________________
१६०)
महापुराण
(९२-१४२
वयंजात्यैव मातङ्गा मदेनोद्दीपिताः पुनः । कुतस्त्या शुद्धिरस्माकमित्यात्तं नु रजो गजः ॥ १४२
वसन्ततिलकावृत्तंइत्थं सरस्सु सुचिरं प्रविहृत्य नागाः । सन्तापमन्तरुदितं प्रशमय्य तोयैः तीरQमानुपययुः किमपि प्रतोषात् । बन्धं तु तत्र नियतं न विदाम्बभूवुः ॥ १४३ हृत्वा सरोऽम्बु करिणो निजदान वारि संवद्धितं विनिमयादतृषाः श्वसन्तः ॥ तद्वीचिहस्तजनितप्रतिरोषशङ्काव्यासङगिनो नु सरसः प्रसभं निरीयुः ॥ १४४ आधोरणा मदमषीमलिनान्करीन्द्रानिणेक्तुमम्बु सरसामवगाहयन्तः॥ शेकुर्न केवलमपामुपयोगमानं तीरे स्थिता ननु नयैस्तवचीकरन्त ॥ १४५ स्वैरं न चाम्बु परिपीतभयत्नलभ्यं तीरद्रुमेषु न कृतः कवलग्रहोऽपि । छायास्वलम्भि न तु विश्रमणं प्रभिन्नः स्तम्बेरमैर्बत मदः खलु नात्मनीनः ॥ १४६
आम्ही जातीनेच मातङ्ग (मांग दुसरा अर्थ हत्ती) आहोत व पुनः आम्ही मदेनोद्दीपित ( मद्यपानाने बेशुद्ध दुसरा अर्थ मस्तीने ) अतिशय वेडे झालेले आहोत. मग आम्हाला ( शुद्धिनिष्पापपणा दुसरा अर्थ स्वच्छता) कोठून असणार असा विचार करून जणु त्या हत्तीनी आपल्या अंगावर धूळ उडवून घेतली ॥ १४२ ॥
याप्रमाणे सरोवरात त्या हत्तीनी पुष्कळ वेळपर्यंत क्रीडा केली व आत उत्पन्न झालेला संताप -दाह पाण्यानी त्यांनी शमविला. यानंतर ते संतोषाने सरोवराच्या तीरावरील वृक्षाकडे आले. पण तेथे आपणास खात्रीने बंधन प्राप्त होईल हे मात्र त्यांना समजले नाही ॥ १४३ ॥
त्या हत्तींनी सरोवराचे पाणी प्राशन केले व त्याच्या मोबदल्यात त्यानी आपल्या मदजलाने ते पाणी वाढविले. तहानेने रहित होऊन त्यांनो सुखाने श्वास सोडला. यानंतर त्या सरोवराच्या तरङगरूपी हस्तांनी आपण अडविले जाऊ अशा शंकेने की काय ते मोठ्या वेगाने त्या सरोवरातून बाहेर पडले ॥ १४४ ।।
मदरूपी शाईने मळकट झालेल्या महागजांना सरोवराच्या पाण्यात प्रवेश करवून त्यांना स्वच्छ करण्यास महात जसे समर्थ झाले नाहीत तसे किना-यावर उभे राहिलेल्या त्यांना पाणी पाजण्यासही समर्थ झाले नाहीत. तात्पर्य हे की मदोन्मत्त हत्तीनी पाण्यात प्रवेश केला नाही व ते पाणीही प्याले नाहीत ॥ १४५ ।।
___मत्त झालेल्या त्या हत्तीनी यत्नावाचून प्राप्त झालेले पाणी मनसोक्त प्राशन केले नाही व सरोवराच्या काठावर असलेल्या वृक्षातला एक घासभर पालाही खाल्ला नाही व त्यांच्या छायेत त्यांनी विश्रान्तीही घेतली नाही. अरेरे ! हा उन्मत्तपणा खरोखर केव्हाही आत्म्याचे हित करणारा नाही ॥ १४६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org