Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra

View full book text
Previous | Next

Page 709
________________ ६९८) महापुराण (४७-३३१ वाराणसीपतिश्चित्राङ्गदोऽप्यालोकनाकुलः । खमुत्पतन्तं भास्वन्तं प्रकाश्य धरणीतलम् ॥ ३३१ एवं विलोकितस्वप्ना राजराजपुरःसराः । पुरोधसं फलं तेषामपृच्छन्नयमोदये ॥ ३३२ कर्माणि हत्वा निर्मूलं मुनिभिर्बहुभिः समम् । पुरोः सर्वेऽपि शंसन्ति स्वप्नाः स्वर्गाग्रगामिताम् ॥३३३ इति स्वप्नफलं तेषां भाषमाणे पुरोहिते । तदैवानन्दनामैत्य भर्तुः स्थितिमवेदयत् ॥ ३३४ ध्वनी भगवता दिव्ये संहृते मुकुलीभवत् । कराम्बुजा सभा जाता पूष्णीव सरसोत्यसौ ॥ ३३५ तदाकर्णनमात्रेण सत्वरः सर्वसङ्गतः। चक्रवर्ती तमभ्येत्य त्रिः परीत्य कृतस्तुतिः ॥ ३३६ महामहमहापूजां भक्त्या निवर्तयन्स्वयम् । चतुर्दशदिनान्येवं भगवन्तमसेवत ॥ ३३७ माघकृष्णचतुर्दश्यां भगवान्भास्करोदये । मुहूर्तेऽभिजिति प्राप्तपल्यङको मुनिभिः समम् ॥ ३३८ प्रादिङमुखस्तृतीयेन शुक्लध्यानेन रुद्धवान् । योगत्रितपमन्येन ध्यानेनाघातिकर्मणाम् ॥ ३३९ पञ्चहस्वस्वरोच्चारणप्रमाणेन संक्षयम् । कालेन विदधत्प्रान्तगुणस्थानमधिष्ठितः ॥ ३४० वाराणसी नगराचा राजा चित्रांगदाने सर्व भूतलाला प्रकाशित करून आकाशात गमन करणान्या सूर्याला स्वप्नात पाहिले ॥ ३३१ ॥ ___ याप्रमाणे ज्यानी स्वप्ने पाहिली त्या सगळ्यानी भरतचक्रवर्तीसह पुरोहिताला त्याची फले सूर्योदयाच्या वेळी विचारली ।। ३३२ ॥ __ कर्मांचा नाश करून अनेक मुनीबरोबर भगवान पुरुदेव- आदिजिनेश्वर स्वर्गाच्या अग्रभागावर अर्थात् मोक्षाला जाणार आहेत असे ही सर्व स्वप्ने सांगत आहेत असे पुरोहित सांगत असता त्याचवेळी आनंदनामक एक मनुष्य तेथे आला व त्याने आदिभगवंताच्या स्थितींचे वर्णन केले ॥ ३३३-३३४ ।। भगवंतानी आपला दिव्यध्वनि जेव्हां बंद केला त्यावेळी सूर्य अस्ताला जात असता जशी कमळे मिटतात तशी जिची हस्तरूपी कमळे मिटली आहेत अशी ती सर्व सभा झाली ॥ ३३५ ॥ ते प्रभूचे वृत्त ऐकल्याबरोबर भरत चक्रवर्ती सर्वांना बरोबर घेऊन आदि भगवंता जवळ आला व त्याने प्रभूना तीन प्रदक्षिणा घातल्या व त्यांची त्याने स्तुति केली. यानंतर चक्रवर्तीने भक्तीने स्वतः महामहपूजा केली व चौदा दिवसपर्यन्त याप्रमाणे त्याने भगवंताची सेवा केलो ।। ३३६-३३७ ।। माघकृष्ण चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अभिजित् मुहूर्तावर भगवंतानी अनेक मुनीबरोबर पल्यंकासनाने बसून व पूर्वेकडे तोंड करून तिस-या शुक्लध्यानाने मन, वचन व शरीराची प्रवृत्ति बंद केली आणि चौथ्या शुक्लध्यानाने अघातिकर्माचा क्षय केला. नाम, गोत्र, आयु व वेदनीय कर्माचा नाश केला. हे चौथे शुक्लध्यान अ इ उ ऋ ल या पांच -हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो तितक्या काळाचे असते. अर्थात एवढ्या कालप्रमाणाच्या या ध्यानाने प्रभु शेवटच्या गुणस्थानात-अयोगकेवली गुणस्थानात स्थिर झाले ।। ३३८-३४० ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 707 708 709 710 711 712 713 714 715 716 717 718 719 720