SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 282
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३४-१५४) तदन्तर्गत निःशेषश्रुततत्त्वावधारिणः । चतुर्दशमहाविद्यास्थानान्यध्येषत क्रमात् ॥ १४७ ततोऽमी श्रुत निःशेषश्रुतार्थाः श्रुतचक्षुषः । श्रुतार्थ भावनोत्कर्षाद्दधुः शुद्धि तपोविधौ ॥ १४८ वाग्देव्या सममालापो मया मौनमनारतम् । इतीर्ष्यतीव सन्तापं व्यधत्तेषु तपःक्रिया ॥ १४९ तनुतापमसह्यं ते सहमाना मनस्विनः । बाह्यमाध्यात्मिकं चोग्रं तपः सुचिरमाचरन् ॥ १५० ग्रीष्मेर्ककरसन्तापं सहमानाः सुदुःसहम् । ते भेजुरातपस्थानमारूढगिरिमस्तकाः ॥ १५१ शिलातलेषु तप्तेषु निवेशितपदद्वयाः । प्रलम्बित भुजास्तस्थुगियं ग्रग्रावगोचरे ।। १५२ तप्तपांसुचिता भूमिर्वावदग्धा वनस्थली । याता जलाशयाः शोषं दिशो घूमान्धकारिताः ॥ १५३ इत्यत्युग्रतरे ग्रीष्मे सम्प्लुष्टगिरिकानने । तस्थुरातपयोगेन ते सोढ़जरठातपाः ॥ १५४ महापुराण या दृष्टिवादात अन्तर्भूत अशा सर्व श्रुतज्ञानाच्या स्वरूपाचा त्यानी चांगला निश्चय केला व त्यामध्येच अन्तर्भूत असलेली चौदा जी उत्पादपूर्वादिपूर्वविद्यास्थाने त्यांचे क्रमानें त्यानी स्वरूप जाणले ।। १४७ ।। (२७१ श्रुतज्ञानरूपी डोळे ज्याना आहेत व ज्यानी सम्पूर्ण श्रुतज्ञानाचे विषय असलेल्या पदार्थाचे स्वरूप ऐकले आहे. अशा कुमारमुनींच्या ठिकाणी श्रुत व त्याच्या अर्थाच्या चिन्तनाचा उत्कर्ष झाल्यामुळे त्यानी तपश्चरणात उत्तम शुद्धि-निर्मलता धारण केली ॥ १४८ ॥ हे कुमारमुनि वाग्देवीबरोबर बोलतात आणि माझ्याशी मात्र नेहमी मौन धारण करतात म्हणून तपःक्रियेला ईर्ष्या उत्पन्न झाली व ती त्या मुनीना सन्तप्त करू लागली. अर्थात् श्रुतज्ञानाचे साहाय्याने त्यांचे तपश्चरण अधिक वाढले ।। १४९ ॥ त्या धैर्यशाली मुनीनी असह्य असा शरीर सन्ताप सहन केला व त्यानी बाह्य अनशनादि तपे व अन्तरंग प्रायश्चित्त विनयादिक तीव्र तपे दीर्घकालपर्यन्त आचरली ।। १५० ।। ग्रीष्मर्तुमध्ये सूर्याच्या किरणांचा अत्यन्त असह्य ताप सहन करणारे ते कुमारमुनि पर्वताच्या शिखरावर चढून आतापनयोग धारण करीत असत ॥ १५१ ॥ पर्वताच्या शिखराग्रावर असलेल्या दगडांच्या प्रदेशातील तापलेल्या शिलातलावर ज्यानी आपले दोन पाय ठेवले आहेत व ज्यानी आपले दोन हात लोंबते ठेवले आहेत असे ते मुनि उभा राहून तप करीत असत ।। १५२ ॥ उन्हाळ्याच्या दिवसात सर्व ठिकाणी जमीन तापलेल्या धुळीनी भरलेली होती व वनप्रदेश अग्नीने दग्ध झालेले होते, सर्व तळी वगैरे पाण्याचे प्रदेश शुष्क झाले, जलरहित झाले होते आणि सर्व दिशा धुरानी अंधारयुक्त बनल्या होत्या ।। १५३ ।। Jain Education International याप्रमाणे अत्यन्त तीव्र अशा उन्हाळयात पर्वतावरील जंगले सर्व जळून खाक झाली होती. अशावेळी ज्यानीं तीव्र उन्हाचा संताप सहन केला आहे असे होऊन हे मुनि आतापनयोगाने उभा राहत असत. आत्मध्यानात तत्पर राहत असत ।। १५४ ।। For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy