SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 544
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४३-२१३) महापुराण (५३३ ज्ञात्वा तदाशु तद्वन्धविचित्राङगदसञ्जकः । सौधर्मकल्पावागत्य देवोऽवधिबिलोचनः ॥ २०४ अकम्पनमहाराजमालोक्य वयमागताः । सुलोचनायाः पुण्यायाः स्वयंवरमवेक्षितुम् ॥ २०५ इत्युक्त्वोपपुरे योग्यरम्ये राजाभिसम्मतः । ब्रह्मस्थानोत्तरे भागे प्रधीरे वरवास्तुनि ॥ २०६ प्राङमुखं सर्वतोभद्रं मङ्गलद्रव्यसम्भूतम् । विवाहमण्डपोपेतं प्रासादं बहुभूमिकम् ॥ २०७।। चित्रप्रतोलीप्राकारपरिकर्मगृहावृतम् । भास्वरं मणिमर्मभ्यां विधाय विधिवत्सुधीः ॥ २०८ तं परीत्य विशुद्धोरुसुविभक्तमहीतलम् । चतुरस्रं चतुरि शालगोपुरसंयुतम् ॥ २०९ रत्नतोरणसंकीर्णकेतुमालाविलासितम् । हटत्कूटाग्रनिर्भासिभर्मकुम्भाभिशोभितम् ॥ २१० स्थूलनीलोत्पलाबद्धस्फुरद्दीप्तिधरातलम् । विचित्रनेत्रविस्तीर्णवितानातिविराजितम् ॥ २११ भोगोपभोगयोग्योरसर्ववस्तुसमाचितम् । यथास्थानगताशेषरत्नकाञ्चननिमितम् ॥ २१२ मदा निष्पादयामास स्वयंवरमहागृहम् । न साधयन्ति केऽभीष्टं पुंसां शुभविपाकतः ॥ २१३ अनुसरून चालत आलेल्या भाऊबंदजनाशी व वृद्धलोकाशी या कार्याचा त्याने विचार केला. न सांगता अभिप्राय जाणणारे असे सेवक व सांगितलेले तेवढे काम करणारे सेवक यांच्याजवळ नजराण्याच्या पोटी आमंत्रणपत्र-आज्ञापत्र राजाने दिले व अनेकराजाकडे त्यांना राजाने पाठविले. जाताना त्यांचा दानमानाने सत्कार केला व आपले कार्य त्याने त्याना सांगितले व सर्व राजाना आणण्यासाठी त्याने सर्व दिशाना सेवकाना पाठविले ॥ २००-२०३ ।। त्यावेळी विचित्रांगद नांवाचा एक देव जो की या अकम्पनराजाचा मित्र होता. त्याने अवधिज्ञानरूपी नेत्राने ही सर्व हकीकत जाणली व सौधर्मस्वातून तो अकम्पन महाराजाकडे आला व त्याला पाहून त्याने म्हटले की पुण्यवती सुलोचनेच्या स्वयंवराला पाहण्यासाठी मी आलो आहे ॥ २०४-२०५ ॥ असे त्याने म्हटले व राजाने ज्याला संमति दिली आहे अशा त्याने त्या नगराच्या जवळ ब्रह्मस्थानापासून उत्तर दिशेकडे अतिशय शान्त उत्कृष्ट आणि रमणीय ठिकाणी एक सर्वतोभद्र नांवाचा प्रासाद बनविला तो अनेक मजल्यांचा होता. त्याचे मुख पूर्व दिशेकडे होते. हा प्रासाद अनेक मंगलद्रव्यानी भरलेला होता. हा प्रासाद विवाहमंडपाने युक्त होता. हा प्रासाद अनेक वेशीनी युक्त, तट आणि शृंगाराच्या साधनानी भरलेल्या घरानी युक्त होता. हा प्रासाद चमकणाऱ्या रत्नानी व सुवर्णानी बनविला होता. या प्रासादाच्या सभोवती निर्मल मोठे व चारी दिशाना समप्रमाणाने विभागलेले पटांगण होते. ते चौकोन चार द्वारानी युक्त, तट व वेशीनी युक्त होते. रत्नांची तोरणे व ध्वज मालानी शोभत होते. चमकणाऱ्या शिखरावर अतिशय तेजस्वी सुवर्णाचे कलशानी शोभत होते. या पटांगणाची जमीन स्थूल नीलमण्यानी बनविली होती. त्या मण्यांच्या कांतीनी ते पटांगण शोभत होते. याच्या वरचे छत नेत्रजातीच्या वस्त्राच्या चांदण्याने शोभत होते. या स्वयंवरमंडपात सर्व भोगोपभोगाच्या वस्तु होत्या व यातील योग्य अशी स्थाने अनेक रत्ने व सुवर्णानी बनविली होती. याप्रमाणे हे स्वयंवरमहागृह त्या देवाने आनंदाने बनविले होते. बरोबरच आहे की, शुभ कर्माचा उदय असल्यामुळे पुरुषाचे अभीष्ट पदार्थाची सिद्धि कोण बरे करीत नाही ? अर्थात् पुण्याच्या उदयामुळे सर्वाकडून अभीष्ट पदार्थाची सिद्धि होते ॥ २०६-२१३ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy