________________
३७-१३३)
महापुराण
(३५९
सायोदगाहनिर्णिक्तरङगैस्तुहिनशीतलैः । ग्रीष्मे मदनतापातं सास्याङग निखापयत् ॥ १२६ चन्दनद्रवसंसिक्तसुन्दराङगलतां प्रियाम् । परिरभ्य दृढं दोभ्यां स लेभे गात्रनिर्वृतिम् ॥ १२७ मवनज्वरतापाता तीवग्रीष्मोष्मनिःसहाम् : सतां निर्वापयामास स्वाङस्पर्शसुखाम्बुभिः ॥ १२८ उत्फुल्लमल्लिकामोदवाहिभिर्गन्धवाहिभिः । स सायंप्रातिकभैजे ति रतिसुखाहरैः ॥ १२९ उत्फुल्लपाटलोद्गन्धिमल्लिकामालधारिणीम् । उपगृह्य प्रियां प्रेम्णा नैदाघीं सोऽनयन्निशाम्॥१३० सा घनस्तनितव्याजातजितेव मनोभुवा । भुजोपपीडमाश्लिष्य शिष्ये पत्या तपात्यये ॥ १३१ नवाम्बुकलुषाःपूराध्वनिरुन्मदके किनाम् । कदम्बामोदिनो वाताः कामिनां धृतयेऽभवन् ॥ १३२ आरूढकालिकां पश्यन्बलाकामालभारिणीम् । धनाली पथिकःसाश्रुर्दिशो मेनेऽन्धकारिताः॥ १३३
...............---
..............
ग्रीष्मकाळी संध्याकाळी पाण्यात प्रवेश करून स्नान केल्यामुळे स्वच्छ व बर्फाप्रमाणे थंड झालेल्या आपल्या अंगानी या चक्रवर्तीच्या मदनतापाने पीडित झालेल्या सर्व अंगाना सुभद्रादेवीने शान्त केले ।। १२६ ॥
चन्दनाच्या ओल्या उटीने जिची सर्व सुन्दर अंगलता माखली आहे अशा सुभद्रा प्रियेला आपल्या दोन बाहूंनी दृढ आलिंगून या चक्रवर्तीने आपल्या अंगाला सुखविले ॥ १२७ ।।
मदनज्वराच्या सन्तापाने पीडित झालेली तीव्र ग्रीष्माच्या उष्णतेला सहन करण्यास असमर्थ अशा आपल्या प्रियेला या चक्रवर्तीने आपल्या अंगाच्या स्पर्शरूपी सुखकर जलानी शान्त केले ॥ १२८ ॥
प्रफुल्लमोगऱ्याच्या पुष्पांचा सुगन्ध वाहून आणणारे व रतिकाली सुख देणाऱ्या अशा सायंकालच्या आणि प्रातःकालच्या वाऱ्यानी तो चक्रवर्ती आनंदित होत असे ॥ १२९ ।।
प्रफुल्ल झालेल्या पाडळीच्या फुलांच्या सुवासाने युक्त अशा मोगऱ्यांच्या फुलांच्या माळा धारण करणा-या सुभद्रादेवीला तो भरतचक्री प्रेमाने आलिंगून उन्हाळ्याच्या रात्री घालवीत असे ॥१३०॥
मेघांच्या गर्जनेच्या मिषाने जणु मदनाने जिला भय दाखविले की काय अशी ती सुभद्रादेवी वर्षाऋतूंत दृढ आलिंगन देऊन पतीबरोबर झोपत असे ॥ १३१ ॥
त्या वर्षाऋतुसमयी नद्यांचे प्रवाह नवीन पाण्याने गढूळ झाले. मत्त झालेले मोर केकारव करू लागले आणि कदंबाच्या पुष्पांचा सुगन्ध ज्यात आहे असे वारे वाहू लागले. हे सर्व प्रकार कामीलोकाना सन्तोष देण्यास कारण झाले आहेत ॥ १३२॥
जिच्यात काळेपणा उत्पन्न झाला आहे व बगळ्यांच्या पंक्तीना जिने मालेप्रमाणे धारण केले आहे अशा मेघपंक्तीला पाहणारा वाटसरू ज्याच्या डोळ्यात अश्रु उत्पन्न झाले आहेत असा होऊन सर्व दिशाना अंधकाराने भरल्या आहेत असे मानू लागले ॥ १३३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org