________________
५८)
महापुराण
(२६-६२
न्योत्स्नाम्मन्ये दुकूले च श्लक्ष्णे परिदधौ नपः । शरच्छियोपनीते वा मृदुनी दिव्यवाससी॥ ६२ नाजानुलम्बिना ब्रह्मसूत्रेण विबभौ विभुः । हेमाद्रिरिव गङ्गाम्बप्रवाहेण तटस्पृशा ॥ ६३ किरीटोदप्रमूर्षासौ कर्णाभ्यां कुण्डले दधौ । चन्द्रार्कमण्डले वक्तुमिवायाते जयोत्सवम् ॥ ६४ वक्षःस्थलेऽस्य रुरुचे रुचिरः कौस्तुभो मणिः । जयलक्ष्मीसमुद्वाहमङ्गलाशंसि दीपवत् ॥ ६५ विधुबिम्बप्रतिस्पद्धि दधेऽस्यातपवारणम् । तन्निभेनैन्दवं बिम्बमागत्येव सिषेविषु ॥ ६६ तवस्य रुचिमातेने धृतमातपवारणम् चूडारत्नांशुभिभिन्नं सारुणांशिवव पङ्कजम् ॥ ६७ स्वर्धनीसीकरस्पद्धि चामराणां कदम्बकम् । दुधुवुर्वारनार्योऽस्य दिक्कन्या इव संसताः ॥ ६८ ततः स्थपतिरत्नेन निर्ममे स्यन्दनो महान् । सुवर्णमणिचित्रांगमेरुकुञ्जश्रियं हसन् ॥ ६९ चक्ररत्नप्रतिस्पद्धिचऋद्वितयसङ्गतः । वज्राक्षघटितो रेजे रथोऽस्येव मनोरथः ॥७०
शरललक्ष्मीने जण स्वतः दिलेली व मदस्पर्शाची, बारीक व चंद्रकिरणाप्रमाणे शभ्र अशी दोन दिव्य वस्त्रे (नेसावयाचे व पांघरावयाचे) भरत राजाने धारण केली होती॥६२॥
त्या भरतराजाने गुडघ्यापर्यंत लोंबणारे ब्रह्मसूत्र जानवे धारण केले होते. त्यामळे दोन्ही तटांना स्पर्श करणान्या गंगेच्या प्रवाहाने हिमालय जसा शोभत होता तसा तो शोभू लागला ।। ६३ ।।
किरीटाने ज्याचे मस्तक उंच भासत आहे अशा त्या भरतराजाने आपल्या दोन कानात जणु दिग्विजयाच्या आनन्दाला सांगण्याकरिता आलेले जणू चंद्र सूर्य अशी दोन कुण्डले धारण केली होती॥ ६४ ॥
___ या भरत प्रभूच्या वक्षःस्थलावर सुंदर प्रकाशमान् कौस्तुभमणि शोभत होता तो विजयलक्ष्मीबरोबर होणान्या विवाहमंगलाला सुचविणान्या दिव्याप्रमाणेच शोभत होता ॥६५॥
__ आपल्या शुभ्र- कान्तीने व गोलाकाराने चन्द्राच्या बिम्बाशी स्पर्धा करणारे व छत्राच्या मिषाने जणु चन्द्रबिंब सेवा करण्याकरिता आले की काय असे छत्र सेवकानी भरतराजाच्या मस्तकावर धारण केले ।। ६६ ।।
भरतराजाच्या मस्तकावर धारण केलेले छत्र त्याच्या ( राजाच्या ) मुकुटावरील माणिकांच्या लाल किरणानी युक्त झाल्यामुळे अरुणोदयकालच्या लाल रंगाच्या सूर्यकिरणानी युक्त प्रफुल्लित कमलाप्रमाणे शोभू लागले ।। ६७ ।।
भरतराजाच्या दोन बाजूंचा आश्रय घेऊन दिक्कन्याप्रमाणे सुंदर अशा वारांगना अंगानदीच्या शुभ्र जलकणाशी स्पर्धा करणारा चामरांचा समूह त्याच्यावर वारू लागल्या ।।६८॥
यानंतर सोने आणि रत्ने यांनी चित्रविचित्र दिसणाऱ्या मेरुपर्वताच्या कुंजाच्या शोभेला हसणारा असा मोठा रथ स्थपतिरत्नाने-कलासंपन्न उत्तम सुताराने बनविला ॥ ६९ ।।
चक्ररत्नाशी स्पर्धा करणाऱ्या आपल्या दोन चाकानी युक्त असलेला व वज्राच्या मजबूत कण्याने युक्त असा या भरताचा रथ जणु त्याचा स्वतःचा मनोरथ असा भासू लागला ।। ७०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org