Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

Previous | Next

Page 715
________________ ७०४) महापुराण (४७-३८२ देहच्युतौ यदि गुरोर्गुरुशोचसि त्वम् । तं भस्मासात्कृतिमवाप्य विवृद्धरागाः ॥ प्राग्जन्मनोऽपि परिकर्मकृतोऽस्य कस्मादानन्दनृत्तमधिकं विदधुवुनाथाः ॥ ३८२ . नेक्षे विश्वदृशं शृणोमि न वचो दिव्यं तदघ्रिद्वये। नम्रस्तनखभाविभासिमुकुटं कर्तुं लभे नाना। तस्मात्स्नेहवशोऽस्म्यहं बहुतरं शोकीति चेदस्त्विदम् । किन्तु भ्रान्तिरियं व्यतीतविषयप्राप्त्यै भवत्प्रार्थना ॥ ३८३ विज्ञानधक् त्रिभुवनैकगुरुर्गुरुस्ते । स्नेहेन मोहविहितेन विनाशयः किम् ॥ स्वोदात्ततां शतमखस्य न लज्जसे किम् । तस्मात्तव प्रथममुक्तिगति न वेत्सि ॥ ३८४ इष्टं कि किमनिष्टमत्र वितथं सङ्कल्प्य जन्तुर्जडः । किञ्चिद्वेष्टयपि वष्टि किञ्चिदनयोः कुर्यादपि व्यत्ययम् ॥ तेननोऽनुगतिस्ततो भववने भव्योऽप्यभव्योपमो । भ्राम्यत्येव कुमार्गवृत्तिरघनो वातङ्कभीर्दुःखितः ॥ ३८५ आदिभगवंताचा देह नष्ट झाला म्हणून तू फार शोक करीत आहेस तर हे देव त्या प्रभूच्या देहाला भस्म करून कां बरे अधिक रागभावयुक्त आनंदयुक्त होत आहेत बरे ? हे स्वर्गाचे अधिपति इन्द्र जन्माच्या पूर्वीपासून अर्थात् प्रभु मातेच्या गर्भात आल्यापसून त्यांची सेवा करीत होते व प्रभु मुक्त झाल्यावर का बरे अधिक उत्साहाने आनन्द नृत्य करीत आहेत? या सर्व प्रकारावरून हे भरता तू शोक करणे योग्य आहे असे वाटत नाही ॥ ३८२ ।।। आता मला जगाला पाहणारे सर्वज्ञ आदिभगवान् दिसत नाहीत व त्यांचा दिव्य उपदेशही आता ऐकावयास मिळत नाही. आता त्यांच्या दोन चरणावर नम्र होऊन त्यांच्या नखाच्या कान्तीनी आता मी माझा मुकुट शोभायुक्त करण्यास असमर्थ आहे. म्हणून मी त्यांच्या स्नेहाला वश होऊन मी फार शोकयक्त झालो आहे असे म्हणशील तर हे असो. परंतु ही भ्रान्ति आहे कारण जो विषय नष्ट झाला आहे त्याची प्राप्ति व्हावी म्हणून इच्छिणे हे व्यर्थ आहे ।। ३८३ ॥ हे राजन्, तुझे पिताजी त्रिकालज्ञानी असल्यामुळे त्रैलोक्याचे ते गुरु होते व तुही मति, श्रत व अवधि या तीन ज्ञानाचा धारक आहेस. असे असता मोहोदयाने उत्पन्न झालेल्या स्नेहाने आपला उत्तमपणा का नष्ट करीत आहेस ? इन्द्राचा मोठेपणा पाहून तुला लाज वाटत नाही काय ? सौधर्मेन्द्रापेक्षाही तू श्रेष्ठ आहेस कारण त्याच्या आधी तू प्रथम मुक्त होणार आहेस. इन्द्र जेव्हा मनुष्य जन्म धारण करील तेव्हा तो मुक्त होईल पण याच भवात मुक्त होणार आहेस म्हणून तू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस ।। ३८४ ।। जो मर्ख प्राणी आहे तो हितकारक कोणती वस्त आहे व अहितकर कोणती यात खोटा संकल्प करून एखाद्या वस्तूचा द्वेष करितो व एखाद्या वस्तूची अभिलाषा करितो किंवा या इष्टानिष्ट वस्तुमध्ये विपरीत कल्पना देखिल करितो अर्थात इष्ट वस्तूला अनिष्ट वस्तु मानतो व अनिष्टाला इष्ट मानतो त्यामुळे तो भव्य असूनही अभव्याप्रमाणे मिथ्या श्रद्धादिकानी युक्त होतो त्यामुळे त्याची पापाची परंपरा चालू राहते म्हणून अभव्याप्रमाणे दुःखी, निर्धन व कुमार्गात प्रवृत्ति करणारा होतो ॥ ३८५ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 713 714 715 716 717 718 719 720