SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 182
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३०-४८) महापुराण ( १७१ ततः स बलसङ्क्षोभादितो वाद्धिः प्रसर्पति । इतः स बलसङ्क्षोभात्ततोऽब्धिः प्रतिसर्पति ॥४१ हरिन्मणिप्रभोत्स पैस्ततमब्धेर्बभौ जलम् । चिराद्विवृत्तमस्यैव सशैवलमधस्तलम् ॥ ४२ पद्मरागांशुभिर्भिनं क्वचनाब्षेर्व्यभाज्जलम् । क्षोभादिवास्य हृच्छोर्णमुच्छलच्छोणितच्छटम् ॥४३ सह्योत्सङ्गे लुठन्नब्धिर्नूनं दुःखं न्यवेदयत् । सोऽपि सन्धारयशेनं बन्धुकृत्यमिवातनोत् ॥ ४४ असह्यैर्बलसङ्घट्टैः सह्यः स ह्यतिपीडितः । शाखोद्धारमिव व्यक्तमकरोदुग्णपादपैः ॥ ४५ चलत्सत्त्वो गुहारन्ध्रविमुञ्चन्नाकुलं स्वनम् । महाप्राणोऽद्रिरुत्क्रान्ति मियायेव बलक्षतः ॥ ४६ चलच्छाखी चलत्सत्त्वश्चलच्छिथिलमेखलः । नाम्नैवाचलतां भेजे सोऽद्रिरेवं चलाचलः ॥ ४७ जनतावनसम्भोगैस्तुरङ्गखुरघट्टनैः । सह्योत्सङ्गभुवः क्षुण्णाः स्थलीभावं क्षणाद्ययुः ॥ ४८ त्या तीरावर होत असलेल्या सैन्याच्या क्षोभामुळे उपसमुद्र या किनान्याकडे येत होता व या किनान्यावर सैन्यक्षोभ झाला म्हणजे तो त्या किनान्याकडे जात असे ॥ ४१ ॥ हिरव्या रत्नांच्या कान्ति पाण्यावर पसरल्यामुळे ते समुद्राचे पाणी दीर्घकालापासून खालचा शेवाळलेला तलभाग वर आल्याप्रमाणे वाटू लागला ॥ ४२ ॥ कोठे कोठे समुद्राचे पाणी पद्मरागमण्यांच्या किरणांनी व्याप्त झाले तेव्हां ते जणु सेनेच्या क्षोभाने समुद्राचे हृदय फुटून आंतून रक्तांच्या छटा उसळून बाहेर पडत आहेत असे वाटले ।। ४३ ।। सह्यपर्वताच्या पायथ्यापर्यन्त लाटांनी जाणाऱ्या त्या समुद्राने आपले दु:ख त्यास जणु सांगितले व त्या पर्वतानेही त्याला धारण करून आपले जणु मित्राचे कर्तव्य चांगले बजाविले ॥ ४४ ॥ चक्रवर्तीच्या दुस्सह अशा सेनेच्या तुडव्याने सह्यपर्वत अत्यंत पीडित झाला व आपल्या तुटलेल्या वृक्षांनी तो असा दिसला की जणु आपल्या मस्तकावर वृक्षाच्या शाखा धारण करून चक्रवर्तीला शरण आला आहे ।। ४५ ।। ज्याच्यावरील प्राणी पळत सुटले आहेत अथवा ज्याचे धैर्य चंचल झाले आहे, ज्याच्या गुहांच्या छिद्रांतून व्याकुळपणाचे शब्द बाहेर पडत आहेत, असा तो सह्याद्रि चक्रवर्तीच्या सैन्याने घायाळ झाल्यामुळे जरी तो महाप्राण महासमर्थ होता तरीही प्राणरहित होण्याच्या पंथाला जणु लागल्यासारखा दिसला ।। ४६ ।। या पर्वतावरील प्राणी पळत होते, याचे धैर्य डगमगत होते, याच्यावरील वृक्ष थरथर कांपत होते. या पर्वताचा मध्यभाग ढिला झाला होता. गदगदा हलणारा तो सह्याचल नावानेच अचल होता ॥ ४७ ॥ जनतेने याच्या वनांत क्रीडा करून याचा खूप उपभोग घेतला होता. घोडघांच्या खुरांचे संघर्षणही याच्यावर खूप झालेले होते. त्यामुळे या पर्वताच्या वरच्या उंच भूमीचे चूर्ण होऊन त्याला सखल जमीनीचे स्वरूप प्राप्त झाले होते ॥ ४८ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy