SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 388
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३८-७६) महापुराण (३७७ क्रियाकल्पोऽयमाम्नातो बहुभेदो महर्षिभिः । सङक्षेपतस्तु तल्लक्ष्म वक्ष्ये सञ्चक्ष्य विस्तरम् ॥६९ आधानं नाम गर्भादौ संस्कारो मन्त्रपूर्वकः । पत्नीमृतुमती स्नातां पुरस्कृत्याहदिज्यया ॥७० तत्रार्चनविधौ चक्रत्रयं छत्रत्रयान्वितम् । जिना मभितः स्थाप्य समं पुण्याग्निभिस्त्रिभिः ॥७१ त्रयोऽग्नयोऽर्हद्गणभृच्छेषकेवलिनिर्वृतौ । ये हुतास्ते प्रणेतव्याः सिद्धार्चावेधुपाश्रयाः ॥ ७२ तेष्वर्हदिज्याशेषांशैराहुतिर्मन्त्रपूर्विका । विधेया शुचिभिर्द्रव्यैः पुंस्पुत्रोत्पत्तिकाम्यया ॥ ७३ तन्मन्त्रास्तु यथाम्नायं वक्ष्यन्तेऽन्यत्र पर्वणि । सप्तधा पीठिकाजातिमन्त्रादिप्रविभागतः ॥ ७४ विनियोगस्तु सर्वासु क्रियास्वेषां मतो जिनः । अव्यामोहादतस्तज्जैः प्रयोज्यास्ते उपासकैः ॥७५ गर्भाधानक्रियासेनां प्रयुज्यादौ यथाविधि । सन्तानार्थ विना रागाद्दम्पतिभ्यां विधीताम् ॥ ७६ इतिगर्भाधानम् ॥ मिळणे, ३ पारिवाज्य- जिनदीक्षा प्राप्त होणे, ४ सुरेन्द्रता- स्वर्गांत इन्द्रपद प्राप्त होणे, ५ साम्राज्य- षट्खंडाचे स्वामित्व प्राप्त होणे, ६ परमार्हन्त्य- उत्कृष्ट अर्हन्तपणा अर्थात् तीर्थकर केवलिपणा प्राप्त होणे व परनिर्वाण आणि उत्कृष्ट मोक्ष प्राप्ति होणे ही तीन लोकांत सात परमस्थाने होत. ही अर्हन्ताच्या वचनाचा आस्वाद घेणाऱ्या प्राण्यांनाच प्राप्त होतात ॥ ६६-६८ ॥ अशा रीतीने हा क्रियाकल्प अनेक भेदांचा महर्षीनी आगमात सांगितला आहे. या सर्वांची लक्षणे मी विस्ताराचा त्याग करून संक्षेपाने सांगेन । ६९ ॥ चतुर्थ स्नान केलेल्या व शुद्ध झालेल्या ऋतुमती पत्नीला पुढे करून गर्भाधानाच्या पूर्वी अरिहन्ताच्या पूजापूर्वक जो संस्कार मंत्रपूर्वक केला जातो त्याला गर्भाधान संस्कार म्हणतात. या गर्भाधानाच्या पूजेमध्ये जिनप्रतिमेच्या उजव्या बाजूला तीन चक्रे आणि डाव्या बाजूला तीन छत्रांची स्थापना करून पुढे तीन अग्नींची स्थापना करावी. जिनेश्वर, गणधर आणि सामान्य केवली यांना मुक्ति प्राप्त झाली त्यावेळी क्रमाने दक्षिणाग्नि, गार्हपत्याग्नि आणि गार्हपत्याग्नि यांची स्थापना केली होती. सिद्धप्रतिमेच्या वेदीच्या पुढे त्यांची स्थापना करावी. यानंतर प्रथम अर्हन्तांची पूजा करून उरलेल्या पवित्र द्रव्यांनी पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मंत्रपूर्वक या अग्नीत आहति द्याव्यात. त्या मंत्राचे वर्णन पुढील पर्वामध्ये शास्त्रानसारे केले जाईल. या मंत्राचे पीठिकामंत्र, जातिमन्त्र वगैरे सात प्रकार आहेत. या मंत्रांचा विनियोग या सर्व क्रियामध्ये करावा असे जिनेश्वरांनी सांगितले आहे. म्हणून तेव्हां श्रावकानी आपल्या बुद्धीत भ्रम उत्पन्न न होऊ देता यांचा उपयोग करावा. विधीला अनुसरून ही गर्भाधान क्रिया यथाशास्त्र करून नंतर आसक्त न होता दम्पतीनी सन्तान प्राप्तीकरिता समागम करावा. याप्रमाणे ही गर्भाधान क्रिया झाली ॥ ७०-७६ ।। म. ४८ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy