________________
४२०)
महापुराण
पशुहत्यासमारम्भात्क्रव्यादेभ्योऽपि निष्कृपाः । यद्युच्छ्रितिमुशन्त्ये ते हन्तेवं धार्मिका हताः ॥ १३७ मलिनाचरिता ह्येते कृष्णवर्गे द्विजब्रुवा: । जैनास्तु निर्मलाचाराः शुक्लवर्गे मता बुधैः ॥ १३८ श्रुतिस्मृतिपुरावृत्त वृत्तमन्त्रक्रियाश्रिता । देवतालिङ्गकामान्तकृता शुद्धिर्द्विजन्मनाम् ॥ १३९ ये विशुद्धतरां वृत्ति तत्कृतां समुपाश्रिताः । ते शुक्लवर्गे बोद्धव्याः शेषाः सर्वे बहिः कृताः ॥ १४० तच्छुद्ध शुद्धी बोद्धव्ये न्यायान्यायप्रवृत्तितः । न्यायो दयार्द्रवृत्तित्वमन्यायः प्राणिमारणम् ॥ १४१ विशुद्धवृत्तयस्तस्माज्जैना वर्णोत्तमा द्विजाः । वर्णान्तःपातिनो नेते जगन्मान्या इति स्थितम् ॥ १४२ स्यादाका च षट्कर्मजीविनां गृहमेधिनाम् । हिंसादोषोऽनुषङ्गी स्याज्जनानां च द्विजन्मनाम् ॥ इत्यत्र ब्रूमहे सत्यमल्पसावद्यसङ्गतिः । तत्रास्त्येव तथाप्येषां स्याच्छुद्धिः शास्त्रदर्शिता ॥ १४४
(३९-१३७
पशु मारण्याचे कार्य करीत असल्यामुळे हे राक्षसापेक्षा अधिक निर्दय आहेत. असे पुरुष जर उन्नतियुक्त व श्रेष्ठ आहेत असे मानले गेले तर अरेरे खरे धार्मिक लोक बिचारे मारले गेले असे म्हणावे लागेल ।। १३७ ॥
आपणाला द्विज ब्राह्मण मानणारे हे लोक मलिन आचरणाचे असल्यामुळे याना कृष्ण वर्गात पापी लोकात अन्तर्भूत करावेत. जैन हे निर्मल आचरणाचे असल्यामुळे विद्वानानी त्याना शुक्लवर्गात पुण्यवंत लोकात मानले आहे ।। १३८ ॥
आगम, धर्मसंहिता ग्रन्थ, पुराणे, सदाचार, मन्त्र व क्रिया यानी जैन ब्राह्मणाची शुद्धि होते - आगमादिकांच्या आश्रयाने जैन वागत असल्यामुळे ते शुद्ध होतात, निष्पाप होतात. तसेच देवता व लिंग आणि कामविकाराचा नाश यांच्या योगाने त्याना शुद्धि प्राप्त झालेली असते ।। १३९ ।
वरील श्रुति, धर्मसंहिता आदिकानी झालेल्या शुद्धीने जे युक्त आहेत व ज्यांची वृत्ति उपजीविका शुद्ध आहे ते शुक्ल वर्गातले आहेत असे समजावे व याहून बाकीचे जे लोक आहेत त्याना शुद्धीपासून दूर राहिलेले समजावेत ।। १४० ।।
यांची शुद्धि व अशुद्धि न्याय व अन्याय प्रवृत्तीवरून ओळखावी. दयार्द्रवृत्ति असणे ती न्यायप्रवृत्ति होय आणि प्राणी मारण्याच्या प्रवृत्तीला अन्यायवृत्ति म्हणतात ॥ १४१ ॥
यावरून असे निश्चित झाले - जैन हे विशुद्धवृत्तीचे असल्यामुळे तेच वर्णोत्तम सर्व वर्णात उत्तम - श्रेष्ठ आहेत व ते द्विज आहेत व जगन्मान्य आहेत ॥ १४२ ॥
आता येथे अशी शंका उत्पन्न होते - असि, मषि आदि सहा कार्यानी उपजीविका करणारे जे जैन गृहस्थ आहेत किंवा जे जैन द्विज आहेत त्याना हिंसा दोष लागतोच ? ॥१४३॥
Jain Education International
या शंकेचे उत्तर आचार्य देतात- तुमची शंका सत्य आहे असि मष्यादि कर्मानी उपजीविका करणा-याना अल्प दोष पातक हे लागते तरी तो दोष ते पातक यापासून शुद्ध होण्यासाठी शास्त्राने त्याना शुद्धिही सांगितली आहे ।। १४४ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org