्वारे स्वतःवर विजय मिळविला. म्हणजे स्वस्वरूपात स्थिर झाले ।। १३२ ।।
___ अहिंसा, सत्यादिक पाच महाव्रते, ईर्यासमिति, भाषासमित्यादिक पाच समिति आणि आपल्या स्पर्शन जिह्वादिक पाच इन्द्रियाना त्यांच्या स्पर्शादिक विषयाकडे जाऊ न देणे, अर्थात् पंचेन्द्रियाना ताब्यात ठेवणे, सर्व वस्त्रमात्रांचा त्याग अर्थात् पूर्ण नग्नता धारण करणे, केशांचा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org