Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 716
________________ ४७-३९१) महापुराण (७०५ भव्यस्यापि भवोऽभवद्भगवतः कालादिलब्धेविना । कालोऽनादिरचिन्त्यदुःखनिचितो घिग्धिस्थिति संसृतेः ।। इत्येतद्विदुषात्र शोच्यमथवा नेतच्च यद्देहिनाम् । भव्यत्वं बहुषा महोशसहजा वस्तुस्थितिस्तादृशी ॥ ३८६ गतानि सम्बन्धशतानि जन्तोः । अनन्तकालं परिवर्तनेन ॥ नावैहि कि त्वं हि विबुद्धविश्वो वृथव मुह्येः किमिहेतरो वा ॥ ३८७ कर्मभिःकृतमस्यापि न स्थास्नु त्रिजगत्पतेः । शरीरादि ततस्त्याज्यं मन्वते तन्मनीषिणः ॥ प्रागक्षिगोचरः संप्रत्येष चेतसि वर्तते । भगवांस्तत्र कः शोकः पश्यैनं तत्र सर्वदा ॥ ३८९ इति मनसि यथार्थ चिन्तयन्शोकर्वाह्न। शमय विमलबोधाम्भोभिरित्याबभाषे॥ गणभूदय स चक्री दावदग्धो महीध्रो । नवजलदजलैर्वा तद्वचोभिः प्रशान्तः ॥ ३९० चिन्तां व्यपास्य गुरुशोककृतां गणेशमानम्य नम्रमुकुटो निकटात्मबोषिः। निन्दनितान्तविसरां निजभोगतृष्णां मोक्षोत्सुकः स्वनगरं व्यविशद्विभूत्या ॥ ३९१ भगवान् भव्यच होते पण त्याना देखिल जोपर्यन्त काललब्धीची प्राप्ति झाली नाही तोपर्यन्त संसारात फिरावे लागले आहे. हा काल अनादि आहे व अचिन्त्य अशा दःखांनी भरलेला आहे. म्हणून या संसाराच्या स्थितीला वारंवार धिक्कार असो हे सर्व जाणून विद्वानाने शोक करणे योग्य आहे किंवा नाहीही. कारण हे राजन् या जगात प्राण्याचे भव्यत्व नाना प्रकारचे आहे. म्हणून वस्तुस्थिति स्वाभाविक म्हणजे नानाप्रकारची आहे ।। ३८६ ॥ हे भरता, हा प्राणी अनन्तकालापासून संसारात फिरत आहे व याचे शेकडो संबंध होऊन गेले आहेत. हे भरता, सगळ्या जगाला जाणणा-या तुजकडून हे जाणले गेले नाही काय? हे भरता तू अज्ञानिजनाप्रमाणे व्यर्थ का मोह पावत आहेस ? हे भरता, त्रैलोक्याचे स्वामी असलेल्या या आदिभगवंताचे देखिल शरीरादिक कर्मानी नित्य टिकणारे बनविले नाहीत. म्हणून हाणे लोक या शरीरादिकाना त्याज्य मानतात ।। ३८७-३८८ ।। हे श्रीआदिप्रभु पूर्वी डोळ्यांचा विषय होते पण आता ते अन्तःकरणात आहेत. म्हणून त्याविषयी शोक का करावा ? हे भरता तू त्याना नेहमी आपल्या मनात पाहा ॥३८९।। हे भरतेशा याप्रमाणे मनात यथार्थ विचार करून तु आपल्या निर्मल ज्ञानरूपी जलाने शोकरूपी अग्नीला शान्त कर. असे वृषभसेन गणधर चक्रेशाला म्हणाले, यानंतर जसा वनाग्नीने दग्ध झालेला पर्वत नवीन मेघाच्या पाण्यानी शान्त होतो तसे वृषभसेनगणधराच्या वचनानी भरतचक्री शान्त झाला ।। ३९० ॥ ज्याला आत्मज्ञान लौकरच होईल अशा त्या भरतेश्वराने आपल्या पित्याविषयींची शोकचिन्ता मनातून काढून टाकली आणि ज्याचा मुकुट नम्र झाला आहे अशा त्या भरतेशाने वृषभसेन गणधराना नमस्कार केला. जी अतिशय वृद्धिंगत झाली आहे अशा आपल्या विषयोपभोगाच्या इच्छेची निन्दा करणारा मोक्षोत्सुक झालेला असा तो भरत आपल्या सर्व ऐश्वर्यासह नगरात प्रविष्ट झाला ॥ ३९१ ।। मा. ९२ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 714 715 716 717 718 719 720