SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 490
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४१-१५७) महापुराण (४७९ किमत्र बहुनोक्तोन प्रज्ञापारमितो मनुः । कृत्स्नस्य लोकवृत्तस्य स भेजे सूत्रधारताम् ॥ १५३ राजसिद्धान्ततत्त्वज्ञो धर्मशास्त्रार्थतत्त्ववित् । परिख्यातः कलाजाने सोऽभून्मूनि सुमेधसाम् ॥१५४ इत्यादिराजं तत्सम्राडहो राजर्षिनायकम् । तत्सार्वभौममित्यस्य दिशासूच्छलितं यशः ॥ १५५ इति सकलकलानामेकमोकः स चक्री । कृतमतिभिरजयं सङ्गतं संविषित्सन् ॥ बुधसबसि सदस्यान्बोधयन्विश्वविद्या । व्यवृणुत बुधचक्रीत्युच्छलत्कोतिकेतुः ॥ जिनविहितमनूनं संस्मरन्धर्ममार्गम् । स्वयमधिगततत्त्वो बोधयन्मार्गमन्यान् ॥ १५६ कृतमतिरखिलां मां पालयन्निःसपत्नाम् । चिरमरमन भौगैर्भोगसारीः स सम्राट् ॥ १५७ या भरतेश्वर मनूबद्दल अधिक सांगण्यात काही लाभ नाही. एवढेच आम्ही येथे सांगतो की, बुद्धीच्या दुस-या किना-याला जाऊन पोहोचलेला तो मनु सर्व लोकाचारांचा सूत्रधार होता ॥ १५३ ॥ हा भरतेश्वर राजसिद्धान्ताच्या तत्त्वांचा ज्ञाता होता व धर्मशास्त्राच्या अर्थाचे स्वरूपही तो उत्तम प्रकाराने जाणत होता व सर्व कलांच्या ज्ञानात तो सर्व विद्वानांच्या मस्तकावर विराजमान झाला होता ॥ १५४ ।। काय हो तो आदिराजा ? केवढे त्याचे साम्राज्य ? काय तो श्रेष्ठ राजर्षि ? काय त्याचे सार्वभौमपद ? याप्रमाणे या भरताचे यश सर्व दिशामध्ये पसरलेले होते ॥ १५५ ॥ हा चक्रवर्ती सर्व कलांचे अद्वितीय स्थान होता व चांगल्या कार्यात ज्यांची बुद्धि तत्पर असते अशा सज्जनाबरोबर कधी न संपणारी अशी मित्रता करण्याची इच्छा हा करीत असे व विद्वानांच्या सभेत नेहमी सभासदाना सर्व विद्यांचा उपदेश हा करीत असे. त्यामुळे हा विद्वानांचा चक्रवर्ती म्हणून याचा कीर्तिध्वज उंच फडफडत असे ॥ १५६ ॥ जिनेश्वर आदिभगवंतानी सांगितलेल्या रत्नत्रयधर्ममार्गाच्या उपदेशाचे नेहमी हा चक्रो स्मरण करीत असे. स्वतः जोवादिक तत्त्वांचे स्वरूप जाणून इतर भव्याना त्यांचा आय हा सांगत असे. शत्रुरहित या संपूर्ण भारतपृथ्वीचे हा पालन करीत असे. याप्रमाणे विद्वान अशा या चकवीने ज्यात उत्कृष्ट सार आहे अशा योग्य पदार्थांचा भोग घेत दीर्घकालपर्यन्त राज्यपालन केले. दोर्वका पर्यन्त भोगामध्ये तो रमला ।। १५७ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy