________________
६१८)
महापुराण
(४५-१६६
साफल्यमेतया नित्यमेति लावण्यमम्बधेः । उत्पत्तिर्भूभृतां पत्युर्षरण्यां वधिता सती ॥ १६६ वाषिरेव पतिस्तस्मादेषाभूत्पापनाशिनी। धवला धार्मिकर्मान्या सतीनामुपमानताम् ॥ १६७ गता कवीश्वरः सर्वैः स्तूयते देवतेति च । गुणिनश्चेन्न के कान्वा संस्तुवन्ति गुणप्रियाः ॥ १६८ इति गङगागतः श्रव्यैरन्यैश्चातिमनोहरैः । ततः कतिपयरेव प्रयाणः कुरुजांगलम् ॥ १६९ प्राप्य तद्वर्णनाव्याजान्मोदयन्काशिपात्मजाम् । आप्तजानपदानीतफलपुष्पादिभिश्च सः ॥ १७० विकसन्नीलनीरेजसरोजातिविराजितैः । प्रत्येत्येव प्रपश्यन्ती सरोनेत्रर्वधूवरम् ॥ १७१
समुद्राकडे हे प्रिये, ही चालली आहे. बरोबरच आहे की, तिला आपला पति जो काम त्याच्या शिवाय दुसऱ्याची इच्छा व्हावयाची नाही. ज्या उत्तम असतात अशा स्त्रियांच्या ठिकाणी नीचपुरुषाविषयी इच्छा कशी असेल ? ही गंगानदी समुद्राचा संगम झाल्याबरोबर तन्मय झाली आहे. हे प्रिये, प्रेम म्हणून जे असते ते असे असले म्हणजेच ते खरे प्रेम होय ॥ १६१-१६५ ॥
___ या समुद्राचे लावण्य-सौंदर्य-दुसरा अर्थ खारटपणा हा हिच्या सौंदर्याने सफल होत आहे. या गंगानदीचा जन्म पर्वतांचा राजा जो हिमालय त्याच्यापासून झाला आहे व ही सती या पृथ्वीवर वाढली आहे. समुद्र हाच हिचा पति असल्यामुळे ही पापांचा नाश करणारी आहे. ही धवला-शुभ्र, निर्दोष असल्यामुळे धार्मिक लोकाना मान्य आहे व सर्वपतिव्रता स्त्रियाना उपमा देण्यास योग्य झालेली आहे व सर्व कवीश्वर हिची देवता म्हणून स्तुति करतात. ज्या अर्थी गंगानदीच्या संबंधाने मनोहर व श्राव्य-ऐकण्यास योग्य अशा अन्य कित्येक शब्दानी ते कवीश्वर हिची स्तुति करतात ती योग्यच आहे. गुणप्रिय लोक जर गुणिलोकांची स्तुति न करतील तर ते कोणाची स्तुति करतील ? याप्रमाणे जयकुमाराने गंगानदीचे मनोहर श्राव्य शब्दानी वर्णन केले व नंतर काही मुक्कामानीच आपल्या कुरुजांगल नामक देशात येऊन पोचला ॥ १६६-१६९ ॥
आपल्या देशात आल्यावर त्याच्या वर्णनाच्या निमित्ताने सुलोचनेला जयकुमाराने आनन्दयुक्त केले आणि आप्त व देशातील लोकानी आणलेल्या फळे, फूले आदिकानी त्याने तिला रमविले ॥ १७०।।
विकसणारी कमळे व तांबडी कमळे यांनी सुशोभित दिसणा-या कमलरूप नेत्रानी पुढे येऊन ती नगरी जणु त्या वधुवराना पाहत आहे असे वाटत होते ॥ १७१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org