SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 39
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २८) महापुराण (२५-१२९ व्योममतिरमात्मा निर्लेपो निर्मलोऽचलः । सोममूतिः सुसौम्यात्मा सूर्यमूतिर्महाप्रभः ॥ १२८ मन्त्रविन्मन्त्रकृन्मन्त्री मन्त्रमूतिरनन्तगः । स्वतन्त्रस्तन्त्रकृत्स्वन्तः कृतान्तान्तः कृतान्तकृत् ॥१२९ व्योममूर्ति- हे प्रभो, आपण आकाशाप्रमाणे निर्मलमूर्ति आहात अथवा लोकाकाश अलोकाकाशाप्रमाणे केवलज्ञानाने सर्वत्र व्यापून राहिलेले आहात ।। ५९ ।। अमूर्तात्मा- अमूर्तात्मा म्हणजे आकाशाप्रमाणे अमूर्तस्वरूपाचे आहात ।। ६० ।। निर्लेप- आपण कर्ममलकलंकाने रहित आहात. अथवा निर्गतःलेपआहारो अस्य- आपणास आहार नाही, अनन्तसुखी आहात. म्हणून भुकेची बाधा आपणास नाही. कवलाहारग्रहण आपणास नाही ।। ६१ ।। निर्मल- विष्ठा मूत्रादिकांनी रहित असे शरीर प्रभूचे असते अथवा मल म्हणजे पापकर्मे त्यांनी प्रभु रहित झाल्यामुळे ते निर्मल आहेत. अथवा निर्गता मा लक्ष्मीर्धनं येभ्यस्ते निर्मा निर्ग्रन्थमुनयः- धनाचा ज्यांनी त्याग केला आहे असे निर्ग्रन्थ मुनि त्यांना निर्मा म्हणतात. तान् लाति स्वीकरोति त्यांचा प्रभुंनी स्वीकार केला आहे म्हणून त्यांना निर्मल म्हणतात ।। ६२ ।। अचल- सर्वदा निश्चयाने स्थिर असणारा ।। ६३ ॥ सोमति- प्रभ चंद्राप्रमाणे शान्त आहेत. म्हणन ते सोममति आहेत ।। ६४ ॥ सुसौम्यात्मा- प्रभु सौम्यस्वभावाचे क्रूरतारहित आहेत । ६५ ।। सूर्यमूर्तिप्रभुंचा देह सूर्याप्रमाणे कान्तिमान् आहे म्हणून ते सूर्यमूर्ति आहेत ।। ६६ ।। महाप्रभ- प्रभु अपरिमित कान्तीचे धारक आहेत. केवलज्ञानरूपी तेजाचे धारक आहेत ।। ६७ ॥ ___ मन्त्रवित्- देवत्वादिकांची सिद्धि करून देणाऱ्या मंत्रांना प्रभु जाणतात. म्हणून ते मन्त्रज्ञ आहेत ॥ ६८ ॥ मन्त्रकृत्- मंत्र-प्रथमानुयोग, करणानुयोग, चरणानुयोग व द्रव्यानुयोग अशा शास्त्रांची रचना करणारे प्रभु आहेत. म्हणून ते मन्त्रकृत् समजावेत ।। ६९ ॥ मन्त्रीमंकाराचा अर्थ मन आहे व त्रकाराने मनाचे रक्षण करणे हा अर्थ सिद्ध होतो. मनाचा उपयोग आत्मचिन्तनाकडे प्रभु करतात. म्हणून ते मन्त्री आहेत ॥ ७० ॥ मात्रमूर्ति- णमो अरिहंताणं' हा सप्ताक्षरी मंत्र अरिहंताचा वाचक आहे. प्रभु मन्त्रस्वरूपी आहेत. म्हणून ते मन्त्ररूपी मन्त्रमूर्ति आहेत. अथवा मंत्र म्हणजे स्तुति. भगवन्ताची स्तुति करणारे भक्त भगवंतांना प्रत्यक्ष पाहतात म्हणून भगवान् मन्त्रमूर्ति आहेत ॥ ७१ ॥ अनन्तग- अनन्त-म्हणजे मोक्ष व आकाश, भगवान् आकाशातून विहार करतात व सर्व कर्माचा क्षय करून मोक्षाला जातात म्हणून ते 'अनन्तग' आहेत ॥७२॥ स्वतन्त्र- स्व-आत्मा आणि तन्त्र-शरीर आत्मा हाच त्यांचे शरीर आहे म्हणून प्रभूना स्वतन्त्र म्हणावे किंवा स्व-आत्मा हेच तन्त्र अवश्य कर्तव्य आहे किंवा आत्मा हेच ज्याचे इहलोक व परलोकरूपी द्वयर्थ- दोन अर्थ- प्राप्त करून घेणेचे साधन आहे अथवा स्व-आत्मा हाच तंत्र सिद्धान्त ज्यांचा आहे असे प्रभु आहेत ।। ७३ ॥ तन्त्रकृत्तंत्र शास्त्रं तन्त्र म्हणजे शास्त्र त्याची रचना करणारे प्रभु तंत्रकृत् आहेत ॥ ७४ ॥ स्वन्तज्याचा अन्त शेवट सु-सुंदर आहे असे प्रभु आहेत. अर्थात् सुन्दर शेवट म्हणजे मोक्षप्राप्ति ज्यांना होते असे प्रभु स्वन्त आहेत ।। ७५ ॥ कृतान्तान्त- कृतान्त म्हणजे सिद्धान्त त्याचा शेवट प्रभुंनी प्राप्त करून घेतला म्हणून ते कृतान्तान्त आहेत ॥ ७६ ॥ कृतान्तकृत्- कृतान्तपुण्यकृत्य ते करणारे प्रभु कृतान्तकृत् आहेत ।। ७७ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy