Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 700
________________ ४७-२५८) महापुराण (६८९ आवां चाकर्ण्य तं नत्वा गत्वा नाकं यथोचितम् । अनुभूय सुखं प्रान्ते शेषपुण्यविशेषतः ॥ २५१ इहागताविति व्यक्तं व्याजहार सुलोचना । जयोऽपि स्वप्रियाप्रज्ञाप्रभावादतुषत्तदा ॥ २५२ तवा सदस्सदः सर्वे प्रतीयुस्तदुदाहृतम् । कःप्रत्येति न दुष्टश्चेत्सद्भिनिगदितं वचः । २५३ एवं सुखेन साम्राज्यभोगसारं निरन्तरम् । भुञ्जानौ रञ्जितान्योऽन्यौ कालं गमयतः स्म तौ ॥२५४ तदाखगभवावाप्तप्रज्ञप्तिप्रमुखाः श्रिताः । विद्यास्तां च महीशं च सम्प्रीत्या वद्धितश्रियः ॥ २५५ तबलात्कान्तया साधं विहर्तुं सुरगोचरान् । वाञ्छन्देशानिजं राज्यं नियोज्य विजयेऽनुजे ॥२५६ यथेष्टं सप्रियो विद्यावाहनः सरितां पतिम् । कुलशैलानदीरम्यवनानि विविधान्यपि ॥ २५७ विहरनन्यदा मेघस्वरः कैलासशैलजे । वने सुलोचनाभ्यर्णादसौ किञ्चिदपासरत् ॥ २५८ ---------......... आम्ही दोघानी (सुलोचना व जयकुमार यांच्या पूर्वभवातील जीवांनी-देवांनी ) ते सर्व ऐकले व गुणपालतीर्थकराना वंदन करून आम्ही दोघे स्वर्गात गेलो. तेथे आम्ही योग्य अशा सुखाचा अनुभव घेतला व आयुष्याच्या शेवटी उरलेल्या पुण्यविशेषाने येथे जन्मलो असे सुलोचनेने स्पष्ट वर्णिले. त्यावेळी आपल्या प्रियेच्या बुद्धिप्रभावामुळे जयकुमार देखिल आनंदित झाला ॥ २५१-२५२ ।। तेव्हा सभेतील सर्व सभ्यांना ते सुलोचनेचे भाषण पटले. जर मनुष्य दुष्टवृत्तीचा नसेल तर सज्जनांनी सांगितलेले वचन कोण बरे विश्वास ठेवून मान्य करणार नाही? ॥२५३।। __ याप्रमाणे साम्राज्याचा व सारभूतभोगांचा निरन्तर अनुभव घेणारे व एकमेकांच्या मनाचे रंजन करणारे ते जोडपे आपला काल सुखाने व्यतीत करू लागले. त्यावेळी विद्याधराच्या भवात प्राप्त करून घेतलेल्या प्रज्ञप्ति वगैरे मुख्य विद्यानी सुलोचनेचा व जयकुमाराचा प्रेमाने आश्रय घेतला व त्यानी त्यांचे ऐश्वर्य वाढविले ॥ २५४-२५५ ।। त्या विद्येच्या सामर्थ्याने आपल्या स्त्रीसह विहार करण्यासाठी देवांचे निवास असलेल्या ठिकाणी जाण्याची इच्छा करणाऱ्या जयकुमाराने आपले राज्य आपला धाकटा भाऊ जो विजय त्याच्यावर सोपविले ॥ २५६ ।। विद्या हे वाहन ज्याचे आहे असा तो जयकुमार आपल्या प्रियेसह समुद्र, कुलपर्वत, नद्या व रम्य अनेक वने याठिकाणी यथेच्छ विहार करीत कोणे एकेवेळी कैलासपर्वताच्या वनात आला व आपल्या प्रियपत्नीपासून काही अन्तरावर जाऊन बसला ॥ २५७-२५८ ।। म.९० Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 698 699 700 701 702 703 704 705 706 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720