SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 410
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३८-२८६) महापुराण (३९९ समञ्जसत्वमस्यष्टं प्रजास्वविषमेक्षिता । आनॅशस्यमवाग्दण्डपारुष्यादिविशेषितम् ॥ २७९ ततो जितारिषड्वर्गः स्वां वृत्ति पालयन्निमाम् । स्वराज्ये सुस्थितो राजा प्रेत्य चेह च नन्दति ॥ समं समञ्जसत्वेन कुलमत्यात्मपालनम् । प्रजानुपालनं चेति प्रोक्ता वृत्तिर्महीक्षिताम् ॥ २८१ ततःक्षात्रमिमं धर्म यथोक्तमनुपालयन् । स्थितो राज्ये यशो धर्म विजयं च त्वमाप्नुहि ॥ २८२ प्रशान्तधीः समुत्पन्नबोधिरित्यनुशिष्य तम् । परिनिष्क्रान्तिकल्याणे सुरेन्द्ररभिपूजितः ॥ २८३ महादानमथो दत्वा साम्राज्यपदमुत्सृजन् । स राजराजो राजर्षिनिष्कामति गृहाद्वनम् ॥ २८४ धौरेयः पार्थिवैः किञ्चित्समुत्क्षिप्तां महीतलात् । स्कन्धाधिरोपितां भूयःसुरेन्द्रर्भक्तिनिर्भरैः ॥ आरूढः शिबिकां दिव्यां दीप्तरत्नविनिर्मिताम । विमानवसति भानोरिवायातां महीतलम् ॥२८६ सर्व प्रजेला समान रीतीने पाहणे, कोणाबरोबर पक्षपात न करणे हे संमजसत्व होय. यात दुष्टपणा उत्पन्न झाला, घातकवृत्ति उत्पन्न झाली तर हा समंजसपणा नाहीसा होतो. म्हणून क्रूरपणा त्यागणे व कठोर वचन त्यागणे आणि कठोर दण्ड न देणे यांनी समंजसपणा उत्पन्न होतो ।। २७९ ॥ याप्रकारे जो वागतो कामक्रोधादिक अर्थात् काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मात्सर्य यांना जिंकतो याप्रमाणे समंजसवृत्ति आदि व उपयुक्त वृत्तींनी वागणारा राजा आपल्या राज्यात चांगल्या रीतीने राहतो व तो इहलोकी व परलोकीदेखील सुखी होतो ॥ २८० ॥ या समंजसवृत्तीबरोबर आपल्या कुलाची मर्यादा राखणे, आपल्या बुद्धीचे स्वमतीचे रक्षण करणे व प्रजांचे रक्षण करणे असे राजाचे कर्तव्य आहे ॥ २८१ ।। हा क्षात्रधर्म वर सांगितल्याप्रमाणे जो राजा पाळतो तो राजा स्वराज्यामध्ये स्थिर होतो आणि त्याला कीर्ती लाभते, धर्म प्राप्त होतो व विजय मिळतो. हे पुत्रा, तू याप्रमाणे वाग म्हणजे तुला कीर्ति, धर्म व विजय मिळेल. ।। २८२ ॥ ज्यांची बुद्धि शांत झाली आहे, ज्याना वैराग्य-भेदविज्ञान उत्पन्न झाले आहे असे ते भगवान् पुत्राला याप्रमाणे उपदेश देतात. यानंतर दीक्षाकल्याणात ते सर्व इंद्राकडून पूजिले जातात ॥ २८३ ।। ___ यानंतर ते महादान देतात व साम्राज्यपदाचा त्याग करतात व सर्व राजांचे स्वामी, राजर्षि असे भगवान् घरातून वनाकडे जातात ॥ २८४ ।। त्यावेळी मुख्य असे काही राजे ती पालखी जमीनीवरून उचलून खांद्यावर धारण करतात आणि अतिशय भक्तीने काही पावले नेतात. यानंतर अतिशय भक्तीने भरून सुरेन्द्र ती पालखी खांद्यावर धारण करतात ।। २८५ ॥ ती पालखी दिव्य असते अतिशय उज्ज्वल रत्नानी बनविलेली असते. जणू सूर्याच्या विमानात तिचा निवास होता व तेथून ती या भूतलावर आली आहे असे पाहणाऱ्यांना वाटते. अशा त्या पालखीत प्रभु बसलेले असतात, आरूढ झालेले असतात ॥ २८६ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy