SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 323
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३१२) महापुराण (३५-२३३ सरति सरसीतीरं हंसः ससारसकूजितम् । झटिति घटते कोकद्वन्द्वं विशामपि वाधुना ॥ पतति पततां वृन्दं विष्वक् ब्रुमेषु कृतारवम् । गतमिव जगत्प्रत्यापत्ति समुधति भास्वति ॥ २३३ उदयशिखरिग्रावधेणीसरोव्हरागिणी । गगनजलधेरातन्वाना प्रवालवनश्रियम् ॥ दिगिभवदने सिन्दूरश्रीरलक्तकपाटला । प्रसरति तरां सन्ध्यादीप्तिदिगाननमण्डनी ॥ २३४ कमलमलिनी नालं वेष्टुं बत प्रविकस्वरम् । गतमरुणतां बालार्कस्य प्रसारिभिरंशभिः ॥ परिगतमिब प्रादुष्यद्भिः कणरनिलाचिषाम् । नियतविपदं धिग्व्यामूढि विवेकपराडमुखीम् ॥२३५ उपवनतरुनाधुन्वाना विलोलितषट्पदाः । कृतपरिचया वीचीचक्रः सरस्सु सरोरुहाम् ।। रतिपरिमलानाकर्षन्तः सरोजरजोजडाः । प्रतिदिशममी मन्वं वान्ति प्रगेतनमारुताः ॥ २३६ नपवर जिनभर्तुगालेरेभिरिष्टः । प्रकटितजयघोषस्त्वं विबुध्यस्व भूयः ॥ भवति निखिलविघ्नप्रप्रशान्तिर्यतस्ते । रणशिरसि जयश्रीकामिनीकामुकस्य ॥ २३७ __ या सूर्याचा उदय होत असता, जेथे सारस पक्षी किलबिल करीत आहेत अशा सरोवराच्या तीराकडे हा हंस जात आहे व हे कोकपक्षाचे जोडपे जणु शापमुक्त होऊन आता शीघ्र एकमेकास भेटत आहे. चोहीकडे पक्ष्यांचा समूह शब्द करीत प्रत्येक झाडावर उडून जात आहे. जणु हा सूर्य उगवत असता हे जगत् जणु पूर्वस्थितीप्रत पोहोचत आहे असे वाटते ॥२३३ ॥ उदयपर्वताच्या दगडांच्या समूहात उत्पन्न झालेल्या स्थलकमलाप्रमाणे ही लाल प्रातःकालची कान्ति दिसत आहे व ती जणु आकाशरूपी समुद्राच्या पोवळ्याच्या वनाची शोभा धारण करीत आहे व दिग्गजाच्या मुखावरील शेंदुराच्या शोभेप्रमाणे भासत आहे, किंवा अदित्याप्रमाणे लाल वाटत आहे, अशीही प्रातःकालाची कान्ति सर्वदिशांच्या मुखाना भूषविणारी शोभत आहे. ॥ २३४ ॥ बालसूर्याच्या सर्वत्र पसरणाऱ्या लाल किरणानी कमल व्याप्त झाले असता ज्यातून ठिणग्या बाहेर पडत आहेत अशा अग्नीने हे कमल व्याप्त झाले आहे अशी भ्रान्ति भ्रमरीला झाली व ती त्या कमलात प्रवेश करण्यास धजेना जिच्यापासून निश्चयाने आपत्ति प्राप्त होते व जिच्यामुळे विवेकापासून प्राणी विमुख होतो अशा मूढतेला धिक्कार असो ॥ २३५ ॥ जे बगीचातील वृक्षाना हालवित आहेत, ज्यानी भुवयाना चंचल बनविले आहे, कमलयुक्त सरोवरातील लहरीशी जे संबंध पावले आहेत, सुरतप्रसंगी अंगाला लावलेल्या सुगंधित उटीच्या सुगंधाना जे वाहून नेत आहेत व कमलांच्या परागानी ज्याना जडपणा आलेला 'आहे असे सकाळचे वारे प्रत्येक दिशाकडे मंदमंदपणाने वाहत आहेत ।। २३६ ।। ज्यात जयजय अशा शब्दांचा वारंवार घोष होत आहे अशा श्रीजिनेश्वराच्या हितकर मंगल गीतानी हे राजश्रेष्ठा तू पुनः जागा हो! युद्धामध्ये जयलक्ष्मीरूपी स्त्रीची इच्छा करणाऱ्या अशा तुझ्या संपूर्ण विघ्नांची पूर्णशान्ति होत आहे ॥ २३७ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy