SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 472
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ एकचत्वारिशतमं पर्व । अथ चक्रधरः काले व्यतिक्रान्ते कियत्यपि । स्वप्नान्न्यशामयत्कांश्चिदेकदातदर्शनान् ॥१ तत्स्वप्नदर्शनात् किञ्चिदुरस्त इव चेतसा। प्रबुद्धः सहसा तेषां फलानीति व्यतर्कयत् ॥२ असत्फला इमे स्वप्नाः प्रायेण प्रतिभान्ति माम् । मन्ये दूरफलांश्चैतान्पुराकल्पे फलप्रदान् ॥ ३ कुतश्चिद्भगवत्यद्य प्रतपत्यादिभर्तरि । प्रजानां कथमेवैवंविधोपप्लवसम्भवः ।।४।। ततः कृतयुगस्यास्य व्यतिक्रान्तो कदाचन । फलमेते प्रदास्यन्ति नूनमेनःप्रकर्षतः ॥ ५ युगान्तविप्लवोदस्ति एतेऽनिष्टशंसिनः । स्वप्नाः प्रजाप्रजापालसाधारणफलोदयाः ॥ ६ यद्वच्चन्द्रार्कबिम्बोत्थविक्रियाजनितं फलम् । जगत्साधारणं तद्वत्सदसच्चास्मदीक्षितम् ॥ ७ इतीदमनुमानं नः स्थूलार्थानुप्रचिन्तनम् । सूक्ष्मतत्त्वप्रतीतिस्तु प्रत्यक्षज्ञानगोचरा ॥८ केवलार्कावृते नान्यः संशयध्वान्तभेदकृत् । को हि नाम तमो नैशं हन्यादन्यत्र भास्करात् ॥ ९ यानंतर काही काल निघून गेल्यावर एके वेळी भरतचक्रवर्तीने आश्चर्यकारक पदार्थ ज्यात दिसले अशी काही स्वप्ने पाहिली ॥ १॥ ती स्वप्ने पाहिल्याने त्याचे अन्तःकरण कांहीसे उद्विग्न झाले, खिन्न झाले व तो एकदम जागा झाला व त्यांच्या फलांचा याप्रमाणे विचार करू लागला ॥ २॥ मला वाटते बहुतांशी या स्वप्नांची फले वाईट आहेत, याची फले फार मोठा काल व्यतीत झाल्यावर पुढे मिळणारी आहेत ।। ३ ।। याचप्रमाणे भगवान् आदिप्रभु या भूतलावर अद्यापि तप करीत विहार करीत असता प्रजाजनाना अशा त-हेचे संकट कसे बरे पीडा देऊ शकेल ? ॥ ४ ॥ म्हणून सध्याचे हे पुण्ययुग व्यतीत झाल्यावर कदाचित् अतिशय पातकाच्या उदयाने ही स्वप्ने आपले फळ प्रजाना देतील ।। ५ ।। ही स्वप्ने अनिष्ट फले सुचविणारी असल्यामुळे या कृतयुगाच्या समाप्तीनन्तर प्रजा व प्रजापाल अशा राजाना अर्थात् दोघानाही अनिष्ट फले देणारी आहेत असे वाटते ॥ ६॥ ज्याप्रमाणे चन्द्र व सूर्याच्या बिबामध्ये कांहीं बिघाड झाल्याने त्याचे चांगले व वाईट फल सगळ्या जगाला साधारण मिळते तसे आम्ही पाहिलेल्या स्वप्नांचे फल सर्वाना सारखे मिळेल असे वाटते ॥ ७ ॥ हे आमचे अनुमान स्थूल अर्थाचे चिन्तन करणारे आहे. पण या स्वप्नांच्या सूक्ष्म तत्त्वाचा अनुभव प्रत्यक्षज्ञानाचा विषय आहे ॥ ८ ॥ केवलज्ञानरूपी सूर्याशिवाय इतर ज्ञान या संशयरूपी अंधाराचा नाश करण्याला समर्थ नाही. जगामध्ये सूर्याशिवाय कोण बरे रात्रीचा अंधार नाहीसा करण्यास समर्थ आहे ? ॥ ९ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy