________________
त्रिशं पर्व
अथापरान्तं निर्जेतुमुद्यतः प्रभुरुद्ययौ । दक्षिणापरदिग्भागं वशीकुर्वन्स्वसाधनैः ॥१ पुरः प्रयातमाश्वीयरन्वक् प्रचलितं रथैः । मध्ये हस्तिघटा प्रायात्सर्वत्रवान पत्तयः ॥२ सदेवं बलमित्यस्य चतुरङ्गं विभोर्बलम् । विद्याभतां बलैः साधं षड्भिरङ्गविप्रपथे॥३ प्रचलद्वलसडाक्षोभादुच्चचालकिलार्णवः । महतामनुवृत्ति नु श्रावयन्ननुजीविनाम् ॥ ४ बलैःप्रसह्य निर्भुक्ताःप्रह्वन्ति स्म महीभुजः । सरितः कर्दमन्ति स्म स्थलन्ति स्म महाद्रयः ॥५ सुरसाः कृतनिर्वाणाः स्पृहणीयाबुभक्षुभिः । महद्भिः सममुद्योगैः फलन्तिस्मास्य सिद्धयः॥ ६ अभेद्या दृढसन्धाना विपक्षक्षयहेतवः । शक्तयोऽस्य स्फरन्तिस्म सेनाश्चविजिगीषष ॥ ७
यानंतर आपल्या सैन्याच्याद्वारें नैऋत्य दिशेला वश करून भरत चक्रवर्ती पश्चिम दिशा जिंकण्यास उद्युक्त झाला ॥ १ ॥
सर्वांच्या पुढे घोडेस्वार चालले व रथसमूह सर्व सैन्याच्या पाठीमागून प्रयाण करू लागले. हत्तींचा समूह या दोन सैन्यांच्यामध्ये राहून प्रयाण करू लागला आणि पायदळ सैन्य चोहो बाजूनी प्रयाण करू लागले ॥ २ ॥
हत्ती, घोडे, रथ व पायदळ अशी चार प्रकारची भरतराजाची सेना देव व विद्याधरांच्या सैन्यासह प्रयाण करू लागली. याप्रमाणे ही सहा प्रकारची सेना बरोबर प्रयाण करीत होती व ही पृथ्वीवर आणि आकाशांत पसरून प्रयाण करीत होती ॥ ३ ॥
त्या प्रयाण करणाऱ्या सेनेच्या क्षोभाने देखिल समुद्र क्षुब्ध होऊन उसळला. त्याच्या लाटा वर उसळू लागल्या. त्यावेळी महापुरुषांचे अनुकरण सर्वांनी करावे असे जणु सेवकाना सागत आहे असे लोकाना वाटले ॥४॥
चक्रवर्तीच्या सैन्यांनी ज्यांच्यावर आक्रमण केले असे राजे नम्र झाले व सगळ्या नद्या चिखलाने भरून गेल्या अर्थात् त्यांचे पाणी सैन्यानी प्राशन केल्याने त्या आटल्या व सैन्याच्या जाण्या-येण्याने मोठे पर्वत जमिनीप्रमाणे सपाट झाले ॥ ५ ॥
ज्यांचा उपभोग सुखकर आहे व ज्यानी दुःखाचा नाश केला आहे, उपभोगांची इच्छा करणारे मानव ज्यांचा नेहमी अभिलाष करतात अशा सर्व सिद्धि या चक्रवर्तीच्या मोठया उद्योगाचे फळ म्हणून त्याला प्राप्त झाल्या होत्या ।। ६ ।।
__या भरतराजाच्या ठिकाणी प्रभुशक्ति, उत्साहशक्ति, व मंत्रशक्ति अशा तीन शक्ति होत्या. या तीन शक्तींचे भेदन शत्रु करू शकत नव्हते. या शक्तींची सामग्री बळकट होती व या शत्रूचा क्षय करण्यास समर्थ होत्या. या शक्ति भरतराजाच्या ठिकाणी नेहमी स्फुरण पावत होत्या. तसेच या भरतप्रभूचे सैन्यही अभेद्य होते व त्याची सामग्री पण दृढ होती. म्हणून ते सैन्य शत्रूवर चढाई मोठ्या उत्साहाने करीत असे. प्रभुशक्ति-पराक्रमापासून उत्पन्न झालेले सामर्थ्य-उत्साहशक्ति-धैर्यापासून उत्पन्न झालेले सामर्थ्य-मन्त्रशक्ति-सल्लामसलतीपासून उत्पन्न झालेले सामर्थ्य ॥ ७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org