SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 673
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६६२) महापुराण (४६-३४३ इत्युक्त्वा सोऽब्रवीदेवं प्राक्मणालवतीपुरे । भूत्वा त्वं भवदेवाख्यो रतिवेगसुकान्तयोः ॥ ३४३ बद्धवरो निहन्ता भूः पारावतभवेऽप्यनु । मार्जारः सन्मृति गत्वा पुनः खचरजन्मनि ॥ ३४४ विद्यच्चोरत्वमासाद्य सोपसर्गा मति व्यषाः । तत्पापान्नरके दुःखमनुभूयागतस्ततः ॥ ३४५ अत्रेत्याखिलवेद्युक्तं व्यक्तवाग्विसरः स्फुटम् । व्यधात्सुधीः स्ववृत्तान्तं भीमसाधुः सुधाशिनोः ॥३४६ त्रिः प्राक्त्वन्मारितावावामिति शुद्धित्रयान्वितौ । जातसद्धर्मसद्भावाभिवन्द्य मुनि गतौ ॥३४७ इति व्याहृत्य हेमाङ्गदानुजेदं च साब्रवीत् । भीमः साधुः पुरे पुण्डरीकिण्यां धातिघातनात् ॥३४८ रम्ये शिवङ्करोद्याने पञ्चमज्ञानपूजितः । तस्थिवांस्तं समागत्य चतस्त्रो देवयोषितः ॥ ३४९ वन्दित्वा धर्ममाकर्ण्य पापादस्मत्पतिर्मतः । त्रिलोकेश वदास्माकं पतिः कोऽन्यो भविष्यति ॥ ३५० इत्यपृच्छन्नसौ चाह पुरेऽस्मिन्नेव भोजकः । सुरदेवाह्वयस्तस्य वसुषेणा वसुन्धरा ॥ ३५१ धारिणी पथिवी चेति चतस्रो योषितः प्रियाः। श्रीमती वीतशोकारव्या विमला सवसन्तिका॥३५२ चतस्रश्चेटिकास्तासामन्येद्युस्ता वनान्तरे । सर्वा यतिवराभ्यासे धर्म दानादिनाददुः ॥ ३५३ याप्रमाणे बोलून ते भीममुनि आपल्या समोर बसलेल्या त्या दोन देवदेवीना पुनः असे म्हणाले, सर्वज्ञ देवानी मला स्पष्ट अक्षरानी असे सांगितले- तूं मृणालवती नगरात प्रथमभवी भवदेव नांवाचा वैश्य झाला होतास त्यावेळी रतिवेग आणि सुकान्त याच्याविषयी मनात वैर धारण करून त्यांना मारलेस. नन्तर ते दोघे कबूतर व कबूतरी झाले आणि तूं मांजर झालास. त्यांना तूं मारलेस पण उत्तम मरणाने मरण पावून ते दोघे विद्याधर-विद्याधरी झाले. तूं त्यानंतर विद्यच्चोर झालास आणि त्याना उपसर्ग करून मारून टाकलेस. त्या पापामुळे तूं नरकामध्ये जन्मून तेथील दुःख भोगलेस. याप्रमाणे मला सर्वज्ञानी सांगितले असे म्हणून त्या भीमसाधूने आपला सगळा वृत्तान्त त्या दोन देवदेवीना स्पष्ट सांगितला. यानन्तर त्या देवदेवीनी भीमसाधूला असे म्हटले, हे साधो आम्हा दोघाना पूर्वजन्मी तीनवेळा मारलेस पण आम्ही तीनही वेळी मन, वचन व शरीराच्या शुद्धीनी युक्तच राहिलो. त्या शुद्धीमुळे आमच्या ठिकाणी सद्धर्माचीच भावना राहिली असे त्या उभय देवदेवीनी सांगितले आणि ते त्या मुनीला वन्दन करून स्वर्गास गेले ॥ ३४३-३४७ ।। याप्रमाणे बोलून हेमाङ्गदाची धाकटी बहीण सुलोचना पुनः असे बोलली. त्या भीमसाधूला पुण्डरीकिणी नगरीत घातिकर्माचा घात केल्यामुळे सुंदर शिवङ्कर नामक बगीचात पांचवे ज्ञानकेवलज्ञान झाले. त्यामुळे तो देवपूजित झाला. त्या बगीचात ते भीमसाधु बसले असता तेथे चार देवस्त्रिया आल्या, त्यांनी त्या भीम मुनीश्वराला वन्दन करून धर्म ऐकला व त्या त्याना म्हणाल्या- हे त्रिलोकेशा पापाने आमचा पति मरण पावला. आता आमचा दुसरा कोण बरे पति होणार आहे ते सांगा. असे त्यानी विचारले तेव्हा भीममुनी असे म्हणाले, याच नगरात सुरदेव नांवाचा राजा होता त्याला चार प्रिय स्त्रिया होत्या. त्यांची नांवे- वसुषेणा, वसुन्धरा, धारिणी आणि पृथ्वी याचप्रमाणे त्यांच्या चार दासी- श्रीमती, वीतशोका, विमला व वसन्तिका या सर्वजणीनी एके दिवशी त्या वनात एकायतीश्वराजवळ दान, पूजा आदिकरूपाचा धर्म धारण केला ॥ ३४८-३५३ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy