SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 268
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३४-३६) Parti कार्यविज्ञानं तिष्ठते दिव्यचक्षुषि । तमसां छेदने कोऽन्यः प्रभवेदंशुमालिनः ॥ २९ निवेद्य कार्यमित्यस्मै देवज्ञाय मिताक्षरः । विरराम प्रभुः प्रायः प्रभवो मितभाषिणः ॥ ३० ततः प्रसन्न गम्भीरपदालङ्कारकोमलाम् । भारतीं भरतेशस्य प्रबोधायेति सोऽब्रवीत् ॥ ३१ अस्ति माधुर्यमस्त्योजस्तदस्ति पदसौष्ठवम् । अस्त्यर्थानुगमो व्यक्तं यन्नास्ति त्वद्वचोमये ॥ ३२ शास्त्रज्ञा वयमेकान्तान्नाभिज्ञाः कार्ययुक्तिषु । शास्त्रप्रयोगवित्कोऽन्यस्त्वत्समो राजनीतिषु ॥ ३३ स्वमादिराजो राजर्षिस्तद्विद्यास्तदुपक्रमम् । तद्विदस्तत्प्रयुञ्जाना न जिहीमः कथं वयम् ॥ ३४ तथापि त्वत्कृतोऽस्मासु सत्कारोऽनन्यगोचरः । तनोति गौरवं लोके ततः स्मो वक्तुमुद्यताः ॥ ३५ इत्यनुश्रुतमस्माभिर्देव देवज्ञशासनम् । नास्ति चक्रस्य विश्रान्तिः सावशेषे दिशां जये ॥ ३६ महापुराण (२५७ हे पुरोहितजी आपण दिव्यनेत्रधारक आहात, आपल्या ठिकाणी या कार्याचे ज्ञान निश्चितपणे आहेच. सूर्याशिवाय अंधकाराचा छेद करण्यास दुसरा कोण बरे समर्थ आहे ? ॥२९॥ याप्रमाणे निमित्तज्ञानी पुरोहिताला थोडक्या अक्षरांनी आपले कार्य भरतेशाने सांगितले व मौन धारण केले. हे बरोबर आहे की, जे प्रभु असतात ते प्रायः थोडेच भाषण करीत असतात ॥ ३० ॥ यानंतर प्रसन्न व गम्भीर अशा शब्दानी युक्त व अलंकारानी कोमल अशी वाणी पुरोहिताने भरतेशाला समजावण्यासाठी याप्रमाणे उच्चारली ।। ३१ ॥ जे माधुर्य, जो तेजस्वीपणा, व जी शब्दांची सुंदर रचना व जी अर्थाची सरलता, हे प्रभो, आपल्या भाषणात जर नाही तर ती काय दुसऱ्या ठिकाणी आहे ? अर्थात् आपल्या भाषणात वरील माधुर्य, ओज वगैरे गुण नसतील तर ते दुसरे ठिकाणी कोठेच आढळून येणार नाहीत ।। ३२ ॥ आम्ही केवळ शास्त्रज्ञ आहोत. पण कार्य करणाऱ्या युक्तीचे ज्ञान आम्हाला बिलकुल नाही. हे प्रभो, राजनीतीमध्ये शास्त्राचा कसा उपयोग करावा हे जाणणारा आपणासारखा कोण बरे आहे ? ॥ ३३ ॥ हे प्रभो, आपण राजामध्ये पहिले राजा आहात आणि राजसमूहात आपण ऋषीप्रमाणे असल्यामुळे राजर्षि आहात व या राजविद्या आपणापासून प्रकट झाल्या आहेत. आम्ही त्या राजविद्या फक्त जाणत आहोत. आता त्या राजविद्यांचा प्रयोग आम्ही करू लागलो तर आम्हाला कशी बरे लाज वाटणार नाही ? ।। ३४ ।। तरीही आपणाकडून केला गेलेला जो असाधारण सत्कार तो आम्हाला जगात उच्च गौरवाप्रत नेत आहे. यास्तव आम्ही कांही बोलण्यासाठी उद्युक्त झालो आहोत ॥ ३५ ॥ Jain Education International हे राजन्, दिग्विजय पूर्ण व्हावयाला कांही बाकी राहिले असल्यास चक्राला विश्रान्ति प्राप्त होत नाही असे नैमित्तिक विद्वान् म्हणतात ते आम्ही ऐकले आहे ॥ ३६ ॥ म. ३३ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy