________________
१८२)
महापुराण
(३०-१२७
लक्ष्म्यान्दोललतामिवोरसि दधत्सन्तानपुष्पस्त्रजम् । मुक्ताहेममयेन जालयुगलेनालङकृतोच्चस्तनः ॥ लक्ष्म्युद्वाहगृहादिवाप्रतिभयो निर्यानिषेरम्भसाम् । लक्ष्मीशो रुरुचे भशं नववरच्छायां परामुखहन् ॥ १२७ प्राच्यानाजलधेरपाच्यनृपतीना वैजयन्ताज्जयन् । निजित्यापरसिन्धुसीमघटितामाशां प्रतीचीमपि ॥ दिक्पालानिव पार्थिवान्प्रणमयनाकम्पयन्नाकिनो । दिकचक्रं विजितारिचक्रमकरोदित्थं स भूभृत्प्रभुः ॥ १२८ पुण्याच्चक्रधरधियं विजयिनीमैन्द्री च दिव्यश्रियम् । पुण्यात्तीर्थकरश्रियं च परमां नैःश्रेयसीं चाश्नुते ॥ पुण्यादित्यसुभृच्छियां चतसृणामाविर्भवेद्धाजनम् ।
तस्मात्पुण्यमुपार्जयन्तु सुधियः पुण्याज्जिनेन्द्रागमात् ॥ १२९ इत्या भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसङग्रहे
पश्चिमार्णवद्वारविजयवर्णनं नाम त्रिशं पर्व ॥३०॥
लक्ष्मीची जणु झोका घेण्याची वेली अशी सन्तानक कल्पवृक्षाच्या पुष्पांची माला भरतेशाने आपल्या वक्षःस्थलावर धारण केली होती. तसेच मोत्यांनी गुंफलेले व सुवर्णमय अशा दोन जाळ्यांनी त्याचे उंच शरीर शोभत होते. लक्ष्मीचा पति असा हा चक्रवर्ती निर्भय होता. जणु लक्ष्मीच्या विवाहगृहाप्रमाणे असलेल्या समुद्रापासून बाहेर आलेला, नूतन वराची उत्कृष्ट शोभा धारण करणारा हा चक्रवर्ती फारच शोभू लागला ॥ १२७ ।।
याप्रमाणे समुद्रापर्यन्त पूर्वदिशेचे राजे व वैजयन्तपर्वतापर्यन्त दक्षिणदिशेचे राजे व पश्चिमसमुद्राच्या सीमेपर्यन्त पश्चिम दिशेपर्यन्तचे राजे या सर्व राजाना भरतचक्रवर्तीने वश केले व त्या सर्व राजाना दिक्पालप्रमाणे नमस्कार करावयास लाविले व स्वर्गीयदेवांना देखिल कंपित केले. याप्रमाणे त्या सर्वराजांच्या स्वामीने-भरतेशाने सर्वदिशासमूहाला शत्रुसमूहाने रहित केले ।। १२८ ॥
पुण्यापासून सर्वावर विजय प्राप्त करून देणारी चक्रवर्तीची लक्ष्मी प्राप्त होते. आणि इन्द्राची दिव्यलक्ष्मी देखिल पुण्यापासून प्राप्त होते. या पुण्यापासूनच तीर्थकरलक्ष्मी प्राप्त होते व या पुण्यानेच परमकल्याणकारी मोक्षलक्ष्मीही प्राप्त होते. या पुण्यापासून प्राणी उपर्युक्त चार लक्ष्मीचे पात्र होतो म्हणून हे सुबुद्धिवंतांनो, तुम्ही जिनेन्द्र भगवंताच्या पवित्र आगमाचा आश्रय घेऊन त्याला अनुसरून पुणोपार्जन करा ।। १२९ ॥ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत त्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहाच्या भाषानुवादामध्ये
पश्चिमसमुद्राच्या द्वाराच्या विजयवर्णनाचे तिसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org