________________
४०-१५२)
महापुराण
चौलकर्मचौलकर्मण्यथो मन्त्रः स्याच्चोपनयनादिकम् । मुण्डभागी भवान्तं च पदमादावनुस्मृतम् ॥ १४७ ततो निर्ग्रन्थमुण्डादिभागी भव पदं परम् । ततो निष्क्रान्तिमुण्डादिभागी भव पदं परम् ॥ १४८ स्यात्परमनिस्तारककेशभागी भवेत्यतः । परमेन्द्रपदादिश्च केशभागी भवध्वनिः ॥ १४९ परमार्हन्त्यराज्यादिकेशभागीति वागद्वयम् । भवेत्यन्तपदोपेतं मन्त्रोऽस्मिन्स्याच्छिखापदम् ॥ शिखामेतेन मन्त्रेण स्थापयेद्विधिवद्विजः । ततो मन्त्रोऽयमाम्नातो लिपिसङख्यानसङग्रहे ॥ १५१ चूणिः- उपनयनमण्डभागी भव । निर्ग्रन्थमुण्डभागी भव, परमनिस्तारककेशभागी भव ।
परमेन्द्र केशभागी भव । परमराज्यकेशभागी भव । आर्हन्त्यराज्यकेशभागी भव ।
इति चौलक्रियामन्त्रः । शब्दपारभागी भव अर्थपारभागी भव । पदं शब्दार्थसम्बन्धपारभागी भवेत्यपि ॥ १५२ चूणिः- शब्दपारगामी (भागी) भव । अर्थपारगामी (भागी) भव । शब्दार्थपारगामी (भागी)
भव (लिपिसङख्यानमन्त्रः)
--------------------..................
चौलकर्म- या संस्कारात याप्रमाणे मंत्ररचना आहे- उपनयनशब्द आरंभी आणि मुण्डभागी भव हा शब्द अन्ती असा पहिला मन्त्र आहे म्हणजे १) उपनयनमुण्डभागी भव हा मंत्र आहे- याचा अर्थ उपनयनक्रियेमध्ये मण्डन धारण करणारा तं हो. २) निर्ग्रन्थमण्डभागी भव हा दुसरा मन्त्र आहे- निर्ग्रन्थदीक्षा घेतेवेळी मुण्डन धारण करणारा हो. यानंतर ३) निष्क्रान्तिमुण्डभागी भव हे मंत्रपद आहे. अर्थात् मुनि अवस्थेत केशलोच करणारा हो । १४७-१४८ ॥
यानंतर ४) परमनिस्तारककेशभागी भव- संसारातून तारून नेणाऱ्या आचार्यांच्या केशाना प्राप्त हो हा मंत्र आहे. यानंतर ५) परमेन्द्रकेशभागी भव हा मंत्र आहे. इन्द्रपदाच्या केशाना धारण करणारा हो हा मंत्र आहे ॥ १४९ ।।
यानंतर ६) परमराज्यकेशभागी भव उत्कृष्ट राज्यपदधारक चक्रवर्तीच्या केशांना धारण करणारा हो व ७) अर्हन्त्यराज्यकेशभागी भव अरिहन्ताच्या अवस्थेच्या केशाना धारण करणारा हो हा सातवा मंत्र आहे. अशा रीतीच्या चौलमंत्रानी द्विजानी विधिपूर्वक शेंडी धारण करण्याचा संस्कार बालकावर करावा ।। १५० ।।
यानंतर लिपिसंख्यानसंग्रह हा संस्कार करावा. याचे मन्त्र १) शब्दपारभागी भवतूं सर्व शब्दांच्या ज्ञानात पारंगत हो २) अर्थपारगामी भव तूं संपूर्ण अर्थाचा ज्ञाता हो आणि शब्दार्थसम्बन्धपारभागी भव शब्द व अर्थ या दोन्हींचा संबन्ध पूर्णपणे जाणणारा हो असे लिपिसंख्यान क्रियेच्या मंत्राचे अर्थ आहेत ॥ १५१-१५२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org