SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 436
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३९-१८५) महापुराण स्वोचितासनभेदानां त्यागात्त्यक्ताम्बरो मुनिः । संहं विष्टरमध्यास्य तीर्थप्रख्यापको भवेत् ॥ १७८ स्वोपधानाद्यनावृत्य योऽभूनिरुपधिर्भुवि । शयानः स्थण्डिले बाहुमात्रार्पितशिरस्तटः ॥ १७९ स महाभ्युदयं प्राप्य जिनो भूत्वाप्तसत्क्रियः । देवैविरचितं दीप्रमास्कन्दत्युपधानकम् ॥ १८० त्यक्तशीतातपत्राण सकलात्मपरिच्छदः । त्रिभिश्च्छत्रः समुद्भासि रत्नैरुद्भासते स्वयम् ॥ १८१ विविधव्यजनत्या गावनुष्ठिततपोविधिः । चामराणां चतुःषष्ट्या वीज्यते जिनपर्यये ॥ १८२ उज्झितानकसंगीतघोषः कृत्वा तपोविधिम् । स्यात् द्युदुन्दुभिनिर्घोषैर्घुष्यमाणजयोदयः ॥ १८३ उद्यानादिकृतां छायामपास्य स्वां तपो व्यधात् । यतोऽयमत एवास्य स्यादशोकमहाद्रुमः ॥ १८४ स्वं स्वापतेयमुचितं त्यक्त्वा निर्ममतामितः । स्वयं निधिभिरभ्येत्य सेव्यते द्वारि दूरतः ॥ १८५ ज्याने स्वतःला योग्य अशा अनेक आसनांचा त्याग केला आहे व ज्याने वस्त्र त्यागले आहे असा मुनि सिंहासनावर आरूढ होऊन सर्व जगात तीर्थप्रख्यापक होतो अर्थात् जिनेश्वर होऊन जिनधर्मरूपी तीर्थाचा सर्वत्र प्रसार करतो ।। १७८ ।। (४२५ जो मुनि गिर्दा, लोड, उशी आदिकांचा त्याग करून परिग्रहरहित होऊन आपल्या डोक्याखाली आपला फक्त हात ठेवून उंच सकल अशा जमिनीवर झोपतो तो महान् ऐश्वर्याला प्राप्त होतो व नंतर स्वर्गातून अवतरण करून जिनेश्वर होतो; देवाकडून तो अतिशय आदरसत्कार युक्त होतो व देवानी रचलेल्या तयार केलेल्या चमकणाऱ्या उशीला प्राप्त होतो. अर्थात् समवसरणात सिंहासनावर चमकणाऱ्या लोडाला टेकून तो बसतो ।। १७९-१८० ।। , ज्याने थंडी व उन्ह यापासून रक्षण करणाऱ्या सर्व आपल्या साधनांचा त्याग केला आहे असा तो साधु चमकणाऱ्या रत्नांनी युक्त अशा तीन छत्रानी शोभतो ।। १८१ ।। नाना प्रकारच्या पंख्यांचा त्याग करून ज्याने अनेक प्रकारची अनशनादि तपे केली आहेत असा तो साधु जेव्हा त्याला जिनावस्था प्राप्त होते तेव्हा तो चौसष्ट चामरानी वारा घातला जातो ।। १८२ ।। ज्याने नगान्यांचे शब्द व नृत्य, वाद्य आणि गायनांचे शब्द ऐकणे सोडले आहे असा तो साधु अनशनादितपांची नानाव्रते करतो व त्यामुळे केवलज्ञान होऊन त्याला जिनावस्था प्राप्त झाल्यावर देवनगाऱ्यानी ज्याचा जयजयकार आणि ऐश्वर्याची घोषणा केली जात आहे असा होतो ।। १८३ ॥ Jain Education International अनेक जे स्वतःचे बागबगीचे त्यांची सावली सोडून या साधूने तपश्चरण केले म्हणून या साधूला जिनदशा प्राप्त झाल्यावर त्याला अशोकमहावृक्षाची प्राप्ति होईल ।। १८४ ॥ न्यायाने मिळविलेले आपलें धन त्यागून हा साधु ममतारहित झाला त्यामुळे स्वतः निघि दरवाजाजवळ येऊन दूरून याची सेवा करीत आहेत ।। १८५ ॥ म. ५४ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy