SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 76
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २५-२६७) महापुराण ववषः सुमनोवृष्टिमापूरितनभोऽङगणम् । सुरा भव्यद्विरेफाणां सौमनस्यविधायिनीम् ॥ २५९ समन्ततः स्फुरन्तिस्म पालिकेतनकोटयः । आह्वातुमिव भव्यौघानेतैतेति मरुद्धताः ॥ २६० तर्जयन्निव कर्मारीनूर्जस्वी रुद्ध दिडमुखः । ढङ्कार एव ढक्कानामभूत्प्रतिपदं विभोः ॥ २६१ नभोरङगे नटन्तिस्म प्रोल्लसद्भपताकिकाः । सुराङगना बिलुम्पन्त्यः स्वदेहप्रभया दिशः ॥ २६२ विबुधाः पेठुरुत्साहात्किन्नरा मधुरं जगुः । वीणावादनमातेनुर्गन्धर्वाः सहखेचरैः ॥ २६३ प्रभामयमिवाशेषं जगत्कर्तुं समुद्यताः । प्रतस्थिरे सुराधीशाः ज्वलन्मुकुटकोटयः ॥ २६४ दिशः प्रसेदुरुन्मुक्तधूमिकाः प्रमदादिव । बभ्राजे धृतवैमल्यमनभ्रं वर्त्म वार्मुचाम् ॥ २६५ परिनिष्पन्नशाल्यादिसस्यसम्पन्मही तदा । उद्भूतहर्षरोमाञ्चा स्वामिलाभादिवाभवत् ॥ २६६ बभुः सुरभयो वाताः स्वधुनीशीकरस्पृशः । आकीर्णपङकजरजःपटबासपटावृताः ॥ २६७ सर्व भव्यजीवरूपी भुंग्यांच्या मनाला आनंदित करणारी पुष्पवृष्टि सर्व आकाशरूपी अंगणाला व्यापून देवांनी केली ।। २५९ ।।। त्यावेळी सर्व दिशात कोटयवधि ध्वज सर्व बाजूंनी वान्यांनी हलून फडफडत होते व ते भव्यांना प्रभूच्या दर्शनासाठी या या असे जणु आमंत्रण देत होते ॥ २६० ॥ ज्यांने सर्व दिशा व्यापल्या आहेत व जो कर्मरूपी शत्रूचा जणु तिरस्कार करीत आहेत असा फार तीव्र ढक्का नामक वाद्यांचा ढक्कारशब्द प्रभूच्या प्रत्येक पावलाला होऊ लागला ।। २६१ ।। ज्या आपल्या भुवयारूपी पताका वारंवार हालवीत आहेत व आपल्या देहाच्या कान्तींनी दिशांना लुप्त करीत आहेत, अशा देवाङगना आकाशरूपी रंगभूमीवर नृत्य करीत होत्या ॥ २६२ ।। देव श्री जिनाच्या गुणांची स्तुति करू लागले. किन्नरदेव उत्साहाने मधुर गाणे गाऊ लागले व गन्धर्वदेव विद्याधराबरोबर वीणावादन करू लागले ॥ २६३ ।। ज्यांच्या मुकुटांची शिखरे सगळ्या जगाला जणु कान्तिमय करण्यास उद्युक्त झाली आहेत असे देवेन्द्र प्रभूच्या मागून प्रयाण करू लागले ।। २६४ ।। दिशा प्रसन्न झाल्या, उज्ज्वल दिसू लागल्या. त्यांनी जणु आनंदाने धुक्याचा-धुरकटपणाचा त्याग केला. मेघांचा मार्ग असलेल्या आकाशाने मेघरहित होऊन निर्मलपणा धारण केला व ते सुंदर दिसू लागले ।। २६५ ॥ त्यावेळी पिकून तयार झालेल्या साळी वगैरे धान्यांच्या सम्पत्तीने पृथ्वी समृद्ध झाली. मला माझ्या स्वामीची प्राप्ति झाली म्हणून जणु जिच्या अंगावर हर्षाने रोमांच उभे राहिले आहेत अशी ती दिसू लागली ।। २६६ ।। गंगानदीच्या तुषारांना स्पर्श करणारे सुगंधित वारे कमलातील परागांनी भरून गेल्यामुळे पिवळी वस्त्रे पांघरल्याप्रमाणे शोभू लागले ॥ २६७ ।। म.९ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy