SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 430
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३९-१३६) महापुराण (४१९ एणाजिनपरो ब्रह्मा जटाकूर्चाविलक्षणः । यः कामगर्दभो भूत्वा प्रच्युतो ब्रह्मवर्चसात् ॥ १२९ दिव्यमर्तेजिनेन्द्रस्य ज्ञानगर्भावनाविलात् । समासादितजन्मानो द्विजन्मानस्ततो मताः ॥ १३० वर्णान्तःपातिनो नेते मन्तव्या द्विजसत्तमाः । व्रतमन्त्रादिसंस्कारसमारोपितगौरवाः ॥ १३१ वर्णोत्तमानिमान्विद्मः क्षान्तिशौचपरायणान् । सन्तुष्टान्प्राप्तवैशिष्टयानक्लिष्टाचारभूषणान् ॥ क्लिष्टाचाराः परे नैव ब्राह्मणा द्विजमानिनः । पापारम्भरताः शश्वदाहृत्य पशुघातिनः ॥ १३३ सर्वमेधमयं धर्ममभ्युपेत्य पशुध्नताम् । का नाम गतिरेषां स्यात्पापशास्त्रोपजीविनाम् ॥ १३४ चोदनालक्षणं धर्ममधर्म प्रतिजानते । ये तेभ्यः कर्मचाण्डालात्पश्यामो नापरान्भुवि ॥ १३५ पाथिवैर्दण्डनीयाश्च लुण्टाकाः पापपण्डिताः। तेऽमी धर्मजुषां बाह्याः ये निघ्नन्त्यघृणाः पशन ॥१३६ ___ ज्याने हरिणाचे कातडे धारण केले आहे, जटाधारीमिशा आदिक ज्याचे लक्षण आहे असला ब्रह्मा आदि जिनेश्वर नव्हते. जटादिक लक्षणाचा ब्रह्मा हा कामशान्ति व्हावी म्हणून गाढव बनला होता व अहिंसादि व्रते, स्वाध्याय, ध्यान आदि स्वरूप जे ब्रह्मचर्याचे तेज त्यापासून तो भ्रष्ट झाला होता ॥ १२९ ॥ दिव्य शरीर ज्याचे आहे अशा जिनेन्द्राच्या निर्दोष ज्ञानरूपी गर्भापासून ज्यांचा जन्म झाला आहे असे जे तेच द्विज होत, तेच ब्राह्मण होत ॥ १३० ।। व्रते, मन्त्र, संस्कार आदिकामुळे ज्यांच्या ठिकाणी गौरव प्राप्त झाले आहे अशा या श्रेष्ठ द्विजाना वर्णान्तर्गत मानू नये. अर्थात् ते वर्णोत्तम आहेत ।। १३१ ।। हे श्रेष्ठ ब्राह्मण क्षमा, निर्लोभता यात तत्पर असतात व सन्तुष्ट असतात, ज्ञानामुळे याना विशिष्टता प्राप्त झाली आहे, निर्दोष आचरणरूपी अलंकार ज्यानी धारण केले आहेत असे हे ब्राह्मण वर्णोत्तम आहेत असे मानावेत ।। १३२॥ ज्यांचा आचार मळकट आहे व आपणास द्विज- ब्राह्मण आहोत असे मानतात ते वास्तविक ब्राह्मण नाहीत. कारण ते नेहमी पापारंभ करणारे आहेत व पशूना ओढून आणून यज्ञांत त्यांचा घात करणारे आहेत ।। १३३ ॥ सर्व हिंसामय धर्माचा स्वीकार करून पशु प्राण्याचा घात करतात व जे पापशास्त्राचा उपदेश करून उपजीविका करतात अशा या ब्राह्मणाना कोणती गति प्राप्त होईल हे समजत नाही ॥ १३४ ॥ हे ब्राह्मण अधर्म स्वरूप वेदामध्ये सांगितलेल्या प्रेरणात्मक धर्माला धर्म मानतात आम्ही त्यांच्याशिवाय इतराना या भूमीवर कर्मचांडाल समजत नाही. अर्थात् वेदांत सांगितलेल्या धर्माला मानणारे हे ब्राह्मण कर्मचांडाल आहेत ॥ १३५ ॥ हे ब्राह्मण निघृण-दयारहित होऊन पशूना मारतात म्हणून हे लुटारू आहेत, पापकार्ये करण्यात पंडित- निपुण आहेत. असे हे ब्राह्मण धर्मात्मा लोकापासून बाह्य आहेत, बहिष्कृत आहेत. असले ब्राह्मण राजाकडून दंडिले गेले पाहिजेत ।। १३६ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy